आज कुछ तूफानी करते हैं: हनुमानकाइण्‍ड आणि थम्‍स अपने आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कपमधील भारत विरूद्ध पाकिस्‍तान सामन्‍यामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर केली

News Service

भारतातील बिलियन-डॉलर ब्रँड थम्‍स अपने स्‍टेडियममध्‍ये ‘टेस्‍ट द थंडर’ गाणे सादर केले

राष्‍ट्रीय, १६ फेब्रुवारी २०२६ – काही दिवसांमध्‍ये उत्‍साहपूर्ण अनुभव मिळतो, तर काही दिवसांमध्‍ये थंडर ऊर्जेची गरज असते. भारत विरूद्ध पाकिस्‍तान क्रिकेट सामन्‍यामध्‍ये फक्‍त एकच उत्‍साह दिसून येतो, तो म्‍हणजे ‘तूफानी’. आपल्‍या ‘आज कुछ तूफानी करते हैं’ या तत्त्वाशी बांधील राहत थम्‍स अपने आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कपमधील भारत विरूद्ध पाकिस्‍तान सामन्‍याला भव्‍य सोहळ्यामध्‍ये बदलले. प्रख्‍यात हिप-हॉप आर्टिस्‍ट हनुमानकाइण्‍ड यांनी सामन्‍याच्‍या दिवशी स्‍टेडियममधील रोमांचपूर्ण उत्‍साहामध्‍ये ‘टेस्‍ट द थंडर’ क्षणाची भर केली.

क्रिकेटप्रेमींसह तुंडुब भरलेल्‍या स्‍टेडियममध्‍ये हनुमानकाइण्‍ड यांनी थम्‍सचे नवीन गाणे ‘टेस्‍ट द थंडर’, तसेच त्‍यांची काही निवडक गाणी सादर केली. हनुमानकाइण्‍ड यांचे उत्‍स्‍फूर्त व धडाकेबाज सादरीकरण सामन्‍याच्‍या रोमांचशी जुळून गेले, जेथे स्‍टेडियममध्‍ये उपस्थित, तसेच स्क्रिनवर सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींमध्‍ये थम्‍स अपचा थंडरस उत्‍साह दिसून आला.
थम्‍स अपची ब्रँड ओळख दाखवणारी दृश्‍ये एलईडी स्क्रिन्‍सवर झळकली, ज्‍यानंतर सुरू झालेल्‍या काऊंटडाऊनसह सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले. हनुमानकाइण्‍ड यांनी मंचावर टेस्‍ट द थंडर गाणे सादर केले, ज्‍याला साजेशी प्रकाशयोजना, धूर, एरियल कोरिओग्राफी होती, यासह परफॉर्मन्‍समध्‍ये अधिक रंगत आली. या भव्‍य सादरीकरणामध्‍ये किंग्‍ज युनायटेड इंडियाने सादर केलेले अंतिम उत्‍साहवर्धक सादरीकरण खास आकर्षण ठरते. स्‍वदेशी रॅप स्‍टार, प्रख्‍यात हिप-हॉप डान्‍स ग्रुप आणि आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कपचा थरार या सांस्‍कृतिक सादरीकरणामध्‍ये एकत्र पाहायला मिळाले. उपस्थितांनी ‘तूफानी’ जल्‍लोष करण्‍यासह या सादरीकरणाचे समापन झाले.

हनुमानकाइण्‍ड म्‍हणाले, ”या रोमहर्षक सामन्‍यावर परफॉर्म करण्‍याचा अनुभव अविश्वसनीय आहे. तुम्‍हाला सर्वत्र रोमांचपूर्ण उत्‍साह जाणवू शकतो. थम्‍स अपसोबत हे सादरीकरण करणे अत्‍यंत खास आहे. निस्‍सीम क्रिकेटप्रेमी असल्‍याचे दाखवून देण्‍यासाठी ही उत्तम वेळ आहे.”

‘टेस्‍ट द थंडर’ या गाण्‍यामध्‍ये हनुमानकाइण्‍ड यांची स्‍ट्रीट रॅप शैली आणि विशाल दादलानी यांचा मधुरमय आवाज यांचे अनोखे संयोजन पाहायला मिळते. नुकतेच मुंबईमध्‍ये प्रेस शोकेसदरम्‍यान लाँच करण्‍यात आलेले हे गाणे प्रेक्षकांमध्‍ये खूप लोकप्रिय ठरले आहे, ज्‍याचे श्रेय या गाण्‍यामधील दमदार आवाज आणि नीडर वृत्तीला जाते.

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्‍हण्‍णाल्‍या, ”भारत विरूद्ध पाकिस्‍तान यांच्‍यामधील सामना दोन देशांमधील, तसेच जगभरातील क्रिकेटप्रेमींमसाठी क्रिकेट जगतातील सर्वात रोमहर्षक सामना बनला आहे. स्‍टेडियममधील वातावरण अत्‍यंत उत्‍साहपूर्ण होते. थम्‍स अप क्रिकेटसाठी अशा रोमहर्षक व उत्‍साहवर्धक क्षणांचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. आपल्‍या दमदार व अद्वितीय ऊर्जेसह हनुमानकाइण्‍ड यांनी ‘आज कुछ तूफानी करते हैं’ गाण्‍याला असे क्षण व सामन्‍यासाठी परिपूर्ण बनवले.”

मैदानावर क्रिकेटचा रोमांच आणि स्‍टॅण्‍ड्समध्‍ये संगीतमय वातावरणासह हनुमानकाइण्‍ड याच्‍या सादरीकरणाने या सामन्‍याच्‍या दिवशी मनोरंजनामध्‍ये नव्‍या उत्‍साहाची भर केली. टेस्‍ट द थंडर प्रवास स्‍टुडिओपासून स्‍टेडियमपर्यंत जाण्‍यासह थम्‍स अपने भारतातील सर्वात मोठ्या क्षणांमध्‍ये या गाण्‍याला सादर करणे सुरू ठेवले आहे, ज्‍यासह थम्‍स अप तरूण संस्‍कृती व लाइव्‍ह अनुभवामध्‍ये आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे आणि तेथे फक्‍त एकच गोष्‍ट साजेशी आहे, ती म्‍हणजे ‘तूफान’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button