सॅमसंगकडून स्‍मार्ट, गतीशील व सोईस्‍कर लॉण्‍ड्री अनुभव देण्‍यासाठी नवीन बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायर श्रेणी लाँच

News Service
  • एआय वॉश, एआय एनर्जी, एआय इकोबबल™ अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आणि कपड्यांचा लोड हस्‍तांतरित न करण्‍याच्‍या सोयीसुविधेसह ही ऑल-इन-वन वॉशर ड्रायर श्रेणी सर्व ऋतूंमध्‍ये कपड्यांची स्‍मार्ट, कार्यक्षम व वैयक्तिकृत काळजी घेण्‍याची खात्री देते.
  • यामधील स्‍वच्‍छता व केअर संबंधित वैशिष्‍ट्ये, जसे एअर वॉश, स्‍मार्टथिंग्‍ज™ एकीकरण आणि रिंकल प्रीव्‍हेण्‍ट या वॉशर ड्रायरला उन्‍हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो वर्षभर कपड्यांची काळजी घेण्‍यासाठी उत्तम निवड बनवतात.
  • ६३९९० रूपये किमतीपासून उपलब्‍ध असलेला बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायर कॉम्‍बो ग्राहकांना प्रत्‍यक्ष फायदा देणाऱ्या मूल्‍यांद्वारे संचालित आहे: ईजी, सेव्‍ह आणि केअर.

भारत – सप्‍टेंबर ३, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज नवीन बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायर (१२ किग्रॅ वॉश / ७ किग्रॅ ड्राय)च्‍या लाँचची घोषणा केली, जो आधुनिक काळातील भारतीय कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. सॅमसंगचा नवीन १२ किग्रॅ वॉशर ड्रायर कॉम्‍बो नो लोड ट्रान्सफर, ऑल-वेदर लॉण्‍ड्री आणि एकाच एकीकृत युनिटमध्‍ये इंटेलिजण्‍ट फॅब्रिक केअर देतो, ज्‍यामुळे हा मोठ्या कुटुंबांसाठी व शहरी घरांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला जागेची बचत करणारा अप्‍लायन्‍स आहे.

सॅमसंग इंडियाने नुकतेच केलेल्‍या ग्राहक संशोधनानुसार वॉशर ड्रायर्ससाठी मागणी वाढत आहे, जेथे कुटुंबं सर्व ऋतूंमध्‍ये कपड्यांचे धूळ व जंतूंपासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न आणि एअर-ड्राइंगच्‍या प्रयत्‍नाची बचत करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. या परिवर्तनामधून विशेषत: जास्‍त कपडे धुण्‍याचे व्‍यवस्‍थापन करावे लागणाऱ्या आणि कपडे सुकवण्‍यासाठी मर्यादित जागा असलेल्‍या कुटुंबांमध्‍ये कार्यक्षमता व सोयीसुविधेचे संयोजन असलेल्‍या अप्‍लायन्‍सेससाठी मागणी वाढत असल्‍याचे दिसून येते. सॅमसंगची बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायर्सची श्रेणी या बदलत्‍या प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी वर्षभर कपड्यांचा भार हस्‍तांतरित न करण्‍याची आणि सोईस्‍कर कपडे धुण्‍याची व सुकवण्‍याची सुविधा देते. ही श्रेणी प्रत्‍यक्ष ग्राहकांना फायदा देणाऱ्या मूल्‍यांद्वारे संचालित आहे: ईजी, सेव्‍ह आणि केअर.

सॅमसंगच्‍या नवीन एकीकृत वॉशर ड्रायर कॉम्‍बोमधील वॉशर व ड्रायरदरम्‍यान ‘नो-लोड ट्रान्‍सफर’ आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना अप्‍लायन्‍समधून कपडे प्रत्‍यक्ष क्लोदिंग लाइनमध्‍ये टाकता येतात.

तसेच, कपडे सुकवण्‍याच्‍या बाबतीत हवामानावर अवलंबून राहावे लागत नाही. उन्‍हाळा, हिवाळा किंवा पावसाळा असो बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायरसह कपडे धुण्‍याची आणि सुकवण्‍याची काळजी घेण्‍यात आली आहे. यामधील एआय वॉश वैशिष्‍ट्यामध्‍ये कपडे धुण्‍याची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी आणि अपव्‍यय कमी करण्‍यासाठी प्रगत फाइव्‍ह-स्‍टेप सेन्सिंग आहे. ही वैशिष्‍ट्ये प्रत्‍येक भारामधील कपड्यांचे वजन व कोमलता ओळखते, कपड्यांवरील डागांच्‍या पातळीचे निरीक्षण करते आणि पाणी व डिटर्जंट पातळ्यांना सानुकूल करत त्‍वरित व कार्यक्षमपणे सर्वोत्तम वॉश करते. ऑटो डिस्‍पेन्‍स वैशिष्‍ट्ये आपोआपपणे प्रत्‍येक भारासाठी योग्‍य प्रमाणात डिटर्जंट व सॉफ्टनर रीलीज करते, ज्‍यामुळे ग्राहकांना अधिक किंवा कमी प्रमाणात डिटर्जंट वापरण्‍याबाबत चिंता करावी लागत नाही. हे वैशिष्‍ट्य जवळपास एक महिना कपडे धुण्‍यासाठी पुरेसे डिटर्जंट सामावून घेते, ज्‍यामुळे प्रत्‍येक वेळी कपडे धुतल्‍यानंतर डि‍टर्जंट टँक पुन्‍हा भरण्‍याची गरज भासत नाही. एआय कंट्रोल वैशिष्‍ट्य तुमची कपडे धुण्‍याची सवय लक्षात ठेवत, वॉश चक्रांबाबत सल्‍ला देत आणि वेळेवर माहिती दाखवत कपडे धुणे वैयक्तिकृत करते.

नवीन सॅमसंग वॉशर ड्रायर्समध्‍ये एआय एनर्जी वैशिष्‍ट्य आहे, जे वीजेचा वापर जवळपाास ७० टक्‍क्‍यांनी कमी करण्‍यास मदत करतात. नवीन वॉशर ड्रायर्समधील डिजिटल इन्‍व्‍हर्टर तंत्रज्ञान ग्राहकांना उत्तम ऊर्जा कार्यक्षमता*, कमी आवाज आणि दीर्घकाळपर्यंत कार्यक्षमतेमधून फायदा देते. सॅमसंगचे नवीन वॉशर ड्रायर्स उल्‍लेखनीय टिकाऊपणा देखील देतात, ज्‍यांना २० वर्ष वॉरंटीचे पाठबळ आहे. यामधील सुपरस्‍पीड वैशिष्‍ट्य संपूर्ण कपडे फक्‍त ३९ मिनिटांमध्‍ये धुते, उत्तम स्‍वच्‍छता देण्‍यासह कपड्यांचे संरक्षण करते.

वॉशर ड्रायर्सची नवीन श्रेणी एआय इकोबबल™ तंत्रज्ञानासह येते, जे डाग काढण्‍याच्‍या क्षमतेला जवळपास २० टक्‍क्‍यांनी वाढवत कपडे धुण्‍याची क्षमता वाढवते, तसेच कपड्यांवर सौम्‍य देखील असते. एअर वॉश वैशिष्‍ट्य कपड्यांना वॉशिंग, वॉइलिंग, स्‍क्रबिंग न करता किंवा डिटर्जंटचा वापर न करता दुर्गंधी दूर करत सुगंधित ठेवते, ज्‍यामुळे कपड्यांना सुगंध येतो. शेवटचे म्‍हणजे, स्‍मार्टथिंग्‍ज™ रिंकल प्रीव्‍हेण्‍ट वैशिष्‍ट्य वाळलेल्‍या कपड्यांवर सुरकुत्‍या न येण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे कपड्यांना इस्‍त्री करण्‍याचा त्रास दूर होतो.

”आमची नवीन बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायर श्रेणी आधुनिक जीवनशैलीला समजून घेते, सोयीसुविधा देते आणि दररोज कपडे धुण्‍याच्‍या क्रियेला स्‍मार्ट व अधिक कार्यक्षम करते. सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये हवामान बदलामधील अनिश्चिचता वाढत असताना आणि ग्राहकांना उच्‍च प्रदूषण व धूळीसह संघर्ष करावा लागत असताना आधुनिक काळातील राहणीमानासाठी परिपूर्ण सोल्‍यूशन देतात. सॅमसंगचे बीस्‍पोक एआय तंत्रज्ञान कपड्याचा प्रकार व भारानुसार वॉश चक्र सानुकूल करण्‍यासोबत वीज व पाण्‍याची बचत करण्‍यास देखील मदत करते, तसेच स्‍वच्‍छतेची खात्री देते. आमची नवीन श्रेणी कपड्यांच्‍या जास्‍त भाराची हाताळणी करण्‍यासाठी उच्‍च क्षमतेसह डिझाइन करण्‍यात आली आहे, तसेच या श्रेणीमध्‍ये असलेली वैशिष्‍ट्ये वेळेची बचत करतात, कपड्यांचे संरक्षण करतात आणि स्‍वच्‍छता राखतात. यामधून ‘ईजी, सेव्‍ह व केअर’ ही मुलभूत मूल्‍ये दिसून येतात. मला विश्वास आहे की आमचे नवीन सोईस्‍कर, इंटेलिजण्‍ट व कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेस भारतातील कुटुंबांच्‍या कपडे धुण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडवून आणतील, ते अधिक सोपे, गतीशील आणि अधिक विश्वसनीय करतील,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेस बिझनेसचे उपाध्‍यक्ष गुफरान आलम म्‍हणाले.

किमत व उपलब्‍धता
सॅमसंग बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायरची नवीन श्रेणी भारतात Samsung.com, रिटेल आऊटलेट्स आणि आघाडीच्‍या ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध असेल. या श्रेणीची किंमत ६३९९० रूपयांपासून सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button