मुलांना न्युमोकॉक्कल बॅक्टेरियल संसर्गापासून अधिक व्यापक संरक्षण पुरविणारी अॅबॉटची १४

News Service

व्हॅलेन्ट न्युमोकॉक्कल कन्ज्युगेट लस (PCV-14) बाजारात दाखल

  • न्युमोशील्ड १४ द्वारे अॅबॉट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस (PCV-14) बाजारात दाखल करत आहे, जी ६ आठवड्यांवरील वयाच्या मुलांना सर्वाधिक स्ट्रेन्सपासून संरक्षण पुरविणारी आहे
  • न्युमोकॉक्कल लसींमुळे न्युमोनिया आणि मॅनेन्जायटिससह वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाजन्य संसर्गांची
    समस्या हाताळण्यास मदत होईल, ज्यांचा धोका दोन वर्षांखालील वयोगटातील मुलांना अधिक असतो
  • न्युमोशील्ड १४ मध्ये अंतर्भूत १४ स्ट्रेन्समुळे भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या न्युमोकॉक्कल लसींपेक्षा अधिक
    व्यापक संरक्षण

मुंबई, भारत, २७ नोव्हेंबर २०२४ – जागतिक स्तरावरील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी अॅबॉटने आज
न्यूमोशील्ड १४ (PneumoShield 14) ही ६ आठवड्यांवरील वयाच्या मुलांसाठीची न्युमोकोक्कल कॉन्ज्युगेट
व्हॅक्सिन बाजारात दाखल केल्याची घोषणा केली. ही लस सध्या दिल्या जाणाऱ्या PCV-10 आणि PCV-13
या लसींच्या तुलनेत अधिक व्यापक संरक्षण पुरविणारी असून सर्वाधिक सिरोटाइप्स किंवा स्ट्रेन्ससाठी
परिणामकारक ठरणारी आहे.

इथे स्ट्रेन म्हणजे एखाद्या सूक्ष्मजीवसंस्थेचा जनुकीय किंवा संरचनात्मकदृष्ट्या भिन्न प्रकार किंवा उपप्रकार.
अॅबॉटच्या न्युमोशिल्ड १४ लसीला दिले गेलेले PCV-14 हे नाव ही लस न्युमोनियल बॅक्टेरियाच्या १४
वेगवेगळ्या उपप्रकारांपासून संरक्षण देऊ करते या माहितीकडे निर्देश करणारे आहे. कॉन्जुगेट लस म्हणजे एक
विशिष्ट प्रकारची लस जिला अधिक परिणामकारक बनविण्यासाठी तिच्यामध्ये बॅक्टेरियाचा एक भाग एका
प्रोटीनशी जोडला जातो. यामुळे रोगप्रतिकारशक्तीला बॅक्टेरियाची ओळख पटवून घेत त्याच्याशी लढा
देण्याच्या कामी मदत मिळते व विशेषत: मुलांना गंभीर स्वरूपाचे आजार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या
विशिष्ट संसर्गांचा सामना करण्यासाठी ही लस अधिक सक्षम बनते.

पाच वर्षांखालील, विशेषत: दोन वर्षे व त्याहून कमी वयाच्या मुलांना न्युमोकॉक्कल आजाराचा धोका अधिक
असतो. हा आजार बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. न्युमोकॉक्कल संसर्गांची परिणती न्युमोनिया, मेनेन्जायटिस
(मेंदू व मेरुरज्जू अर्थात स्पायनल कॉर्डच्या अवतीभोवतीच्या उतींना सूज येणे), किंवा रक्तातील संसर्ग अशा
अनेक प्रकारच्या स्थितींमध्ये होऊ शकतो, ज्याला एकत्रितपणे इनव्हेजिव्ह न्युमोकॉक्कल डिजिज (IPD) असे
म्हणतात. लसीकरणामुळे मुलांना यापैकी काही संसर्गांपासून संरक्षण मिळू शकते आणि गुंतागूंती उद्भवणे
टाळता येऊ शकते.

—अधिक माहिती—

IPD गटातील आजार हे पाच वर्षांखालील मुलांमधील उच्च मृत्यूदरास कारणीभूत असून भारतामध्ये १४ टक्‍के
मृत्यू या आजारांमुळे होतात.
PCV-14 व्हॅक्सिन सध्या भारतातील खासगी क्लिनिक्स व हॉस्पिटलमधून वापरल्या जाणाऱ्या PCV10 च्या
तुलनेत आणखी पाच स्ट्रेन्सविरोधात व PCV13 च्या तुलनेत आणखी दोन स्ट्रेन्सच्या विरोधात संरक्षण पुरवते.
इंट्रामस्क्युलर इंजेक्शनवाटे दिल्या जाणाऱ्या न्युमोशिल्ड १४ साठी निर्देशित लसीकरण वेळापत्रकानुसार ही
लस ६व्या, १०व्या आणि १४ आठवड्यात दिली जावी.

अॅबॉट इंडिया लि. च्या मॅनेजिंग डायरेक्टर स्वाती दलाल म्हणाल्या, “मुलांना, विशेषत: दोन वर्षांहून कमी
वयाच्या मुलांना न्यूमोकॉक्कल आजारांचा धोका जास्त असतो. यामुळे त्यांच्या निरोगी वाढीमध्ये आणि
विकासामध्ये बाधा येऊ शकते व गुंतागूंती उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. हे नवे संशोधन सध्या संक्रमित होत
असलेल्या १४ न्युमोकॉक्कल स्ट्रेन्सपासून अधिक व्यापक संरक्षण पुरवते जे स्ट्रेन्स भारतातील बहुतांश
न्युमोकॉक्कल संबंधित आजारांना कारणीभूत ठरणारे आहेत. ही लस सादर करणे हे मुलांना निरोगी राहण्यास
मदत करण्यासाठी नाविन्यपूर्ण बालरोग लस देण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील आणखी एक पाऊल आहे.”
मुंबईतील येवाले हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवाले पुढे सांगतात, “लसीकरणामुळे मुलांमध्ये
विशेषत्वाने आढळून येणाऱ्या न्युमोनिया, मॅनेन्यायटिससारख्या न्युमोकॉक्कल-संबंधी आजारांशी लढून त्यांना
परतवून लावणारा एक महत्त्वाचा संरक्षणात्मक उपाय मिळतो. या आजाराच्या निदान व उपचारांतील
आव्हाने लक्षात घेता संबंधित न्युमोकॉक्कल बॅक्टेरिया स्ट्रेन्सच्या अधिक व्यापक समूहाला सामावून घेणाऱ्या
प्रगत लसींची गरज आहे ही उघड बाब आहे. यामुळे मुलांना न्युमोकॉक्कल आजारांपासून अधिक व्यापक संरक्षण
मिळू शकेल.”

न्युमोकॉक्कल लस देशातील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या सरकारच्या राष्ट्रीय
लसीकरण मोहिमेचा भाग आहेत. लस योग्य वेळी दिली जात असल्याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टरांशी
संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button