- गॅलॅक्सी एस सिरीज, झेड सिरीज आणि ए सिरीज स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४१ टक्के सूट
- टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वीअरेबल्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ६५ टक्के सूट
- निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्सवर जवळपास ४३ टक्के सूट आणि विंडफ्रीTM एसींवर जवळपास ५८ टक्के सूट
- निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी, ओएलईडी, क्यूएलईडी, द फ्रेम, क्रिस्टल ४के यूएचडी अशा टेलिव्हिजन मॉडेल्सवर जवळपास ४८ टक्के सूट
भारत, मे, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड त्यांचा ब्लॉकबस्टर सेल ‘फॅब ग्रॅब फेस्ट’च्या पुनरागमानासह यंदा उन्हाळ्यातील उष्ण तापमानावर मात करत आहे. १ मे रोजी सुरू झालेला हा बहुप्रतिक्षित शॉपिंग महोत्सव सॅमसंगच्या अत्याधुनिक उत्पादनांच्या व्यापक श्रेणीवर धमाकेदार, लिमिटेड-टाइम डिल्स देतो, जेथे ही उत्पादने फक्त Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.

स्मार्टफोन व लॅपटॉपवर आनंद घेता येईल अशा सर्वोत्तम डिल्स
सेलला सुरूवात होण्यासह ग्राहक सॅमसंग गॅलॅक्सी एस, गॅलॅक्सी झेड आणि गॅलॅक्सी ए स्मार्टफोन सिरीजच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४१ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. नवीन फोल्डेबल्स किंवा शक्तिशाली कॅमेरा-केंद्रित मॉडेल्स असो प्रत्येक टेक उत्साहींसाठी काहीतरी आहे. तसेच, निवडक गॅलॅक्सी टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वेअरेबल्स जवळपास ५० टक्क्यांच्या सूटसह उपलब्ध असतील, ज्यामुळे तुमची गॅलॅक्सी इकोसिस्टम पूर्ण करण्यासाठी ही परिपूर्ण वेळ आहे.
फक्त एवढेच नाही, विनासायास व वैविध्यपूर्ण टॅब्लेट-सारखा अनुभवाचा शोध घेणारे वापरकर्ते निवडक गॅलॅक्सी बुक५ व बुक४ लॅपटॉप्सवर जवळपास ३५ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात आणि गॅलॅक्सी एआयसह त्यांचा वर्कफ्लो वाढवू शकतात.
नवीन गॅलॅक्सी टॅब एस१० एफई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २९९९ रूपये किमतीचा केबलशिवाय ४५ वॅट चार्जर मोफत मिळेल.
अविश्वसनीय किमतीत बिग स्क्रिन लक्झरी
या एडिशनमध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप टेलिव्हिजन्सवर देखील अद्वितीय डिल्स ऑफर करण्यात आल्या आहेत. ग्राहक निओ-क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी, ओएलईडी, क्यूएलईडी, द फ्रेम आणि क्रिस्टल ४के यूएचडी सिरीज अशा लोकप्रिय मॉडेल्सवर जवळपास ४८ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. लिव्हिंग रूमला कलाकृती व तंत्रज्ञानामध्ये बदलू पाहणारे वापरकर्ते द फ्रेम टीव्हीची निवड करू शकतात. सहजपणे फिट बसू शकणारा सॅमसंगचा फ्रेम टीव्ही बंद असताना कलाकृतीमध्ये बदलून जातो आणि आता जवळपास ११००० रूपयांची त्वरित कार्ट सूट, प्रीमियम डिझाइन आणि सिनेमॅटिक अनुभव सहजपणे उपलब्ध आहे. तसेच, ग्राहक निवडक टेलिव्हिजन्सच्या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांच्या एक्स्चेंज बोनसचा फायदा घेऊ शकतात.
डिजिटल व प्रीमियम होम अप्लायन्सेसवर स्मार्ट बचत
सॅमसंग त्यांच्या डिजिटल अप्लायन्सेसच्या संपूर्ण श्रेणीवर विशेष ऑफर्स देखील देत आहे. ग्राहक रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह्ज, एअर कंडिशनर्स आणि मॉनिटर्सवर डिल्सचा आनंद घेऊ शकतात.
उच्च स्तरीय परफॉर्मन्स व डिझाइनचा शोध घेणाऱ्यांसाठी साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स आणि फ्रेंच-डोअर रेफ्रिजरेटर्सचे निवडक मॉडेल्स जवळपास ४३ टक्के सूटच्या विशेष डिलसह खरेदी करता येतील.
वॉशिंग मशिन्सचे निवडक मॉडेल्स जवळपास ४३ टक्क्यांच्या सूटसह उपलब्ध असतील. तसेच, त्या मॉडेल्समधील फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोडिंग आणि फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंग मशिन्ससाठी डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी मिळेल. सहज अॅक्सेससाठी किफायतशीर ईएमआय पर्याय देखील फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोडिंगसाठी फक्त १५९० रूपये, फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंगसाठी ९९० रूपये आणि सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्ससाठी ८९० रूपये इतक्या रक्कमेपासून उपलब्ध आहे.
यंदा उन्हाळ्यातील उष्ण तापमानावर मात करणयसाठी निवडक विंडफ्री™ एसी मॉडेल्स ५८ टक्के सूटच्या सर्वोत्तम डिलसह खरेदी करता येऊ शकतात, तसेच दोन किंवा अधिक युनिट्सच्या खरेदीवर अतिरिक्त ५ टक्के सूट देखील आहे. या एसींमधील पीसीबी पोर्टवर ५ वर्षांची वॉरंटी आणि कॉम्प्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी आहे, ज्यामधून बचत, आरामदायीपणा व समाधानाची खात्री मिळते.
सॅमसंगच्या ‘बाय मोअर, सेव्ह मोअर’ ऑफर्ससह लक्झरीचा आनंद घ्या
ग्राहक आमच्या ‘बाय मोअर, सेव्ह मोअर’ डिल्सच्या माध्यमातून प्रीमियम अनुभव घेत राहू शकतात. Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अॅपच्या माध्यमातून दोन किंवा अधिक स्मार्ट होम अप्लायन्सेसची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळेल. हा उपक्रम वापरकर्त्यांना विविध डिजिटल अप्लायन्सेसमधून त्यांच्या गरजांची पूर्तता करणारे स्वत:चे वैयक्तिकृत बंडल्स निवडण्याचे आणि अधिक बचत करण्याचे आवाहन करतो.
निवडक सॅमसंग मॉनिटर्स जवळपास ६० टक्क्यांच्या सूटसह उपलब्ध असतील. गॅलॅक्सी बुक सिरीज लॅपटॉप्स खरेदी करणारे ग्राहक मॉनिटर्सवर मल्टी-बाय ऑफरचा आनंद घेऊ शकतात, जेथे दोन लॅपटॉप्स एकत्रित खरेदी केल्यास अधिक बचत होईल. तसेच, सॅमसंग गेमिंग मॉनिटर्सवर जवळपास ७००० रूपयांची त्वरित कार्ट सूट देत आहे.
सुलभ फायनान्सिंग आणि कॅशबॅक ऑफर्स
ग्राहक एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक अशा आघाडीच्या बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचा वापर करत जवळपास २२.५ टक्के कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. फॅब ग्रॅब फेस्टदरम्यान उपलब्ध अधिकतम कॅशबॅक २५००० रूपये आहे, ज्यामुळे विद्यमान अद्वितीय ऑफर्समध्ये अधिक किफायतशीरपणाची भर करण्यात आली आहे.