- सॅमसंग टेलिव्हिजन्स खरेदी केल्यास निवडक बँक कार्ड्सवर जवळपास २० टक्के कॅशबॅक मिळवा.
- ग्राहकांना निवडक टेलिव्हिजन्सच्या खरेदीसह ९२,९९० रूपयांचा सॅमसंग साऊंडबार किंवा जवळपास १,४०,४९० रूपये किमतीचा सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही मोफत मिळू शकतो.
- अतिरिक्त समाधानासाठी सर्व टेलिव्हिजन्सवर ३ वर्षांची वॉरंटी मिळवा.
- जवळपास ३० महिन्यांसाठी प्रतिमहिना ९९० रूपयांपासून सुरू होणारा ईएमआय, ‘१ ईएमआय ऑफ’ आणि झीरो डाऊन पेमेंट पर्यायांसह सुलभ फायनान्सचा आनंद घ्या.
- या ऑफर्स Samsung.com, आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर सुरू आहेत आणि ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडक रिटेल आऊटलेट्सपर्यंत उपलब्ध आहेत.
गुरूग्राम, भारत – सप्टेंबर, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सर्वात मोठी उत्सवी मोहिम ‘सुपर बिग सेलिब्रेशन्स’ची घोषणा केली, ज्यामध्ये व्हिजन एआयद्वारे समर्थित मोठ्या स्क्रिन आकाराच्या प्रीमियम टेलिव्हिजन्सवर अद्वितीय डिल्स व रिवॉर्ड्स मिळतील. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध असलेली ही मोहिम ग्राहकांना यंदा सणासुदीच्या काळात त्यांचा मनोरंजन अनुभव अपग्रेड करण्याची संधी देते. सॅमसंगने या मोहिमेचा भाग म्हणून आपल्या एआय टीव्ही श्रेणीवर विशेष ऑफर्स, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स सादर केले आहेत. ग्राहकांना जीएसटी दरामध्ये कपातीमुळे कमी झालेल्या किमतीचा फायदा देखील मिळेल.

सॅमसंगच्या ‘सुपर बिग सेलिब्रेशन्स’दरम्यान ग्राहक जवळपास ३० महिन्यांपर्यंत प्रतिमहिना फक्त ९९० रूपयांपासून सुरू होणारे ईएमआय, झीरो डाऊन पेमेंट पर्याय आणि ‘१ ईएमआय ऑफ’ ऑफरसह सुलभ फायनान्सचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे मोठ्या स्क्रिन आकाराच्या प्रीमियम टीव्हीमध्ये अपग्रेड होणे अधिक सोईस्कर बनले आहे. सॅमसंग निवडक बँक कार्ड्सवर जवळपास २० टक्के कॅशबॅक देखील देत आहे, यासह ग्राहक सणासुदीच्या काळादरमयान अधिक बचत करू शकतात.
उत्साहामध्ये अधिक भर करत निवडक मोठ्या स्क्रिन आकाराच्या सॅमसंग टीव्ही मॉडेल्सच्या ग्राहकांना जवळपास ९२,९९० रूपयांचा सॅमसंग साऊंडबार किंवा जवळपास १,४०,४९० रूपये किमतीचा एआय टीव्ही मोफत मिळेल, ज्यामुळे घरामध्ये परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव मिळेल. दीर्घकाळापर्यंत समाधानाच्या खात्रीसाठी सॅमसंग निवडक मोठ्या स्क्रिन आकाराच्या टेलिव्हिजन्सवर ३ वर्षांची वॉरंटी देत आहे. ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ८५ इंच, ९८ इंच, १०० इंच आणि ११५ इंच व्हिजन एआय-समर्थित टेलिव्हिजन्सवर ऑफर्ससह यंदा सणासुदीचा काळ सॅमसंगचे सर्वात प्रगत मोठ्या स्क्रिन आकाराचे इनोव्हेशन्स घरी आणण्यासाठी परिपूर्ण वेळ आहे.
”’सुपर बिग सेलिब्रेशन्स’सह आम्ही भारतीय घरांमध्ये सॅमसंगचे सर्वात प्रगत व्हिजन एआय-समर्थित मोठ्या स्क्रिन आकाराचे इनोव्हेशन्स घेऊन येत आहोत. आम्ही वैयक्तिकृत, सर्वोत्तम अनुभव निर्माण करत आहोत, जे ग्राहकांच्या एकत्र मनोरंजनाचा आनंद घेण्याच्या, कनेक्ट होण्याच्या आणि सण साजरा करण्याच्या पद्धतींना नव्या उंचीवर घेऊन जातील. आमच्यासाठी फक्त स्क्रिनचा आकार मोठा करणे नाही तर मनोरंजन स्मार्ट, अधिक कनेक्टेड करणे आणि भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. यंदा सणासुदीच्या काळात आम्ही सर्वांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या सॅमसंगच्या दृष्टिकोनावर तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला साजरे करत आहोत, जे प्रत्येक घराला सक्षम करत आहेत,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विप्लेश डांग म्हणाले.
सॅमसंग व्हिजन एआयसह वापरकर्ते आता युनिव्हर्सल गेस्चर कंट्रोल, एआय-समर्थित पिक्चर सुधारणा, जनरेटिव्ह आर्ट वॉलपेपर्स आणि रिअल-टाइम होम इनसाइट्सचा आनंद घेऊ शकतात, ज्यामधून स्मार्टर आणि अधिक वैयक्तिकृत व्युइंग अनुभव मिळतो.
सॅमसंग क्यूएलईडी टेलिव्हिजन्स १०० टक्के कलर व्हॉल्यूमसह क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञानासह येतात, ज्यामुळे वैविध्यपूर्ण, अचूक आणि सातत्यपूर्ण पिक्चर क्वॉलिटी मिळते. टीयूव्ही रेनलँडचे ‘रिअल क्वॉन्टम डॉट डिस्प्ले’ प्रमाणन आणि कॅडियम-मुक्त साहित्याच्या पाठबळासह सॅमसंग क्यूएलईडी टेलिव्हिजन्स सुरक्षित व रिअल क्यूएलईडी टीव्ही आहेत.
ग्राहक ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत Samsung.com, आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि संपूर्ण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये या ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात. यंदा दिवाळीला सॅमसंग कुटुंबांना व्हिजन एआय-समर्थित टेलिव्हिजन्ससह अधिक जल्लोषात व उत्साहात सण साजरा करण्याचे आवाहन करते, जे सर्वांना एकत्र आणण्यासाठी, संस्मरणीय क्षण निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक सेलिब्रेशनला अधिक उत्साहपूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.