- हा स्टुडिओ अत्याधुनिक सॅमसंग डिवाईसेसदम्यान असलेल्या विनासायास परस्पर कार्यक्षमतेला दाखवतो, ज्यामधून बी२बी सहयोगींना एकीकृत व्यवसाय सोल्यूशन्सची व्यापक श्रेणी मिळते.
- ६,५०० चौरस फूट जागेवर असलेले शोरूम व्यवसायांना व्यावसायिक क्षेत्रांच्या व्यापक श्रेणीमध्ये शोध, नियोजन व नाविन्यता आणण्यास साह्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
- मुंबईतील सॅमसंग बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ गुरूग्राममधील कंपनीच्या व्यापक एक्झिक्युटिव्ह ब्रिफिंग सेंटर (ईबीसी) नंतर दुसरे केंद्र आहे.
भारत, जुलै १६, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील इंटरनॅशनल बिझनेस पार्कमधील ओबेरॉय कॉमर्झ-२ च्या २८व्या मजल्यावर अत्याधुनिक बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ (बीईएस) लाँच केला आहे.

हा भविष्य-केंद्रित स्टुडिओ बी२बी सहयोगींना एकीकृत व्यवसाय सोल्यूशन्सची व्यापक श्रेणी देण्यासाठी अत्याधुनिक सॅमसंग डिवाईसेसदरम्यान असलेल्या विनासायास परस्पर कार्यक्षमतेला दाखवतो. ६,५०० चौरस फूट जागेवर विस्तारलेले शोरूम व्यवसायांना व्यावसायिक क्षेत्रांच्या व्यापक श्रेणीमध्ये शोध, नियोजन व नाविन्यता आणण्यास साह्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. बीईएस, मुंबई गुरूग्राममधील सॅमसंगच्या विस्तृत एक्झिक्युटिव्ह ब्रिफिंग सेंटर (ईबीसी) नंतर दुसरे केंद्र आहे, जे कंपनीची नाविन्यपूर्ण उत्पादने व बी२बी सोल्यूशन्सना दाखवते.
“सॅमसंगमध्ये आमचा विश्वास आहे की व्यवसायांचे भविष्य सर्वोत्तम अनुभवांशी संबंधित आहे, जे मानवी-केंद्रित, कनेक्टेड व शाश्वत आहे. मुंबईतील बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओमधून हा दृष्टिकोन दिसून येतो. या शोरूममध्ये उद्योजक वास्तविक विश्वातील वातावरणामध्ये आमच्या सर्वात प्रगत एआय-समर्थित नाविन्यतांशी संलग्न होऊ शकतात. स्मार्ट क्लासरूम्सपासून ऑटोमेटेड हॉटेल्सपर्यंत, सर्वोत्तम आरोग्यसेवा साधनांपासून पेपरलेस बँकिंगपर्यंत आम्ही डिजिटल परिवर्तन सक्षम करत आहोत, जे अर्थपूर्ण, कार्यक्षम असण्यासोबत मोठ्या प्रगतीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हा स्टुडिओ तंत्रज्ञानाला दाखवतो, तसेच या स्टुडिओमधून भारतातील व जगभरातील आमच्या सहयोगींसोबत सहयोगाने उद्योजकांचे भविष्य घडवण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले.
मुंबईमध्ये बीईएसच्या लाँचबाबत मत व्यक्त करत महाराष्ट्र सरकारचे माननीय माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार म्हणाले, “आम्ही डिजिटल भारत मिशनला गती देत असताना एआय व व्हीआर सारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान उद्योगांच्या कार्यसंचालन करण्याच्या, संस्थांच्या सेवा देण्याच्या आणि नागरिकांच्या विश्वाचा अनुभव घेण्याच्या पद्धतींना नवीन आकार देत आहेत. मुंबई या परिवर्तंनामध्ये अग्रस्थानी आहे, तसेच नाविन्यता, सहयोग व भविष्यासाठी सुसज्ज परिसंस्थांना चालना देत आहे. सॅमसंगचा बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ या प्रवासामध्ये महत्वपूर्ण भर आहे, जो आमच्या व्यवसायामध्ये जागतिक तंत्रज्ञान नेतृत्व आणेल आणि डिजिटल नाविन्यतेसाठी आघाडीचे हब म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक दृढ करेल.”
मुंबईतील बीईएस स्टार्टअप्स, शाळा, हॉटेल्स, हॉस्पिटल्स व बँका अशा क्षेत्रांमधील क्लायण्ट्सना झोन्सच्या माध्यमातून सर्वोत्तम वॉकथ्रू अनुभव देतो. हे झोन्स वास्तविक विश्वातील स्थितींना दाखवतात, ज्यामुळे ते सर्वसमावेशक व्यवसाय वातावरणांमध्ये डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यास सक्षम होतील.
उदाहरणार्थ, झोन १ मध्ये अभ्यागतांना शिक्षण, रिटेल व फायनान्स आणि आरोग्यसेवा अशा उद्योग क्षेत्रांसाठी डिझाइन करण्यात आलेले सर्वोत्तम सोल्यूशन्स पाहायला मिळतील. स्मार्ट क्लासरूम्स व कॅम्पस सोल्यूशन्समध्ये सॅमसंगचे नेक्स्ट-जनरेशन इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले, टॅब्लेट्स आणि डिजिटल नोटिस बोर्ड्सचा समावेश आहे, जे एकमेकांशी सुसंगत राहत काम करतात. तसेच डिजिटल जाहिरात सोल्यूशन्समधील नाविन्यता, सॉफ्ट पीओएस सिस्टम्स, इंटेलिजण्ट एअर क्वॉलिटी मॅनेजमेंट सिस्टम्स आणि प्रगत डायग्नोस्टिक इक्विपमेंट रिटेल व फायनान्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रांमधील सोल्यूशन्सना साह्य करतात.
झोन २ ची थीम युनिफाईड सोल्यूशन्स आहे, जेथे सॅमसंग स्मार्ट थिंग्ज प्रो कनेक्टेड एआय-पॉवर्ड सिस्टम्ससह मीटिंग रूम्स व हॉटेल रूम्सच्या भविष्याला दाखवते, तर सॅमसंगचा क्रांतिकारी डिस्प्ले ‘द वॉल’ ऑटोमोटिव्ह, सरकार, आदरातिथ्य आणि कॉर्पोरेटमध्ये अनेक स्थितींसाठी स्क्रिनिंग सोल्यूशन्स डिझाइन करतो.
तसेच, मुंबईतील बीईएसच्या झोन ३ मध्ये ग्राहकांना सॅमसंग उत्पादने मायक्रोवेव्ह, साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स, टीव्ही, एसी, फ्रण्ट लोड वॉशिंग मशिन्स असलेले सोल्यूशन्स पाहायला मिळतील, जेथे सह-राहणीमान व स्आर्टअप्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवसायांच्या गरजांची पूर्तता होईल, तसेच व्यावसायिक क्षेत्रांसाठी सिस्टम एसीचे प्रदर्शन देखील आहे. स्मार्ट होम सोल्यूशन्सचा शोध घेत असलेल्या ग्राहकांना झोन ४ मध्ये कनेक्टेड बेडरूम्स, किचन्स व लिव्हिंग रूम्ससंर्भातील सोल्यूशन्स पाहायला मिळतील. तसेच सर्वोत्तम गेमिंग व होम सिनेमा झोन्समध्ये आधुनिक इनोव्हेशन्स पाहायला मिळतील, जे सर्वाधिक मागणी करणाऱ्या तंत्रज्ञान उत्साहींना अचंबित करतील.
स्टुडिओ सुरू असण्याची वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ६ (सोमवार ते शुक्रवार)