New Delhi, 9 November 2024: Pearl Academy, India’s leading creative design education institution, recently celebrated Design…
Author: Prashant Ovhal
एआय संचालित सीसीटीव्ही
नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे…
स्वयंरोजगार क्षेत्रातील ग्राहकांकडून टर्म इन्शुरन्सच्या मागणीत वाढ: पॉलिसीबाजार.कॉम
मुंबई ,०९ नोव्हेंबर: स्वयंरोजगार क्षेत्रातील ग्राहकांकडून दर वर्षी घेतल्या जाणाऱ्या टर्म इन्शुरन्सच्या मागणीत ५० टक्के वाढ…
The Sustainable City – Yiti Set to Showcase Sustainable Living Model at Cityscape Global 2024 in Riyadh
Muscat, Oman – 10 November 2024 – The Sustainable City – Yiti is set to showcase its…
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र असलेल्या ‘सुशीला-सुजीत’च्या चित्रीकरणाला धडाक्यात सुरुवात
लेखक-कलाकार जितेंद्र जोशींच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षीत ‘सुशीला-सुजीत’चा मुहूर्त संपन्न स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी यांची निर्मिती असलेला आणि अलीकडेच घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण करणाऱ्या ‘सुशीला सुजीत’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेवून या चित्रपटाचा मुहूर्तअभिनेता व लेखक जितेंद्र जोशी यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. चित्रपटाच्या चित्रीकरणालाही मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली आहे. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोन अभिनेते मित्र पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. या दोघांनी एकत्र काम करावे, अशी प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीत आणि सासिकांमध्ये उमटत होती. ती इच्छा ‘सुशीला-सुजीत’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्स यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी प्रसाद, स्वनिल आणि जितेंद्र जोशींसह निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे, निर्माते निलेश राठी तसेच निर्माती आणि कॉस्च्यूम डिझायनर मंजिरी ओक यांची उपस्थिती होती. प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर असून हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानले जाते. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. “या चित्रपटाचे नाव जरी ‘सुशीला-सुजीत’ असले तरी हे नाव ऐकण्या किंवा वाचण्यापेक्षा बघण्यात खूप गंमत आहे. त्याचे विज्युअल गमतीशीर आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांमध्ये त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. आमच्याशी बोलताना रसिक आणि आमचे सिनेसृष्टीतील सहकारी विचारणा करत असतात. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्याच्या कथेतही गम्मत आहे आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ती प्रेक्षकांना सुखद धक्का देईल,” असे उद्गार स्वप्नील जोशी यांनी काढले आहेत. प्रसाद ओंक म्हणाले, “दिग्दर्शक आणि कलाकार अशा दुहेरी भूमिकेत मी आहे, त्यामुळे माझी जबाबदारी अधिक आहे. मला स्वप्नीलबरोबर बरीच वर्षे एकत्र काम करायचे होते आणि तो योग आता जुळून आला आहे, याचा मला आनंद आहे. ”संजय मेमाणे म्हणाले, “हा एक आगळा आणि वेगळा व त्याचवेळी दर्जेदार चित्रपट होणार आहे. आम्ही धडाक्यात त्याच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे.” अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका करणारे स्वप्नील जोशी आज आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी या आधीही काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत. प्रसाद ओक यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि जवळपास मलिकांमध्ये कामे केली आहेत. रमा माधव, बाळकडू, चिरंजीव, फर्झंद, क्षण, ती रात्र, एक डाव धोबीपछाड, हिरकणी, धर्मवीर यांसारखे चित्रपट, पिंपळपान, आभाळमाया, हम तो तेरे आशिक है, क्राईम पॅट्रोल यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव या चार चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, बेचकी, रणांगण, आलटून पालटून यांसारखी नाटके यांनी केली आहेत.
युनायटेड ब्रेव्हरिजने ॲमस्टेल ग्रॅंड लॉँच
मुंबई, 09 नोव्हेंबर 2024: युनायटेड ब्रेव्हरिज लिमिटेड (UBL) ने आपली प्रतिष्ठित प्रीमियम बिअर ब्रँड ॲमस्टेल भारतात लॉन्च केली. मुंबईत झालेल्या या भव्य आयोजन सोहळ्याने संपूर्ण उपस्थितांना ॲमस्टरडॅमची सफर…
Australian premium wines return to ProWine Mumbai for 2024 edition
11 Australian wineries showcasing their best in Australian wines at ProWine Mumbai 2024 Mumbai, 08November 2024: To…
Emcure Pharmaceuticals Teams up with MS Dhoni to Bat for Stroke Awareness Across the Country
Mumbai/ Pune, 09 November 2024 – Emcure Pharmaceuticals Ltd. announces the launch of a public awareness campaign…
Neeraj Chopra teams up with Javelin legend Jan Železný
Czech World Record Holder Comes On Board As Chopra’s New Coach Ahead Of 2025 Season 9…
ऑस्ट्रेलियन प्रीमियम वाइन्सचे प्रोवाइन मुंबईच्या २०२४ एडिशनसह पुनरागमन
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२४: ऑस्ट्रेलिया-इंडिया इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड ट्रेड अॅग्रीमेंट (ईसीटीए) आणि भारतीय बाजारपेठेतील वाढत्या वाइन मागणीचा फायदा घेण्यासाठी अनेक ऑस्ट्रेलियन वाईन कंपन्या प्रोवाइन मुंबई 2024 मध्ये सहभागी होत आहेत. येथे ते भारतीय आयातदार आणि ग्राहकांना प्रीमियम ऑस्ट्रेलियन वाईन अनुभवण्याची संधी देतील. ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेड) ग्लोबल व्हिक्टोरिया, इन्व्हेस्टमेंट एनएसडब्ल्यूसोबत सहयोगाने आणि वाइन ऑस्ट्रेलियाच्या पाठबळासह ११ ऑस्ट्रेलियन वाइनरीजना सादर करत आहेत, जे प्रोवाइन मुंबई २०२४ मध्ये वाइन्सच्या त्यांच्या पोर्टफोलिओला दाखवतील. ऑस्ट्रेलियन पॅव्हिलियनमध्ये ११ ऑस्ट्रेलियन वाइनरीजमधील वाइन्सचा समावेश आहे, जे ऑस्ट्रेलिया वाइनची विविधता, अद्वितीयता आणि उत्क्रांतीला दाखवतात. यापैकी काही वाइन्स सोमेलियर निखिल अग्रवाल यांनी सादर केलेल्या दोन मास्टरक्लासेसमध्ये (यापैकी एक साऊथ ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडून सादर करण्यात येईल) देखील दाखवण्यात येतील. ऑस्ट्रेलियन सहभागाबाबत मत व्यक्त करत ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनचे दक्षिण आशियामधील सीनियर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनर श्री. जॉन साऊथवेल म्हणाले, “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढती भागीदारी भारतीय आयातदारांसोबत जवळून काम करण्याचे आणि उत्कृष्ट ऑस्ट्रेलियन वाइन भारतीय बाजारपेठेत आणण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करते.भारत दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देत असून यामध्ये भारतीय वाइन उद्योगाच्या विकासासाठी तांत्रिक सहकार्याचाही समावेश आहे. प्रोवाइन मुंबई येथे ऑस्ट्रेलियन वाईनचे वैविध्य दाखवून हे घनिष्ठ नाते साजरे करताना आम्हाला आनंद होत आहे.” ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात वैविध्यपूर्ण वाइन क्षेत्रांपैकी एक आहे. ६५ विशिष्ट वाइन प्रदेशांमध्ये १०० हून अधिक द्राक्षाच्या जातींची लागवड होण्यासह ऑस्ट्रेलियन वाइन ऑस्ट्रेलियामधील अद्वितीय हवामान व माती आणि त्यांची लागवड करणाऱ्या उत्कट समुदायांचे प्रतीक आहे. प्रभावित करण्यासाठी किंवा वीकेण्डला कॅज्युअल भेटीगाठीसाठी अत्याधुनिक रेड्सपासून मजेदार, फ्रूटी व्हाइट्स वाइनपर्यंत भारतीय ग्राहक ऑस्ट्रेलियाच्या नाविन्यपूर्ण वाइनमेकर्सनी डिझाइन केलेल्या वाइन्समध्ये परिपूर्ण सोबतीचा आनंद घेऊ शकतात, विशेषत: विविध भारतीय पाककलांसोबत या वाइन्सचा आस्वाद घेऊ शकतात. वाइन उद्योगामधील जागतिक अग्रणी ऑस्ट्रेलिया जगामध्ये वाइनचा सहावा सर्वात मोठा उत्पादक, तसेच वाइनचा पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, जेथे त्यांच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास ६० टक्के वाइन जगभरात निर्यात केली जाते. ऑस्ट्रेलिया-इंडिया इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड ट्रेड अॅग्रीमेंट (ईसीटीए) २९ डिसेंबर २०२२ रोजी लागू करण्यात आला. वाइनशी संबंधित प्रमुख ईसीटीए मार्केट अॅक्सेस निष्पत्ती पुढीलप्रमाणे: