मेंदूवरील आघाताच्या मूल्यमापनात मदत करण्यासाठी अॅबॉटने आणली लॅबवर आधारित रक्ततपासणी

News Service
  • अॅबॉटची लॅबवर आधारित माइल्ड ट्रॉमॅटिक ब्रेन इन्ज्युरी (mTBI) चाचणी १८ मिनिटांत विश्वासार्ह परिणाम पुरवू शकते, ज्यामुळे डॉक्टरांना सर्वसाधारणपणे कंकशन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माइल्ड ट्रॉमॅटिक ब्रेन इन्ज्युरी (mTBI)च्या रुग्णांचे मूल्यपान करणे शक्य होते.
  • या चाचणीमध्ये सीटी स्कॅनची गरज ४० टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे आपत्कालीन कक्षामध्ये घालवावा लागणारा वेळ कमी होण्यास मदत होते.

मुंबई, भारत, २५ जून २०२५ – सर्वसामान्यपणे कंकशन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माइल्ड ट्रॉमॅटिक ब्रेन इन्ज्युरीचे (mTBI) अर्थात मेंदूवर झालेल्या सौम्य आघाताचे मूल्यमापन करण्याकरिता जागतिक हेल्थकेअर कंपनी अॅबॉटने प्रयोगशाळेवर आधारित रक्तचाचणी बाजारपेठेत आणली आहे. ट्रॉमॅटिक ब्रेन इन्ज्युरी (टीबीआय) चाचणी अॅबॉटच्या Alinity i आणि Architect i1000SR या लॅबोरेटरी उपकरणांवर केली जाते, जी अपोलो, हैदराबाद आणि न्यूबर्ग सुपरटेक लॅबोरेटरीसारख्या प्रमुख हॉस्पिटल्स आणि लॅबोरेटरीजमध्ये उपलब्ध आहे.

ही चाचणी १८ मिनिटांत विश्वासार्ह निष्कर्ष देऊ करते, ज्यामुळे क्लिनिशियन्सना मेंदूवर झालेल्या आघाताचे त्वरित मूल्यमापन करता येते व mTBI रुग्णांच्या दुखापतीच्या स्वरूपानुसार उपचारांना प्राधान्य देता येते. या निदानात्मक साधनामुळे सीटी स्कॅनची गरजही ४० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होण्यास मदत होते व निश्चिततेची पातळी जास्त असल्याने हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ ताटकळण्याची व अनावश्यक रेडिएशनला सामोरे जाण्याची गरज उरत नाही. ही चाचणी रक्तातील ubiquitin C-terminal hydrolase L1 (UCH-L1) आणि glial fibrillary acidic protein (GFAP) – या रक्तातील दोन बायोमार्कर्सचे मापन करते. या चाचणीमुळे अधिक काटेकोर पद्धतीने देखभाल पुरवली जाण्यास मदत होते व त्याचा फायदा रुग्ण आणि आरोग्यसेवा यंत्रणा दोघांनाही होतो. ज्या ठिकाणी सीटी यंत्रणा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतील अशा ठिकाणी हे विशेषत्वाने महत्त्वाचे आहे.
अॅबॉट इंडियाच्या डायग्नोस्टिक्स विभागाचे जनरल मॅनेजर व कंट्री हेड रवी सिंग म्हणाले, “अॅबॉटची टीबीआय रक्तचाचणी रुग्णाच्या मूल्यमापनामध्ये सुधारणा आणते व अवघ्या काही मिनिटांत विश्वासार्ह निष्कर्ष पुरवित डॉक्टर्सना सीटी स्कॅन करण्याची गरज नसल्याचा निर्णय त्वरित व अचूकतेने घेण्यास मदत करते. याचा अर्थ रुग्णाला आपत्कालीन विभागात कमी वेळ घालवावा लागतो व रुग्ण आणि कुटुंबियांवर कमी ताण येते. या चाचणीमुळे लवकर व अचूक मूल्यमापन करणे शक्य होते व त्यामुळे अधिक चांगल्या दीर्घकालीन आरोग्य परिणामांची हमी मिळते.”

डोके आपटल्याने, त्याला फटका बसल्याने किंवा झटका मिळाल्याने टीबीआय होऊ शकते व त्यामुळे नजिकच्या काळात वा दीर्घकालीन धोका निर्माण होऊ शकतो. भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ १० लाख लोकांना याचा अनुभव येतो, असा अंदाज आहे. टीबीआय अनुभवलेल्या लोकांच्या स्मृतीमध्ये, हालचाल व संवेदनेमध्ये (उदा. पाहणे आणि ऐकणे) व भावनिक कार्यामध्ये बिघाड होऊ शकतो (उदा. व्यक्तिमत्वातील बदल, मानसिक लक्षणे). टीबीआय अर्थात मेंदूवरील आघात सोसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अशाच प्रकारचा आणखी एक आघात होण्याची शक्यता अधिक असते – जसे की आपला पाय मुरगळला असेल किंवा स्नायू खेचला गेला असेल तर त्याला पुढे आणखी दुखापत होण्याची शक्यता बळावते.

टीबीआय जगभरात सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारी न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी लक्षावधी लोक प्रभावित होत असतात. भारतामध्ये डोक्याला मार लागल्याची तक्रार घेऊन आलेल्या लोकांपैकी ७७ टक्‍के लोक माइल्ड टीबीआय असलेले होते. अनेक जण डोक्याला दुखापत झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून घेत नाहीत. लक्षणे फारशी गंभीर नाहीत असा विचार ते करतात. मात्र, वेळच्यावेळी तपासणी व निदान प्राप्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर निदान झाल्याने लोकांना आवश्यक ती देखभाल मिळण्यास मदत होते, ज्यामुळे दीर्घकालीन परिणाम टाळता येतात.”

अॅबॉटची टीबीआय चाचणी कंकशन्सचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व दीर्घ प्रतीक्षा कालावधी, रेडिएशनचा संपर्क व उपलब्धता आणि दळणवळणाच्या समस्यांसारख्या मर्यादा असलेल्या पारंपरिक पद्धतींसाठी एक महत्वाचा पर्याय पुरवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button