एजिलेंट टेक्नॉलॉजीजकडून मुंबईत कस्टमर एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन

News Service

– एजिलेंट टेक्नॉलॉजीज इंक. (NYSE: A)ने आज मुंबईत आपले कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर (सीईसी) आणि कार्यालयाच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. यासह कंपनीने भारतातील आपल्या दीर्घकालीन कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे, तसेच देशातील लाइफ सायन्सेस, फार्मास्युटिकल आणि उपयोजित बाजारपेठांमधील ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ केले आहेत.

हे कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर भारतातील एजिलेंटच्या वाढीच्या पुढील टप्प्याला सादर करते. या केंद्राने आधुनिक व एकात्मिक सुविधेत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, उपयोजन कौशल्‍य आणि व्यावसायिक कामकाज एकत्र आणले आहे. उद्घाटनाचा भाग म्हणून फार्मास्‍युटिकल्‍स, बायोफार्मा, डायग्नोस्टिक्स, रसायने, अन्‍न सुरक्षा आणि पर्यावरण चाचणी क्षेत्रातील ग्राहकांनी या केंद्राला भेट दिली, विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला आणि प्रयोगशाळेतील वास्तविक आव्हानांवर मात करणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

हे कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर जगभरातील प्रमुख नाविन्यपूर्ण केंद्रांमध्ये सेंटर्स ऑफ एक्सलन्स आणि अनुभव केंद्रे उभारण्याप्रती एजिलेंटच्या जागतिक गुंतवणुकीचा भाग आहे. भारतात हे केंद्र मानेसर येथील इंडिया सोल्यूशन सेंटर, रिफर्बिशमेंट सेंटर आणि हैदराबाद येथील बायोफार्मा एक्सपिरियन्स सेंटर यांच्‍यासोबत कंपनीच्या विस्ताराला गती देईल. यामुळे स्थानिक वैज्ञानिक गरजांना जागतिक तज्ज्ञता आणि सर्वोत्तम पद्धतींशी जोडणारे नेटवर्क तयार होईल.

“एजिलेंटमध्ये आम्‍ही जागतिक व स्थानिक स्तरावर देत असलेल्या सेवांमध्‍ये ग्राहक अनुभवाला प्राधान्‍य देतो” असे एजिलेंट टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि चीफ कमर्शियल ऑफिसर जोनाह कर्कवुड म्‍हणाले. “मुंबईतील या कस्टमर एक्सपिरियन्स सेंटरमधून धोरणात्मक बाजारपेठ आणि क्षमता केंद्र म्हणून भारतातील आमची सातत्यपूर्ण गुंतवणूक दिसून येते. प्रात्यक्षिके, सहयोग आणि स्थानिक तज्ज्ञता यांना एकत्र आणून आम्ही ग्राहकांना त्यांच्या निरीक्षणांतून झपाट्याने परिणाम साधण्यास सक्षम करत आहोत, ज्याला एजिलेंटकडून जगभरात अपेक्षित असलेल्या उच्‍च दर्जाच्या अनुभवाचे पाठबळ आहे.”

भारतातील एजिलेंटची गुंतवणूक एकात्मिक आणि ग्राहक-केंद्रित मॉडेल डिझाइन करण्याच्या त्यांच्या व्यापक जागतिक धोरणाचा भाग आहे, जे विश्‍लेषणात्मक आणि उपयोजन जीवनचक्रादरम्यान प्रयोगशाळांना मदत करते. एजिलेंटचे कार्यालय आणि कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर एकाच ठिकाणी असल्याने ग्राहक व स्थानिक टीम्‍स यांच्‍यामधील सहयोग अधिक मजबूत होईल, ज्यामुळे सखोल तंत्रज्ञान संवाद आणि अधिक प्रभावी माहितीची देवाणघेवाण करणे शक्य होईल.

“भारतातील फार्मा आणि उपयोजित बाजारपेठा वेगाने विकसित होत आहेत, ज्यामध्ये गुणवत्ता, अनुपालन आणि प्रगत विश्‍लेषणात्मक क्षमतांवर अधिक भर दिला जात आहे,” असे एजिलेंट टेक्नॉलॉजीजचे आशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष भारत भारद्वाज म्‍हणाले. “मुंबईतील कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर भारतभरातील ग्राहकांना आम्ही देत असलेल्या पाठबळाला अधिक सक्षम करेल, ज्‍यामुळे त्‍यांना प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वैज्ञानिक व व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करता येतील “

“हे नवीन कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर जागतिक विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनात प्रमुख योगदानकर्ता म्हणून भारताप्रती असलेली एजिलेंटची कटिबद्धता अधिक दृढ करते,” असे एजिलेंट टेक्नॉलॉजीजचे इंडिया कंट्री जनरल मॅनेजर नंदकुमार कलथिल म्‍हणाले. “ग्राहक आणि एजिलेंटच्या तज्ज्ञांना एकाच एकात्मिक वातावरणात एकत्र आणून आम्ही क्षमता निर्मिती, सहयोग आणि दीर्घकालीन भागीदारीला पाठिंबा देत आहोत, ज्यामुळे भारतातील प्रयोगशाळा परिसंस्थेची प्रगती होईल.”

भारत फार्मास्‍युटिकल्‍स, बायोफार्मा, डायग्नोस्टिक्स, रसायने, अन्‍न सुरक्षा आणि पर्यावरण चाचणी या क्षेत्रांमध्ये आपली भूमिका विस्तारत आहे. यामुळे विश्वासार्ह डेटा, नियमांचे पालन करणारी कार्यपद्धती आणि आधुनिक प्रयोगशाळा पद्धतींच्या मागणीत वाढ होत आहे. मुंबईतील कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर प्रत्यक्ष शिक्षण, उपयोजन-केंद्रित चर्चा आणि वास्तविक कार्यपद्धतींच्या प्रात्यक्षिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते, जे ग्राहकांना बदलत्या वैज्ञानिक आणि नियामक गरजांनुसार सज्ज होण्यास मदत करते.

ग्राहक अनुभव, पायाभूत सुविधा आणि स्थानिक क्षमतांमधील सतत गुंतवणुकीच्‍या माध्‍यमातून एजिलेंट जीवनाचा दर्जा सुधारणाऱ्या विज्ञानाला पाठबळ देण्याचे आपले ध्येय पुढे नेत आहे. याद्वारे कंपनी आपल्या जागतिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील भारताचे अधिक भरीव योगदान करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button