ऑडी इंडियाचा ‘माय ऑरास’ लाँच
लक्झरी ड्रायव्हिंग अनुभवाला नवे परिमाण; आता प्रत्येक ड्राइव्ह तुमच्या मूडनुसार

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कारमेकर कंपनीने आज अद्वितीय इन-वेईकल अनुभव ‘माय ऑरास’ लाँच केले, जे ग्राहकांना लक्झरी वेईकल मालकीहक्काला नव्या उंचीवर घेऊन जात शांतमय व प्रसन्न प्रवासाचा अनुभव देते. माय ऑरास अॅपमधून ऑडीचे ‘वोरस्प्रंग डर्च टेक्निक’ दिसून येते, ज्यामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञानासह ड्रायव्हिंगच्या भावनिक पैलूंचा समावेश आहे, ज्यामधून प्रत्येक ड्राइव्हदरम्यान वेईकल आणि ड्राइव्ह करणारा ड्रायव्हर यांच्यामध्ये विशेष नाते तयार होते. हे अॅप सुलभ लक्झरी इंटरफेससह एकीकृत अॅप्पल म्युझिक आणि पुरेसा प्रकाश, वातावरणावर नियंत्रण, केबिनमध्ये सुगंधित वातावरण, मेसेज आणि खेळत्या हवेयाठी वन-क्लिक कंट्रोल्स देते.
मायऑडी कनेक्टमध्ये उपलब्ध आणि प्रत्यक्ष ऑडी वेईकल्समध्ये एकीकृत करण्यात आलेले माय ऑरास मालकीहक्काला साध्या ड्रायव्हिंगमधून अत्यंत वैयक्तिकृत जीवनशैली अनुभवामध्ये बदलत उत्साहवर्धक ड्राइव्हचा आनंद देते.
ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ऑडी इंडियामध्ये वोरस्प्रंग डर्च टेक्निक अद्वितीय अनुभव निर्माण करते, जे ग्राहकांच्या जीवनाशी जुडले जाते. आमच्या ग्राहक-केंद्रित धोरणाशी बांधील राहत आम्ही मायऑडी कनेक्ट अॅपवर माय ऑरास वैशिष्ट्य लाँच करत आहोत. माय ऑरास अॅपमधून हे तत्त्व परिपूर्णपणे दिसून येते. आजच्या वापरकर्त्यांची त्यांच्याशी जुळून जाणारा उत्साहवर्धक अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे आणि माय ऑरास अॅप अत्यंत वैयक्तिकृत मूड्स देते, ज्यामधून प्रत्येक ड्राइव्हदरम्यान शांतमय, उत्साहवर्धक, प्रसन्न व आनंदमय प्रवासाचा अनुभव मिळतो.”
वन-क्लिक मल्टी-सेन्सरी कंट्रोल: वैयक्तिकरित्या विविध सेटिंग्जचे व्यवस्थापन करण्याऐवजी वापरकर्ते एका क्लिकमध्ये संपूर्ण स्थितीवर नियंत्रण ठेवू शकतात, जेथे एकाच वेळी लायटिंग, संगीत, तापमान, सीट कम्फर्ट, मेसेज फंक्शन आणि केबिनमध्ये खेळती हवा यांचे समायोजन करू शकतात.
सुधारित त्रास-मुक्त ड्रायव्हिंग अनुभव: अॅप मन प्रसन्न राहण्यासोबत आरामदायी प्रवासाचा आनंद मिळण्यास मदत करते, जेथे वापरकर्त्यांना दैनंदिन प्रवासादरम्यान किंवा लांबच्या प्रवासादरम्यान आरामदायीपणा देते. रोडसाइड असिस्टण्स आणि वेईकल सर्विस यांसारखी सर्व वैशिष्ट्ये एकाच अॅप्लीकेशनमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे चिंता कमी होण्यास मदत होते आणि उत्साहवर्धक अनुभव मिळतो.
महत्त्वपूर्ण क्षणांचा आनंद घ्या: माय ऑरोस अॅपला माहित आहे की, ड्रायव्हिंग व्यक्तीच्या जीवनातील क्षणांचा भाग आहे. फेस्टिव्ह थीम्स सानुकूल करता येऊ शकतात, ज्यामधून सांस्कृतिक व हंगामी सेलिब्रेशन्सचा आनंद मिळू शकतो. तसेच, वापरकर्त्याच्या विशेष दिवशी बर्थडे मोड आपोआपपणे कार्यान्वित होऊ शकतो, ज्यासह आनंददायी व संस्मरणीय अनुभव मिळतो.
माय ऑरोसची वैशिष्ट्ये ऑडी इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वोत्तमपणे समाविष्ट करण्यात आली आहेत. या पोर्टफोलिओमध्ये ऑडी ए४, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी ए६, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी आरएस क्यू८ आणि ऑडी क्यू८ ई-ट्रॉन मॉडेल्सचा समावेश आहे. ग्राहक त्यांच्या आयफोन्सवर मायऑडी कनेक्टच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष त्यांच्या वेईकलमधील इन्फोटेन्मेंट सिस्टमच्या माध्यमातून या वैशिष्ट्याचा अनुभव घेऊ शकतात. विशेषत: आयओएस वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आलेले हे वैशिष्ट्य निवडक आयफोन मॉडेल्स आणि आयओएस व्हर्जन्सवर कार्यरत आहे. हे वैशिष्ट्य माय२४ आणि त्यानंतरच्या ऑडी वेईकल्सवर उपलब्ध आहे.