मुंबई, भारत, ८ जुलै २०२५ – अवघ्या २ सेकंदांमध्ये आराम मिळवून देणारे रेडी-टू-यूज अँटॅसिड औषध डायजीन इन्स्टा ऑन द गो बाजारात दाखल करत अबॉट प्रवासादरम्यानच्या स्वास्थ्य देखभालीची नवी व्याख्या दर्शवत आहे. ‘डायजीन इन्स्टा ऑन द गो’सह अबॉटने वापरासाठी पाण्याशिवाय थेट घेता येण्याजोगे रेडी-टू-यूज औषध बाजारात आणले आहे, जे आजच्या काळातील ग्राहकांच्या वेगवान आयुष्याशी अगदी सहजतेने मेळ साधते. हे औषध अॅसिडिटी, छातीत जळजळणे आणि अपचनापासून झटपट व परिणामकारकरित्या आराम मिळवून देते.

धावपळीची जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींसाठी विकसित करण्यात आलेला हा जलद गुण आणणारा फॉर्म्युला फक्त २ सेकंदांत आपले काम करतो2— अस्वस्थपणा नाहीसा करतो. प्रत्येक १० मिलीचा सॅशे रेडी-टू-यूज आहे आणि अॅसिडिटी व गॅसमुळे अस्वस्थतेवर प्रभावीपणे नेमके काम करतो. हे उत्पादन पाण्याशिवाय, ढवळण्याचे, मोजण्याचे कष्ट न घेता, झटपट घेण्याच्या दृष्टीनेच बनविण्यात आले आहे. डायजिन इन्स्टा ऑन द गो आता ताजेतवाने करणाऱ्या पुदीनाच्या स्वादामध्ये उपलब्ध असून त्याच्या पाच सिंगल-यूज पाकिटांच्या पॅकची किंमत ₹ ५० इतकी आहे.
अबॉटच्या मेडिकल अफेअर्स विभागाचे डायरेक्टर डॉ. जेजो करनकुमार म्हणाले, “अॅसिडिटी ही कामावरच्या धावपळीच्या दिवशी, प्रवासामध्ये किंवा अगदी दररोजच्या प्रवासामध्ये – अशी कुठेही कोणतीही पूर्वसूचना न देता होऊ शकते. हे रेडी-टू-यूज, हाताशी सहज बाळगण्याजोगे सोल्यूशन अवघ्या काही सेकंदांत वेगाने आराम मिळवून देते व त्याचा प्रभाव दोन तासांपर्यंत राहतो. जुनी ओळख असलेल्या ब्रॅण्डच्या विश्वासार्हतेचे पाठबळ लाभलेले हे उत्पादन फिरतीदरम्यानच्या आयुष्याला साजेशा आटोपशीर आकाराच्या, खिशाला परवडण्याजोग्या पाकिटाच्या रूपात कार्यक्षमता आणि आराम मिळवून देण्याची अतुलनीय क्षमता यांचा मेळ साधते.”
अॅसिडिटीच्या व्यवस्थापनासाठी झटपट, कुणाच्या लक्षात येऊ न देता घेता येण्याजोग्या व प्रवासात जवळ बाळगायला सोयीच्या उपाययोजनांची मागणी वाढत असल्याचे या ग्राहकांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले होते. ग्राहकांकडून मिळालेल्या याच माहितीमध्ये या औषधाच्या नव्या स्वरूपाचे मूळ खोलवर रुजलेले आहे. या सखोल माहितीनेच अबॉटला अॅसिडिटीपासून आराम मिळवून देणाऱ्या उपायाची नव्या स्वरूपात कल्पना करण्याचा मार्ग दाखवला, परिणामी आधुनिक जीवनशैलींच्या उत्स्फूर्त आणि सदा धावत्यापळत्या स्वरूपाला साजेसा पाण्याशिवाय घेता येण्याजोगा, सिंगल-यूज सॅशे साकारला. ग्राहकांना नेमकी कोणती गोष्ट त्रासदायक वाटते, ते कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतात हे लक्षपूर्वक ऐकत अबॉटने एक असे सोल्यूशन तयार केले आहे, जे आजच्या वेगवान जगाच्या गरजा फक्त पुरवित नाही तर त्यांचा अंदाजही बांधते.
या उत्पादनाचे बाजारातील पदार्पण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी डायजीनने “अॅसिडीटी कहीं भी हो डायजीन इन्स्टा ऑन द गो” ही अतिशय प्रभावी, एकात्मिक जाहिरात मोहीमही सुरू केली आहे. सर्वप्रथम डिजिटल माध्यमांत प्रकाशित झालेला हा उपक्रम आउटडोअर अॅक्टिव्हेशन्स, किरकोळ विक्रीकेंद्रे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स अशा सर्व स्तरांमध्ये राबविला जात आहे, जेणेकरून जिथे हे उत्पादन पोहोचणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे तिथे ते लोकांच्या पाहण्यात यावे. या मोहिमेत मल्टिप्लेक्स फिल्म, बस फिल्म आणि अॅडव्हेन्चर फिल्मसारख्या मनोवेधक फिल्म्सचाही समावेश आहे.
डायजीन इन्स्टा ऑन द गो हे भारताचा पहिल्या क्रमांकाचा अँटॅसिड ब्रॅण्ड डायजीनच्या मालिकेतील नवीन उत्पादन आहे, जे ग्राहकांना अॅसिडीटी बरी करण्याचा आणखी एक पर्याय देऊ करते. आता भारताच्या सर्व प्रमुख फार्मसीजमध्ये व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेले डायजीन इन्स्टा ऑन द गो डायजीन जेल आणि टॅब्लेट्ससह अॅबॉटच्या अँटँसिड औषधांच्या विश्वासार्ह श्रेणीला पूरक असे उत्पादन आहे.