Turkish Airlines Holidays Expands Globally

London, 26 February, 2025: Turkish Airlines, the airline flying to more countries than any other, has launched…

98% of Indian business leaders are speeding up AI adoption, but skilled talent remains hard to find: LinkedIn

● 54% of recruiters in India say only half or less than half of job applications…

फ्लूवर मात करा आणि कामाच्‍या ठिकाणी आरोग्‍यदायी राहा

दरवर्षी जगभरातील लाखो व्‍यक्‍तींना फ्लू आजार होतो. तसेच, दरवर्षाला १ बिलियनहून अधिक प्रकरणे आढळून येतात, ज्‍यामध्‍ये ३ ते ५ दशलक्ष प्रकरणे गंभीर असतात. ज्‍यामुळे हा आजार हंगामी आजारांपेक्षा अधिक घातक आहे. सर्दी-खोकल्‍यासह होणाऱ्या या फ्लू आजारामुळे दैनंदिन जीवन व कामात मोठा अडथळा येऊ शकतो. स्‍वत:चे या आजारापासून संरक्षण करण्‍यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, पण जागरूकतेचा अभाव व गैरसमजांमुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: श्रमजीवी व्‍यावसायिकांना फ्लू आजार होण्‍याचा सर्वाधिक धोका आहे. तुम्‍ही शहरातील कार्यालयामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा किंवा लहान नगरामधील कारखान्‍यामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा फ्लू आजाराचा तुमचे कुटुंब आणि काम व जीवनावर परिणाम होऊ शकतो. अनेक लोक आजारी असताना देखील कामावर जातात, परिणामत: कामावर लक्ष लागत नाहीत, तसेच इतरांना देखील फ्लू आजार होण्‍याचा धोका वाढतो. तसेच, डॉक्‍टरांकडे जाण्‍याच्या, औषधोपचारांचा आणि हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याच्या खर्चांमुळे अधिक तणाव येऊ शकतो. अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, “फ्लूचा कामाच्‍या ठिकाणी उत्‍पादकतेवर परिणाम होऊ शकतो. भारतात आरोग्‍यसेवा सिस्‍टमवर संसर्गजन्‍य आजारांचा मोठा दबाव आहे, ज्‍यामुळे फ्लू लसीकरणाबाबत जागरुकता वाढवणे महत्त्वाचे आहे. लसीकरण केल्‍यास तुमचे फ्लूपासून संरक्षण होते. तसेच तुमचे संरक्षण होण्‍यासोबत सार्वजनिक आरोग्‍य देखील उत्तम राहण्‍यास मदत होते, ज्‍यामुळे फ्लूच्‍या प्रादुर्भावामुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्‍या कमी होऊ शकतात.” भारतात फ्लू लसीकरणाचा अवलंब आजही सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये असला तरी वाढत्‍या जागरूकतेमुळे अधिकाधिक व्‍यक्‍तींचे फ्लूपासून संरक्षण होण्‍यास मदत होऊ शकते. मुंबईतील बॉम्‍बे हॉस्पिटलचे चेस्‍ट मेडिसीनचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. सुजीत के. राजन म्‍हणाले, “फ्लू लस सुरक्षित, गुणकारी आहे आणि दरवर्षी सर्वात सामान्‍य व्‍हायरस स्‍टेन्‍सनुसार अपडेट केली जाते. जागतिक आरोग्‍य संघटना (डब्‍ल्‍यूएचओ) फ्लू विषाणूंवर देखरेख ठेवते आणि इन्‍फ्लूएन्‍झा सीझन्‍ससाठी वर्षातून दोनदा लस अपडेट करते.  65 वर्षांनंतर निरोगी जीवनशैली कायम राखणे आणि दरवर्षी लस घेणे ही स्वतःचे संरक्षण करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. काही अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या 65 वर्षांखालील रुग्णांनाही वार्षिक इन्फ्लूएंझा लसीकरणाचा फायदा होऊ शकतो. दरवर्षी एकदा लस घेतल्‍यास फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि न्‍यूमोनिया सारख्‍या गंभीर आजारांपासून संरक्षण होऊ शकते. लस घेतल्‍याने तुम्‍ही स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासोबत आसपासच्‍या इतरांना सुरक्षित ठेवण्‍यास देखील मदत करता.” भारतात, सर्वात समान्‍य फ्लू विषाणू आहेत सबटाइप ए (एच१एन१) आणि ए (एच३एन२). हिवाळा व पावसाळ्यादरम्‍यान फ्लूचा प्रसार सवाधिक होतो आणि संसर्गित व्‍यक्‍ती खोकल्‍यास, शिंकल्‍यास किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या लहान ड्रॉपलेट्सच्‍या माध्‍यमातून पसरतो. कामाच्‍या ठिकाणी सुरक्षित राहण्‍यासाठी नियमितपणे हात स्‍वच्‍छ धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झााकून ठेवा. बरे वाटत नसल्‍यास घरीच राहा, ज्‍यामुळे फ्लूचा प्रसार होणार नाही. कामाच्‍या ठिकाणी आरोग्‍यदायी सवयींचे पालन करणे आणि दरवर्षी लसीकरण करणे यामुळे तुमचे व तुमच्‍या आसपासच्‍या व्‍यक्‍तींचे फ्लूपासून संरक्षण होण्‍यास मदत होते.

भारतातील ९८ टक्‍के व्‍यवसाय प्रमुख जलदपणे एआयचा अवलंब करत आहेत, पण कुशल टॅलेंट सापडणे आव्‍हानात्‍मक ठरत आहे: लिंक्‍डइन

● भारतातील ५४ टक्‍के रिक्रूटर्स म्‍हणतात की, फक्‍त अर्धे किंवा अर्ध्‍याहून कमी रोजगारासाठी केलेले अर्ज आवश्‍यक…

कोटकचे नवीन ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा’मधून महत्त्वाकांक्षी भारतीयांचा उत्‍साह दिसून येतो

मुंबई, फेब्रुवारी २५, २०२५ – कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) आज परिवर्तनात्‍मक नवीन ग्रुप ब्रँड…

AI powered smart parking system by Park+, manages over 5 lakh vehicles at MahaKumbh 2025

National | 26th February, 2025: Park+, India’s leading auto-tech super app, today announced a major milestone-…

Golden Icon Gears Up for Asia’s Most Prestigious Awards Night

Golden Icon is proud to present its highly anticipated awards night at the prestigious Okada Manila,…

Salon Du Chocolat et de la Patisserie Debuts in India: Where Chocolate Dreams Come to Life

Get ready, India! The world’s most enchanting chocolate festival is making its debut in India, in…

The Indian Garage Co. Expands National Presence with New Stores in Hyderabad and Kochi

The Indian Garage Co. (TIGC), India’s leading homegrown fast-fashion brand, is accelerating its offline expansion with…

A Legacy Poured to Perfection: Amrut unveils India’s Oldest & Rarest Single Malt

Amrut’s Expedition launch marks a historic first for India’s alco-bev industry, as Amrut proudly unveils the…

error: Content is protected !!
Call Now Button