‘मीठा खारा’ गुजरातमधील आगरिया समुदायाला संगीतमय मानवंदना आहे
राष्ट्रीय, सप्टेंबर 2025: कोक स्टुडिओ भारत या भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत वारसाला प्रशंसित करणाऱ्या प्लॅटफॉर्मने सीझन ३ चे नवीन गाणे ‘मीठा खारा’ रीलीज केले आहे. नवरात्रीच्या उत्साहपूर्ण भावनेसह सादर करण्यात आलेले हे गाणे सिद्धार्थ अमित भावसार यांनी निर्मिती, संकल्पित व संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये आदित्य गढवी यांचे लोकसंगीत, मधुबंती बागची यांचा मुधर आवाज आणि थानू खान यांचे उत्साहपूर्ण सादरीकरण समाविष्ट आहे. विशेषत: कोक स्टुडिओ भारतसाठी निर्मिती करण्यात आलेले गाणे ‘मीठा खारा’मध्ये स्थानिक लोकसंगीतासह समकालीन आवाजांचा समावेश आहे, जो प्रतिष्ठित खलासीच्या वारसाला अधिक दृढ करतो आणि पुन्हा एकदा गुजरातच्या सांस्कृतिक मूळांना प्रकाशझोतात आणतो.

आगरिया समुदायाच्या ६०० वर्षांच्या जुन्या वारशात रुजलेले गाणे ‘मीठा खारा’ या समुदायाच्या जीवनाला सादर करते. गुजरातमध्ये ‘मीठू’ या शब्दाचा अर्थ मीठ आहे, जे जीवनासाठी आवश्यक आहे, पण अथक मेहनतीमधून मिळते. आगरियांसाठी मीठ हे केवळ उपजीविकेचे साधन नाही तर विरासत आहे, ज्यामध्ये स्थिरता आणि अभिमानाने पुढे जाणारा वारसा आहे. पात्रांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून हे गाणे निदर्शनास आणते की प्रत्येक पिढी या दोन्ही पैलूंना आत्मसात करते, जेथे जे कठोर (खारा) दिसते, वास्तविकत: त्यामध्ये त्यांचा गोड (मीठा) वारसा सामावलेला असतो. म्हणून चिकाटी व ओळखीचे गाणे मीठा खारा सादर करण्यात आले आहे, जेथे समुदायाची भावना काळासह मीठाप्रमाणे कायम राहते.
कोका-कोला आयएनएसडब्ल्यूएचे आयएमएक्स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्स्पेरिअन्स) प्रमुख शंतनू गंगाणे म्हणाले, ”सणासुदीच्या काळात संगीत संस्कृतीशी संलग्न असते. ‘मीठा खारा’सह आमचा आपली परंपरा आणि तरूणांची संगीताशी संलग्न होण्याप्रती आवड यांना समकालीन पद्धतीने एकत्र करण्याचा मनसुबा आहे. कोक स्टुडिओ भारत आदित्य गढवी व मधुबंती बागची यांसारख्या दिग्गज गायकांना थानू खान सारख्या तरूण टॅलेंटसोबत एकत्र येण्यासाठी प्लॅटफॉर्म देते, ज्यामधून वास्तविक गाथा तयार होतात, ज्या भारतभरातील संगीत, संस्कृती व ग्राहकांना एकत्र करतात.”
‘मीठा खारा’च्या जादूमध्ये हे गाणे सादर केलेल्या कलाकारांच्या सहयोगात्मक कलेची भर करण्यात आली आहे. भार्गव पुरोहित यांच्या भावनिक गीतांद्वारे कथेला प्रथम आकार देण्यात आला, ज्यामुळे गाण्याचा प्रामाणिक पाया रचण्यात आला. यावर आधारित सिद्धार्थ अमित भावसार यांनी आगरिया समुदायाची गाथा प्रकाशझोतात आणली, त्यांचे कष्ट व वारशाला शक्तिशाली संगीतमय कथेत रूपांतरित केले. आदित्य गढवी यांनी या गाण्याला मधुर आवाज दिला आहे, तर मधुबंती बागची यांनी गाण्यामध्ये कोमलतेची भर केली आहे, ज्यामुळे गाण्यामधील भावनिकता वाढली आहे. या सर्वांसह थानू खान यांनी त्यांच्या विशिष्टतेची भर केली आहे, ज्यासह हे गाणे अप्रतिम झाले आहे.
संगीतकार व निर्माते सिद्धार्थ अमित भावसार म्हणाले, ”मीठा खारा गाणे लोकगीतामधून आले आहे. आम्ही सरळसाधी सुरूवात केली आणि कथेमधून मार्गदर्शन घेत ताल व वाद्यांसह गाणे तयार केले. गाण्यामधील प्रत्येक आवाज उद्देशपूर्ण, परंपरेशी निगडित असण्याची, तसेच संगीतामधून वारसाचा अनुभव मिळण्याची संकल्पना होती.”
भार्गव पुरोहित म्हणाले, ”या गाण्याचे लेखन करणे सन्मान होता, कारण मला आगरिया समुदायाच्या अनुभवांना शब्दांमध्ये व्यक्त करण्याची संधी मिळाली. कथेमध्ये अभिमान, स्थिरता व परंपरा सामावलेली आहे आणि मला गाण्याच्या बोलामधून साधेपणा व प्रामाणिकपणासह सत्य मांडायचे होते. कोक स्टुडिओ भारतच्या माध्यमातून हा अनुभव प्रत्यक्षात सादर केला जाण्याचा आनंद होत आहे.”
आदित्य गढवी म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारतसोबत काम करताना पुन्हा एकदा खास वाटले. ‘मीठा खारा’सह आम्ही खलासीसह सुरू केलेल्या प्रवासाला पुढे घेऊन जात आहोत, गुजरातच्या लोककथांना नवीन स्वरूपात सादर करत आहोत. या गाण्याची निर्मिती करण्याचा आनंद अद्वितीय होता. हे गाणे आमच्या संस्कृतीचे पैलू आणि आमच्या लोकांच्या अभिमानाला सादर करते.”
मधुबंती बागची म्हणाल्या, ”माझ्यासाठी ‘मीठा खारा’ माझ्या कलेला वास्तविक स्वरूपात सादर करण्याची संधी होती. संगीतकार म्हणून मी अनेकदा संधींचा शोध घेते, जेथे मी तंत्रासह भावना, परंपरेसह व्यक्तिमत्त्व एकत्र करू शकते आणि कोक स्टुडिओ भारतने मला ती संधी दिली. यामुळे मला या गाण्यामध्ये माझा स्वत:चा आवाज, स्वत:चे अनुभव आणि स्वत:च्या कौशल्याची भर करता आली, ज्यामुळे हे गाणे अप्रतिम बनले आहे, जे कलाकार म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाला अनुकूल आहे.”
थानू खान म्हणाले, ”तरूण कलाकार असल्याने माझे कोक स्टुडिओ भारतचा भाग असणे स्वप्न होते. ‘मीठा खारा’च्या पैलूमध्ये माझ्या संगीत कौशल्याची भर करणे सन्मान आहे, जो सदैव माझ्या स्मरणात राहिल.”
कोक स्टुडिओ भारत प्रत्येक गाण्याला आपलेपणाच्या क्षणामध्ये बदलत प्रेक्षकांशी कनेक्ट होते. खलासीच्या यशानंतर सीझन ३ प्रतिष्ठित गायक आणि उदयोन्मुख टॅलेंटला एकत्र आणत देशाच्या संगीतमय वारसाला प्रशंसित करत आहे. समकालीन पैलू व परंपरेला एकत्र करत कोक स्टुडिओ भा