मुंबई, दि. १८ ऑक्टोबरपंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या…
Author: Prashant Ovhal
महाविकास आघाडीत बिघाडी जागावाटपाचा वाद चिघळला
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर…
अंबरनाथ विधान सभेत कोण होईल अंबरनाथचा नाथ ? कोण होईल अनाथ ? कोणाचा होईल घात ??
डॉ.बालाजी किणीकर विजयी चौकार मारणार कीत्रिफळाचित होणार ? (दिलीप मालवणकर यांचा स्पेशल निष्पक्षपाती रिपोर्ट ) अंबरनाथ…
‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले ठरला इतिहासातील सर्वात भव्य Grand Finale; महाराष्ट्रभर झाली चर्चा
महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो अर्थात ‘बिग बॉस मराठी’च्या सर्वाधिक गाजलेल्या या सीझनचा दिमाखदार महाअंतिम…
सुनेत्रावहिनींच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांची खास पोस्ट
सुनेत्रा, आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपण सावली बनून माझ्या पाठीशी खंबीर उभ्या राहिलात.…
वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
॰ भाजपा वचननामा अमलात आणणारा पक्ष तर कॉन्ग्रेस मतदारांची फसवणुक करणारा पक्ष ॰ भाजपा महायुतीच्या सरकारच्या…
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपेक्षाविद्यापाठाच्या अधिका-यांकडून सरावावर बंदी
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – व्हीलचेअर क्रिकेट, व्हीलचेअर बास्केटबॉल व व्हीलचेअर टेनिस यासारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय व…
This Diwali Steal 3 Festive Look Inspirations From Bollywood Fashionista Giorgia Andriani And Let Your Wardrobe Sparkle Brightly As The Festival Of Light
Giorgia Andriani is known for her elegant and stylish fashion sense, which frequently combines classic and…
“मु. पो. बोंबीलवाडी” मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर
‘कोण होणार हिटलर?’, या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या…
जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकार राजेंद्र चौहान यांच्या कलाकृतींचे “सिरीनिटी इन नेचर” हे चित्रप्रदर्शन
चित्रकार: राजेंद्र चौहानस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबईकालावधी: २१ ते २७ ऑक्टोबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ निसर्गरम्य कलाविष्कार सुप्रसिद्ध चित्रकार राजेंद्र चौहान ह्यांचे एकल कला प्रदर्शन जहांगीर कलादालन नं.४, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२४ ह्या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी निसर्गातील विविध सुखद शांततामय अनुभूतीचा आपल्या चित्रमाध्यमातून सर्वांना एक कल्पातीत व सुरम्य असा अनुभव दिला आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता जहांगीर कलादालन, मुंबई येथे होईल त्यावेळी मुख्य पाहुणे म्हणून डॉ. सुधांशू मणी – निवृत्त सरव्यवस्थापक – भारतीय रेल्वे व वंदे भारत एक्सप्रेसचे पुरस्कर्ते, श्रीमती टीना कौर परिश्चा भारतीय चित्रपट निर्माती, पुरस्कार विजेती लेखिका व श्री मुरली रामन – दृश्य चित्रकार आणि पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रपट निर्माता ह्यांची उपस्थिती राहील. तसेच तेथे अनेक कलाप्रेमी, संग्राहक व कला प्रोत्साहक आणि सामान्य कलारसिक ह्यांचीही उपस्थिती राहील. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी जलरंगातून साकारलेली निसर्गातील शांततामय अनुभूतीचा कलात्मक आविष्कार दर्शविणारी विविध चित्रे ठेवली आहेत. सकाळच्या शांत वातावरणापासून ते सायंकाळच्या उत्तेजक पण काहीशा उदास वातावरणातील सदैव आढळणाऱ्या अनेक छटा आपल्या खास शैलीत त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून रसिकांपुढे ठेवल्या आहेत. निसर्गातील निरामय शांतता व तिची विविध ऋतूतील अनुभूती आणि सुखद अनुभव आपल्या कुंचल्यातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व सौंदर्यपूर्ण रचनात्मक कलाकृतीतून साकारताना चित्रकाराने आपले माध्यमांवरील प्रभुत्व व स्पष्ट संकल्पना तसेच कलेच्या विविध रूपातील वैषयिक स्पष्टता आणि प्रगल्भता ह्यांचे नितान्तसुन्दर व रम्यदर्शन सर्वांना येथे घडवले आहे. प्रकाशाचा दृश्य परिणाम, भासमानता, विशेष प्रशंसनीय परिणाम व अनेक ऋतूत आढळणारी निसर्गातील वैविध्यपूर्ण रूपे आणि तेथील नादमय शांततेचा रम्य आविष्कार ह्यांची अनुभूती प्रत्येकाला त्यांची चित्रे बघताना होते. फार बोलकी व अर्थपूर्ण अशी ही चित्रे, निसर्गवैभवातील पर्वत, नद्या, सरोवर, मनोहर अशी रमणीयता फार आकर्षक तऱ्हेने व प्रकटपणे मांडतात.