Blog
भारतातील महानगरांव्यतिरिक्त १० उदयोन्मुख शहरांमध्ये रोजगार व टॅलेंट वाढत आहे: लिंक्डइन सिटीज ऑन द राइज २०२५
भारत, १५ जुलै २०२५: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आपली पहिली सिटीज ऑन…
Kia Launches its First Made-In-India Electric Vehicle Built for the India that Moves Together – Carens Clavis EV starting at INR 17.99 Lacs
New Delhi, India – 15 July 2025: Kia India, a leading mass-premium automaker, today launched its…
यंदा जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त व्हिसाने भारतातील तरूणांसाठी स्मार्ट आर्थिक टिप्स
संपूर्ण विश्वामध्ये झपाट्याने बदल होत आहे आणि भारतातील तरूण आत्मविश्वासाने आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी कुशल होण्याचा प्रयत्न…
Cashless & Confident: This World Youth Skills Day, Visa shares smart financial tips for young India
The world is evolving at a rapid pace and India’s youth is skilling up to manage…
Aman Tea Group Unveils First-of-its-Kind Sustainability and GAP Initiative for Over 6,000 Small Tea Growers
In a landmark move set to reshape sustainable tea cultivation in India, Aman Tea Group-one of…
OMRON and Tricog Health Launch KeeboHealth to Combat India’s Cardiac Crisis and Drive ‘Going for Zero’ Vision
OMRON Healthcare, a global leader in innovative home health monitoring solutions, has expanded its collaboration with…
Esaote Installs First Magnifico Vet MRI in Asia Pacific at MaxPetZ Hospital, Greater Kailash
Esaote Asia Pacific Diagnostic Pvt. Ltd., a leading innovator in medical and veterinary imaging solutions, proudly…
Migsun MiGente Expands its Retail Mix With the Addition of Shoppers Stop’s 26,000 Sq. ft. Store in Ghaziabad
Migsun Group has announced the leasing of approximately 26,000 sq. ft. of prime retail space to…
fischer Offers Professional Sprinkler Installation for Sprinkler Systems
fischer offers sprinkler loop hangers, pipe clamps, beam clamps and fastening elements approved by Germany’s Property…
टाटा मोटर्सने बीएमटीसीला १४८ प्रगत स्टारबस ईव्हींची डिलिव्हरी करण्याला सरूवात केली; बेंगळुरूच्या ईमोबिलिटी मोहिमेला गती दिली
बेंगळुरू, १४ जुलै २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळाला (बीएमटीसी) अतिरिक्त १४८ प्रगत टाटा स्टारबस इलेक्ट्रिक बसेसच्या डिलिव्हरींना सुरूवात केल्याची घोषणा केली. हा नवीन ताफा शहरामध्ये ९२१ इलेक्ट्रिक बसेसच्या यशस्वी कार्यसंचालनावर आधारित आहे, ज्यामुळे शाश्वत शहरी गतीशीलतेप्रती बेंगळुरूची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. टाटा मोटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेड १२ वर्षांच्या करारांतर्गत या ताफ्याचे कार्यसंचालन करण्यासोबत देखरेख ठेवेल. कर्नाटक सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. रामलिंगा रेड्डी आणि बीएमटीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्रन आर., आयएएस यांनी नवीन इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कर्नाटक सरकार आणि बीएमटीसीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या ताफ्याच्या समावेशाबद्दल मत व्यक्त करत बीएमटीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्रन आर.,आयएएस म्हणाले,“बेंगळुरूमध्ये आधीच धावणाऱ्या टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेसनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, उच्च अपटाइम गाठला आहे आणि आरामदायीपणा व सोयीसुविधेबाबत प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. या यशाच्या आधारे, आम्हाला टाटा मोटर्सकडून अतिरिक्त १४८ ईबस समाविष्ट करताना आनंद होत आहे. या बसेस बेंगळुरूमध्ये विस्तृत नेटवर्कवर प्रवाशांना सुरक्षित, शाश्वत आणि कार्यक्षम प्रवास पर्याय देण्याची आमची क्षमता आणखी वाढवतील.” टाटा मोटर्सच्या टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी लिमिटेड अँड कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष आणि प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले, “हा अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे, जेथे आम्ही आमच्या पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम स्टारबस इलेक्ट्रिक बसेसच्या आणखी एका ताफ्यासाठी निर्धारित केल्याप्रमाणे बीएमटीसीला डिलिव्हरी सुरू करत आहोत. बीएमटीसीने आमच्या उत्पादनांसह दोन वर्षांसाठी अद्वितीय अपटाइम देण्याच्या आमच्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्हाला सन्माननीय वाटत आहे, या इलेक्ट्रिक बसेसनी एकूण सहा कोटीहून अधिक किलोमीटर प्रवास केला आहे. तंत्रज्ञान, सेवा आणि अंमलबजावणीद्वारे समर्थित नाविन्यपूर्ण ईमोबिलिटी सोल्यूशन्स देऊन शाश्वत, सार्वजनिक वाहतुकीसाठी त्यांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कटिबद्धआहोत.” टाटा स्टारबस ईव्ही आंतरशहरीय कार्यसंचालनांसाठी डिझाइन करण्यात आली आहे आणि दर्जात्मक आरामदायीपणा, सुरक्षितता व उच्च अपटाइम देते. प्रगत इलेक्ट्रिक बसमध्ये न्यूजनरेशन इलेक्ट्रिक पॉवरट्रेन, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन आणि इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. लोफ्लोअर डिझाइन, ३५ प्रवाशांसाठी उत्तम आसन व्यवस्थेसह या बसेस आरामदायी व सोईस्कर राइडची खात्री देतात. टेलपाइपमधून विना उत्सर्जनासह स्टारबस ईव्हींनी बेंगळुरूमधील शुद्ध हवेप्रती मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. बेंगळुरू आपला हरित ताफा वाढवत असताना टाटा मोटर्स आणि बीएमटीसी सार्वजनिक परिवहन भविष्यासाठी सुसज्ज आणि नागरिक-केंद्रित असण्याचे दाखवून देत आहेत.