सॅमसंग इंडिया नवीन मोबाइल सीटी तंत्रज्ञान पोर्टफोलिओसह रूग्‍ण-केंद्रित इमेजिंगमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यास सज्‍ज

News Service
  • सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि.ची उपकंपनी न्‍यूरोलॉजिकाचा नवीन मोबाइल सीटी पोर्टफोलिओ एआय-सहाय्यक इमेजिंगसह रूग्‍ण-केंद्रित डिझाइनला प्रकाशझोतात आणेल.
  • हे बेडवर इमेजिंग सुविधा देईल, ज्‍यामुळे रूग्‍णांना दुसरीकडे हस्‍तांतरित करण्‍याची गरज दूर होईल, सुरक्षितता वाढेल आणि जलद इमेजिंग करता येईल.
  • हे सोल्‍यूशन्‍स हॉस्पिटल्‍सना आरोग्‍यसेवा पायाभूत सुविधा प्रबळ करण्‍यामध्‍ये आणि निष्‍पत्ती सुधारण्‍यामध्‍ये तृतीयक काळजी सुविधांसह सक्षम करतील.

भारत – ऑगस्‍ट २६, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि.ची उपकंपनी न्‍यूरोलॉजिकासोबत सहयोगाने भारतात आपल्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन मोबाइल सीटी उत्‍पादन पोर्टफोलिओच्‍या लाँचची घोषणा केली आहे. सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि. प्रगत वैद्यकीय इमेजिंग तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी आहे. भारतातील डायग्‍नोस्टिक आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेल्या या नेक्‍स्‍ट-जनरेशन सिस्‍टम्‍समध्‍ये गतिशीलता, एआय-संचालित कार्यक्षमता आणि रुग्ण-केंद्रित डिझाइन यांचे संयोजन आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा प्रदात्यांना कधीही, कुठेही दर्जेदार सेवा देता येईल.

नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या श्रेणीमध्‍ये सेरेटॉम®एलाइट, ओम्‍नीटॉम®एलाइट, ओम्‍नीटॉम® एलाइट पीसीडी आणि बॉडीटॉम®३२/६४ यांचा समावेश आहे. हे प्रत्‍येक उत्‍पादन हॉस्पिटल्‍स व स्‍पेशालिटी सेंटर्सच्‍या वैविध्‍यपूर्ण वैद्यकीय गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. वंचित प्रदेशांसह सर्व प्रांतांमधील सर्व आकाराच्‍या हॉस्पिटल्‍समध्‍ये या उत्‍पादनांच्या अवलंबनाला सक्षम करत सॅमसंग भारतात प्रगत इमेजिंग सर्वांना उपलब्‍ध करून देण्‍यास सज्‍ज आहे.

“सॅमसंग भारतात मोबाइल सीटी सोल्‍यूशन्‍सच्‍या लाँचसह प्रगत वैद्यकीय इमेजिंग अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यासोबत कार्यक्षम व रूग्‍ण-केंद्रित करण्‍याच्‍या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. या नाविन्‍यता तंत्रज्ञानाइतक्‍याच महत्त्वाच्‍या आहेत, तसेच मेट्रो आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये केअरसंदर्भात तफावत दूर करण्‍यासाठी आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना सक्षम करत आहेत. आमचा विश्वास आहे की हा पोर्टफोलिओ भारतातील आरोग्‍यसेवा पायाभूत सुविधेला प्रबळ करेल, स्‍पेशालिटीजमधील वैद्यकीय सर्वोत्तमतेला पाठिंबा देईल आणि मोठ्या प्रमाणात रूग्ण निष्‍पत्ती सुधारण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएमई बिझनेसचे प्रमुख अतंत्र दास गुप्‍ता म्‍हणाले.

सॅमसंगचे मोबाइल सीटी सोल्‍यूशन्‍स इमेजिंग प्रक्रियेच्‍या पद्धतीमधील एक झेप आहे. न्‍यूरो आयसीयू, ऑपरेटिंग कक्ष, आपत्‍कालीन विभाग, ऑन्‍कोलॉजी युनिट किंवा बाल अतिदक्षता विभाग असो रूग्‍णाला प्रत्‍यक्ष स्‍कॅनरची सुविधा देत हॉस्पिटल्‍स जोखीम कमी करू शकतात, वैद्यकीय सुरक्षितता सुधारू शकतात आणि जलदपणे निर्णय घेऊ शकतात. तसेच महत्त्वाचे म्‍हणजे, या सिस्‍टम्‍स महागड्या पायाभूत सुविधांमध्‍ये बदल न करता सुविधांची क्षमता वाढवण्‍यास मदत करतात. यामुळे भारतातील आरोग्‍यसेवा परिसंस्‍थेमध्‍ये प्रगत इमेजिंग अधिक प्रमाणात उपलब्‍ध होण्‍यास मदत होते.

मोबाइल सीटी इमेजिंगमध्‍ये क्रांतिकारी बदल – स्‍मार्ट, अधिक सुरक्षित, अधिक सहजसाध्य
• सेरेटॉम® एलाइट: ३२ सेमी पेशंट ओपनिंग आणि २५ सेमी एफओव्ही असलेला ८-स्लाइस सीटी स्कॅनर २ तासांच्या बॅटरी क्षमतेसह कार्यक्षम इमेजिंग देतो.
• ओम्‍नीटॉम® एलाइट: ४० सेमी पेशंट ओपनिंग व ३० सेमी एफओव्‍हीसह यूएचआर (अल्‍ट्रा हाय रिझॉल्‍यूशन) मोडमध्‍ये १.१२५ मिमी x ८० स्‍लाइस रिकन्‍स्‍ट्रक्‍शन प्राप्‍त करते, तसेच १.५-तासांच्‍या बॅटरी क्षमतेसह वैविध्‍यतेची खात्री मिळते. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, या उत्‍पादनाने न्‍यूरोसर्जिकल कार्यप्रवाहामध्‍ये बदल घडवून आणला आहे, गुंतागूंतीच्‍या प्रक्रिया सहजपणे करण्‍यास मदत होत आहे, जसे डीप ब्रेन स्टिम्‍युलेशन (डीबीएस) अवघ्‍या २ तासांमध्‍ये पूर्ण करते, जेथे पांरपारिकरित्‍या ८ ते १० तास लागतात. तसेच ओम्‍नीटॉम® एलाइट ऑपेरटिंग रूममध्‍ये (ओआर) प्रत्‍यक्ष शस्‍त्रक्रियेनंतर स्‍कॅन करण्‍याची सुविधा देते. या वैशिष्‍ट्यामुळे सर्जन्‍स रक्‍तस्रावासारख्‍या गुंतागूंती त्‍वरित ओळखू शकतात आणि त्‍यावर उपचार करण्‍यासाठी योग्‍य प्रक्रिया करू शकतात. या क्षमतेमुळे रूग्‍णांच्‍या सुरक्षिततेमध्‍ये वाढ झाली आहे आणि पुन्‍हा शस्‍त्रक्रिया करण्‍याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, ज्‍यामधून अधिक कार्यक्षम व प्रभावी शस्‍त्रक्रिया निष्‍पत्तींची खात्री मिळते.
• ओम्‍नीटॉम® एलाइट पीसीडी: उच्‍च दर्जाची इमेज क्‍वॉलिटी, सुधारित निष्‍पत्ती आणि प्रगत आर्टिफॅक्‍ट रिडक्‍शनसाठी फोटॉन काऊटिंग डिटेक्‍टर (पीसीडी) तंत्रज्ञान आहे.
• बॉडीटॉम ३२/६४: ८५ सेमी पेशंट ओपनिंग व ६० सेमी एफओव्‍ही असलेले ३२/६४-स्‍लाइस सीटी स्‍कॅनर संपूर्ण शरीराच्‍या सर्वसमावेशक इमेजिंगसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये लिथियम पॉलिमर बॅटरी आहे, जिची स्‍टँडबाय मोडमध्‍ये जवळपास १२-तासांपर्यंत टिकण्‍याची क्षमता आहे.

कार्यक्षमतेव्‍यतिरिक्‍त सॅमसंगचे मोबाइल सीटी प्‍लॅटफॉर्म्‍स आरोग्‍यसेवेच्‍या भविष्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, जे एआय-सहाय्यक इमेजिंग आणि हॉस्पिटल पीएसीएस व ईएमआर सिस्‍टम्‍ससोबत विनासायास एकीकरण देते. यामधून जलद निदानांची खात्री मिळते, जे अधिक अचूकता देतात आणि देशभरात डिजिटल आरोगय परिवर्तन उपक्रमांना पाठिंबा देतात.

वैद्यकीय उपयोजनांमध्‍ये वाढ
हा पोर्टफोलिओ अनेक वैद्यकीय स्थितींसाठी अनुकूल आहे, जो विविध स्‍पेशालिटीमध्‍ये अचूकता व कार्यक्षमता वाढवतो. न्‍यूरोसर्जरीमध्‍ये हा पोर्टफोलिओ शस्‍त्रक्रिया नियोजन व सत्‍यापनासाठी इंट्राऑपरेटिव्‍ही सीटी देतो, आपत्‍कालीन वैद्यकीय स्थितीमध्‍ये आघात व स्ट्रोक निदानांसाठी त्‍वरित इमेजिंग देतो, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी टीमना सीटी-मार्गदर्शित बायोप्सी, अॅबलेशन आणि ड्रेनेज प्रक्रियांचा फायदा होतो, ऑन्कोलॉजीमध्ये सिस्टम्स ब्रॅकीथेरपी व ट्यूमर रिसेक्शनसाठी इमेजिंगची सुविधा देतात आणि पीडियाट्रिक इमेजिंगसाठी मुले व नवजात बाळांच्‍या गरजांनुसार सुरक्षित आणि कार्यक्षम उपाय देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button