- सस्टेनेबल सायन्स आणि परवडणाऱ्या इनोव्हेशनला चालना
- नव्या सुविधेमुळे एजिलेंटची सस्टेनेबिलिटीविषयक बांधिलकी आणि ग्राहकांशी नाती अधिक दृढ; ग्रीन-सर्टिफाइड परिसरात एज्युकेशन सेंटरचीही सुरुवात
मानेसर, हरियाणा, 18 डिसेंबर 2025: लाईफ सायन्सेस, डायग्नॉस्टिक्स आणि अप्लाइड केमिकल सेक्टरमधील जागतिक अग्रणी कंपनी एजिलेंट टेक्नॉलॉजीज इन्क. (NYSE: A) यांनी आज हरियाणातील मानेसर येथील त्यांच्या LEED प्लॅटिनम-प्रमाणित परिसरात इंडिया रिफर्बिशमेंट सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारात सस्टेनेबल सायन्स आणि परवडणाऱ्या उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला हा एजिलेंटचा रणनीतिक गुंतवणूक निर्णय आहे.
नवे इंडिया रिफर्बिशमेंट सेंटर एजिलेंटची ‘सर्टिफाइड प्री-ओन्ड’ उपकरणे उपलब्ध करून देईल. ही उपकरणे फॅक्टरी-स्तरीय मानकांनुसार पुन्हा तयार करण्यात आलेली असून त्यांना एजिलेंटची मानक वॉरंटी मिळेल. यामुळे प्रयोगशाळांना प्रगत तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि किफायतशीर दरात मिळेल, तसेच भारतातील उच्च दर्जाच्या वैज्ञानिक उपाययोजनांची वाढती गरज पूर्ण होईल.

याअंतर्गत एजिलेंटचा ‘ट्रेड-इन आणि बायबॅक प्रोग्राम’ ही उपलब्ध असेल, ज्यामध्ये ग्राहक आपली जुनी उपकरणे परत देऊन रोख रक्कम किंवा नवीन एजिलेंट उपकरणांच्या खरेदीवर क्रेडिट मिळवू शकतील. या प्रक्रियेत रिव्हर्स लॉजिस्टिक्स म्हणजे डी-इन्स्टॉलेशन, पॅकेजिंग आणि शिपिंग या सर्व सेवा समाविष्ट आहेत. पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी, जिथे शक्य असेल तिथे पुन्हा वापरता येणाऱ्या (रीयूजेबल) पॅलेट-आधारित पॅकेजिंगचा वापर केला जाईल. एजिलेंट ही संपूर्ण टेक-बॅक आणि रिफर्बिशमेंट प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंडपणे व्यवस्थापित करते. जागतिक पातळीवर हा कार्यक्रम 14 प्रोडक्ट लाईन्समधील 200 हून अधिक उत्पादनांना कव्हर करतो.
ग्राहकांना मदत करण्यासाठी एजिलेंटने ‘एजिलेंट फायनान्शियल सोल्युशन्स’ आणि ‘इन्स्ट्रुमेंट रेंटल प्रोग्राम’**सारख्या लवचिक सुविधा देखील सादर केल्या आहेत. भांडवली मर्यादा किंवा बजेट अडचणींवर मात करून बदलत्या तंत्रज्ञानाशी अद्ययावत राहण्यास प्रयोगशाळांना मदत करणे हा यांचा उद्देश आहे.
ग्राहक ‘पे-फॉर-यूज’ (वापरानुसार देय) किंवा ‘पे-टू-ओन’ (हप्त्यांमध्ये खरेदी) असे पर्याय निवडू शकतात. या सर्वांवर एजिलेंटची सेवा आणि वॉरंटीचा पूर्ण विश्वास मिळतो. हे पर्याय रिफर्बिशमेंट उपक्रमाला अधिक बळकटी देतात, ज्यामुळे सर्व आकारांच्या प्रयोगशाळांसाठी तंत्रज्ञान परवडणारे आणि सुलभ होते.
या विस्ताराअंतर्गत एजिलेंटने ‘इंडिया एज्युकेशन सेंटर’चेही उद्घाटन केले आहे. येथे जागतिक मानकांनुसार हँड्स-ऑन ट्रेनिंग, कौशल्य विकास आणि ज्ञानवाटपाच्या सुविधा उपलब्ध असतील. या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या ‘इंडिया सोल्युशन सेंटर’ सोबत मिळून, हा संपूर्ण परिसर आता ग्राहकांसाठी एकाच छताखाली सर्व उपाय उपलब्ध करून देईल.
एजिलेंट टेक्नॉलॉजीजमधील आशिया-पॅसिफिक क्षेत्राचे व्हाइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर भारत भारद्वाज म्हणाले, “भारत एजिलेंटसाठी रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ग्रोथ मार्केट आहे. आमच्या रिफर्बिशमेंट सेंटरचा प्रारंभ ‘सस्टेनेबल सायन्स’ प्रती आमची बांधिलकी दर्शवतो. एकाच छताखाली सर्टिफाइड प्री-ओन्ड सोल्युशन्स, प्रगत शिक्षण आणि एकात्मिक वर्कफ्लो एकत्र आणून आम्ही असे इकोसिस्टम उभारत आहोत जे किफायतशीर असण्याबरोबरच इनोव्हेशनलाही चालना देते.”
एजिलेंट टेक्नॉलॉजीज इंडिया चे कंट्री जनरल मॅनेजर नंदकुमार कलाथिल म्हणाले, “ग्राहकांशी आमची नाती अधिक दृढ करणे आणि भारताच्या वैज्ञानिक व सस्टेनेबिलिटी उद्दिष्टांना पूरक असे उपाय देणे हे आमचे ध्येय आहे. हे गुंतवणूक निर्णय भारताप्रती एजिलेंटची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवतात. प्रगत साधने, प्रशिक्षण आणि पर्यावरणाबाबत जबाबदार पद्धती यांद्वारे ग्राहकांना सक्षम करणे हे आमचे व्हिजन आहे.”
एजिलेंटच्या अप्लाइड मार्केट्स ग्रुपचे व्हाइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर वॉरेन पॉट्स म्हणाले, “इंडिया रिफर्बिशमेंट सेंटरची सुरुवात वैज्ञानिक समुदायात ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ ला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता आम्ही सर्टिफाइड प्री-ओन्ड उपकरणे उपलब्ध करून देत आहोत. यामुळे प्रयोगशाळांना त्यांच्या सस्टेनेबिलिटी उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करता येतो. ही पुढाकार ‘जबाबदार इनोव्हेशन’ आणि ग्राहकांच्या यशाप्रती एजिलेंटची जागतिक बांधिलकी अधोरेखित करतो.”
ग्रीन-सर्टिफाइड सुविधेमध्ये सीपीओ उपकरणे, प्रशिक्षण आणि वर्कफ्लो यांचे एकत्रीकरण करून एजिलेंट भारतात ‘कस्टमर एंगेजमेंट’ आणि ‘सस्टेनेबल इनोव्हेशन’ साठी नवा बेंचमार्क स्थापन करत आहे.