Nissan kicks off an exclusive ‘Weekend Carnival’ with experiences curated for customers across India

Gurugram,17 November 2024: Nissan Motor India is delighted to announce the ‘Weekend Carnival’ across its dealership network…

जहांगिर आर्ट गॅलरीत मदन पवार यांचे ‘ब्ल्यू सिटीज – ‘द पोएटिक सोल’ हे चित्र प्रदर्शन 

ब्ल्यू सिटीचे ‘द पोएटिक सोल’ (निळसर शहराचा काव्यमय आत्मा) चित्रकार: मदन पवारस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई कालावधी: १९ ते २५ नोव्हेम्बर, २०२४वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत   सुप्रसिद्ध समकालीन चित्रकार मदन पवार यांच्या जलरंगातील चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई  ४००००१ येथे दिनांक १९ ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी जलरंगाच्या कलात्मक छटातून तयार केलेली चित्रे राजस्थानमधील जोधपुर शहरातील घरांचे सौंदर्य व त्यांचे रचनात्मक पैलू आकर्षक रीतीने दर्शवतात. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ नोव्हेंबर २०२४ रोजी जहांगीर कलादालन, मुंबई येथे ५.०० वाजता मान्यवर अतिथी परवेझ दमानिया(कला संग्राहक) व संजना शाह  (ताओ आर्ट गॅलरी,मुंबई) यांच्या हस्ते होईल. मदन पवार यांचे कलाशिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले. त्यांना अनेक मान्यवर कला प्रवर्तक संस्थांनी फेलोशिप व पारितोषिके देऊन गौरविले आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ललित कला अकादमी नवी दिल्लीतर्फे राष्ट्रीय एकात्मिक पुरस्कार, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईतर्फे फेलोशिप वगैरेचा समावेश होतो. त्यांनी मुंबई, पुणे, कोलकत्ता, हैदराबाद, नवी दिल्ली, लखनऊ वगैरे बऱ्याच ठिकाणी एकल व सामूहिक चित्रप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे सादर केली आहेत. तसेच वडोदरा, कोकण, जयपुर, सिमला, पुणे, मुंबई वगैरे ठिकाणी आर्टकॅम्प व वर्कशॉप मध्ये सक्रिय भाग घेतला व चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनांना सदैव उदंड व सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई, USA,जपान, पुणे, वडोदरा, नवी दिल्ली, गोवा, अहमदाबाद वगैरे ठिकाणी असणाऱ्या मान्यवर कलासंग्रहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत. प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची चित्रे जलरंगातील एका विशिष्ट्य तंत्रशैलीवर आधारित आहेत. राजस्थानातील जोधपुर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण घरे, त्यांचे छत, जोधपुर शहराच्या भिंतींचे रंग, घराचे मूलभूत सौंदर्य व रचनात्मक वैशिष्ट्ये एका आकर्षक पद्धतीने मदन पवार यांनी सादर केली आहेत. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी घराच्या भिंतींचे सोनेरी निळसर रंग त्यांनी प्रकर्षाने दर्शविले असून तेथील लोकांचे राहणीमान व जीवनशैली यांचे कलात्मक दर्शन घडविताना लाल दगडांच्या बांधकामात बांधलेली घरे मातीच्या पायऱ्यांसह काढली आहेत. ही कृतिशीलता व जिवंतपणा चित्रमाध्यमातून चित्रकाराने येथे सादर केली आहे. बांबूवर काम करणारे लोक, रंगीबेरंगी बांधणीच्या पगड्या घालणारे लोक, साड्या तयार करणारे लोक, सोनारांच्या गल्ल्या, पूजापाठ करणाऱ्या ब्राह्मणांची वस्ती वगैरे विविध मोहल्ल्यातील लोकांचे सामाजिक जीवन व इतर पैलू यांचे एक रम्य दर्शन घडवताना ‘ब्ल्यू सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोधपूर शहराची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या चित्रात दाखवली आहेत. जोधपुर मधील घर एक प्रकारचं लिंबाच्या ठोशाचे मॉर्टर म्हणजे सुरखीचुन वापरून बनवलेली असतात. ज्यामध्ये ताम्र सल्फेट वापरल्यामुळे त्या घरांच्या भिंतीला निळसर रंग येतो जो टर्माइट्सपासून संरक्षण देतो. या निळसर रंगाच्या वापरामुळे किल्ल्यावरून शहराच्या दृश्याला एक विशेष निळसर रंग प्राप्त होतो. मदन पवार यांनी त्यांच्या हवाई दृष्टिकोनांच्या रचनांमध्ये ग्रीडस व स्थापत्याच्या रचनांचा कलात्मक उपयोग केला आहे. त्यामुळे रंग भरून ह्या रचनांमध्ये जादुई प्रतिमांची निर्मिती होते व सर्वांना एक वेगळा दृश्यानुभव मिळतो. पॉल सेझानच्या फॉविस्ट लँडस्केपमधून प्रेरणा घेऊन मदन पवार यांनी आपल्या स्वतंत्र व कलात्मक शैलीत येथे बोलकी व अर्थपूर्ण चित्रे रसिकांपुढे सादर केली असून ती सर्वांना आगळावेगळी अनुभूती व शांती देतात आणि त्यांच्या अंतर्मनांचा ठाव घेतात. तसेच चित्रांमध्ये तीव्र व चौकोनी आकार आहेत जे एकमेकांशी निगडित आहेत व हा प्रभाव एक प्रकारे प्रिझमसारखा आहे.

Kabira Mobility Salutes India’s Heroes with Special Discount Campaign for Armed Forces Veterans

India, 16th November 2024 – Kabira Mobility, India’s leading electric two-wheeler manufacturer, today announced a special discount…

Bollywood Star Sanjay Dutt joins HIL’s Team Gonasika as Brand Ambassador

The Vizag-based team will get the HIL underway in the opening fixture against Delhi SG Pipers…

JAGUAR PROTOTYPE GLOBAL TESTING & DEVELOPMENT BEGINS

Jaguar’s Reimagine strategy reaches a significant milestone with the first prototypes being tested onBritish roads as…

CSMIA Celebrates Diwali with strong Growth in Passenger Traffic, driven by International travel

Mumbai, 15th November 2024: As Diwali celebrations lit up the country, Chhatrapati ShivajiMaharaj International Airport (CSMIA)…

Driving Change Together: Bajaj Auto Ltd. and Amul Unite for a Clean Fuel Rally

·       Multi-city rally connecting major dairy and industrial centres.·       Promoting accessible clean fuel technology for daily commuters.·       Partnership aimed…

Malabar Hill Club State Ranking Snooker Tournament

Rahul records 3-1 win against Mehta Mumbai, November 15: Rrahul Sachdev showed great touch and control to…

Maharashtra State Open Badminton 2024

Mumbai, November 15: Talented teenager and second seed Harshit Mahimkar proved too good for Veer Bhadane smoothly…

Rashmika Mandanna gets candid about embracing authenticity and her conscious artistic choices on Grazia’s November Cover Issue 2024

The national crush of India, Rashmika Mandanna, known for her signature charm and powerful performances, graces the…

error: Content is protected !!
Call Now Button