- मुलांना त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती व सर्जनशीलता जागृत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या परस्परसंवादात्मक क्रियाकलापांच्या माध्यमातून स्वप्न पाहण्यास, नाविन्यता आणण्यास आणि एक्स्प्लोअर करण्यास प्रेरित करण्यात आले.
- मुलांनी बिझनेस एक्स्पीरिअन्स स्टुडिओला भेट दिली, सॅमसंगच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ, त्याचे नवीन नाविन्यता आणि स्मार्टथिंग्जच्या कनेक्टेड जगाचा शोध घेतला. •
- कर्मचारी आणि त्यांच्या जोडीदारानी सामील होत कौटुंबिक नाते आणि विस्तारित सॅमसंग समुदायाचे खरे प्रदर्शन दाखवले.
गुरूग्राम, भारत – ऑगस्ट २५, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज अद्वितीय साजरीकरण ‘किड्स डे @सॅमसंग – २०२५’चे आयोजन केले, ज्यामध्ये कर्मचारी, त्यांची मुले व पत्नी एकाच छताखाली आहे आणि त्यांनी सॅमसंग कुटुंबाचा भाग असण्याच्या अभिमानाचा अनुभव घेतला.
गुरूग्रामध्ये सॅमसंगच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जो कुटुंबांसाठी दीर्घकालीन आठवणी निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता, तसेच भावी पिढीला स्वप्न पाहण्यास, नाविन्यता आणण्यास आणि तंत्रज्ञानाला एक्स्प्लोअर करण्यास प्रेरित करण्यात आले.

सॅमसंग कुटुंबाचे साजरीकरण
या उपक्रमाने आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना सॅमसंगच्या विश्वाचा अनुभव धेण्याची संधी दिली, तसेच त्यांना त्यांचे पालक करत असलेले काम पाहण्यास मिळाले आणि कंपनीच्या नाविन्यता व केअर संस्कृतीचा अनुभव मिळाला. कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, ज्यामधून विस्तारित कुटुंबे व एकतेचे खरे साजरीकरण पाहायला मिळाले.
”किड्स डे @सॅमसंग कुटुंबांना संधी देण्यासोबत त्यांच्यामध्ये नाविन्यतेच्या विश्वाबाबत जिज्ञासूवृत्ती जागृत करते. आमच्या कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना आणत आमची त्यांच्यामध्ये सॅमसंगचा भाग असण्याचा अभिमान जागृत करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. यंदाच्या साजरीकरणामधून भावी पिढीला निर्माते, विचारवंत व नवप्रवर्तक बनण्यास प्रेरित करण्याप्रती, तसेच आमच्या जिवलग सॅमसंग कुटुंबाचे नाते अधिक दृढ करण्याप्रती आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो,” असे सॅमसंग इंडियाचे पीपल टीमचे प्रमुख रिषभ नागपाल म्हणाले.
तरूण विचारवंतांना प्रेरित करण्यात आले
‘नो सॅमसंग’ अनुभवाचा भाग म्हणून मुलांनी बिझनेस एक्स्पीरिअन्स स्टुडिओला भेट दिली, जेथे त्यांना सॅमसंगच्या अत्याधुनिक उत्पादनांची, तसेच स्मार्टथिंग्ज इकोसिस्टमची लाइव्ह प्रात्यक्षिके पाहायला मिळाली.
मुलांनी मिनी सीईओ चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला, ‘मी सॅमसंगचा सीईओ असतो तर कोणते उत्पादन लाँच केले असते?’ या विषयावर विचारविनियम केले. मुलांना सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि भावी तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन मांडण्यास प्रेरित करण्यात आले.