अॅबॉट या जागतिक आरोग्यसेवा अग्रणी कंपनीने इंटरनॅशनल कार्डिओ-रेनल रिस्क अॅसेसमेंट अँड स्ट्रॅटिफिकेशन (आयसीआरएएस) टूलच्या लाँचची घोषणा केली. हे नाविन्यपूर्ण वेब-आधारित टूल भारतभरातील डॉक्टरांना टाइप २ डायबेटिस मेलिटस (टी२डीएम) असलेल्या व्यक्तींमधील हृदय व मूत्रपिंड आजारांचा धोका ओळखण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
डॉ. संजय कालरा, डॉ. व्ही. मोहन, डॉ. अतुल धिंग्रा, डॉ. दीप दत्ता, डॉ. दिनेश खुल्लर, डॉ. जोथिदेव केशवदेव, डॉ. के. डी. मोदी, डॉ. मानस पी. बरुआ, डॉ. नितीन कपूर, डॉ. प्रमिला कालरा, डॉ. शैला शेख आणि डॉ. टिनी नायर या प्रख्यात तज्ञ पॅनेलच्या मार्गदर्शनासह विकसित करण्यात आलेले आयसीआरएएस टूल डॉक्टरांना टी२डीएम असलेल्या व्यक्तींमधील हृदय व मूत्रपिंड आजारांचा धोका ओळखण्यास मदत करेल. आजाराची जोखीम सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून, या टूलचा रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा करण्याचा आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्याचा मनसुबा आहे.
भारताला अनेकदा “जगातील मधुमेहाची राजधानी” म्हणून संबोधले जाते, जेथे सध्या १०१ दशलक्ष व्यक्ती मधुमेहाने पीडित आहेत¹. टाइप २’ मधुमेहाच्या सर्वात सामान्य आणि गंभीर गुंतागुंतींमध्ये हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार मुख्य आहेत². म्हणून आजाराची जोखीम लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. कार्तिक पीतांबरन म्हणाले:
”अॅबॉट संपूर्ण आरोग्यसेवा परिसंस्थेत मधुमेहासंदर्भात दिल्या जाणाऱ्या केअर सेवेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहे. यासाठी, आम्ही आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत सहयोग करत योग्य रूग्ण तपासणी करत आहोत आणि वैद्यकीय निष्पत्ती सुधारत आहोत. आयसीआरएएस टूल डॉक्टरांना मधुमेही रूग्णांमध्ये डायबेटिक किडनी डिसीज (डीकेडी), कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) व मेजर अॅडव्हर्स कार्डिओव्हॅस्कुलर इव्हेण्ट्स (एमएसीई)³ होण्याचा धोका लवकर ओळखण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे टूल विशेषत: प्रभावी आहे, कारण ते वेळेवर निर्णय घेण्यास मदत करते, तसेच पुरावा-आधारित उपचारांमध्ये आणि एकूण रूग्ण तपासणीला साह्य करते.”
आयसीआरएएस टूल हे आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण निदर्शक जसे, मुख्य वैद्यकीय चाचणी अहवाल आणि जीवनशैलीतील घटक यांना एकत्रित करते. याद्वारे टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार आणि हृदयविषयक गंभीर घटनांसाठी स्वतंत्र रिस्क स्कोअर तयार केले जातात. हे टूल लिंग-आधारित जोखमींमधील फरक देखील लक्षात घेते, ज्यामुळे प्रत्येक मधुमेही रुग्णाला हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याच्या शक्यतेचा अधिक स्पष्ट आणि वैयक्तिकृत आढावा मिळतो. गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन डिझाइन केलेले हे वेब-आधारित टूल रुग्ण किंवा डॉक्टरांची कोणतीही वैयक्तिक माहिती स्टोअर करत नाही, ज्यामुळे सर्व मूल्यमापन प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित राहते.
मुंबईतील सैफी हॉस्पिटलमधील एण्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शैला शेख:
”मधुमेहाच्या गुंतागुंती अनेकदा रक्तातील साखरेचे उच्च प्रमाण, वाढलेले वजन, इतर आरोग्य समस्या आणि दैनंदिन जीवनशैलीतील सवयी यांच्या एकत्रित परिणामांमुळे उद्भवतात. कालांतराने, मधुमेही रुग्णांमध्ये हे घटक त्यांच्या हृदय आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण निर्माण करू शकतात, जे टाइप २ मधुमेहामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या अवयवांपैकी एक आहेत². टाइप २ मधुमेह असलेल्या जवळपास एक-तृतीयांश व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हृदयविकार असतो², तर ४० टक्के टी२डीएल रुग्णांना क्रॉनिक किडनी डिसीज होतो⁴. सर्वात मोठे आव्हान म्हणजे, ही गुंतागुंत शांतपणे विकसित होत असताना देखील अनेक रुग्णांना सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत आणि ते आरोग्यदायी वाटतात. म्हणून, आजाराच्या जोखमीचे लवकर केलेले मूल्यांकन डॉक्टरांना या समस्या लवकर ओळखण्यास आणि त्या गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपचार करण्यास मदत करू शकते.