शेती ते सोलरपर्यंत कॅप्टन पॉलीप्लास्टची धूम!

News Service

नफा आणि महसुलाने रचला इतिहास, महाराष्ट्र सरकारकडून मोठी ऑर्डर!

मुंबई :  शेती आणि सौर ऊर्जेच्या क्षेत्रात कॅप्टन पॉलीप्लास्टचा नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. तिसऱ्या तिमाहीत महसूल आणि नफ्याने गाठली ऐतिहासिक उंची आहे. विशेष म्हणजे कंपनीला महाराष्ट्र सरकारकडूनही मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील दिग्गज आणि सोलर ईपीसी (Solar EPC) क्षेत्रात वेगाने पाय रोवणाऱ्या कॅप्टन पॉलीप्लास्ट लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत यशाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. कॅप्टन पॉलीप्लास्ट लिमिटेडने (CPL) तिसऱ्या तिमाहीत 41 टक्के नफा आणि 127 कोटींच्या महसुलासह नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या 35 कोटींच्या सोलर पंप ऑर्डर्स आणि अहमदाबादमधील नव्या प्लांटबद्दल सविस्तर वाचा.

*आर्थिक कामगिरीचे मुख्य पैलू (Q3 FY26 vs Q3 FY25):*

* एकूण उत्पन्न: वार्षिक स्तरावर (YoY) 40 टक्के वाढीसह 127 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

* निव्वळ नफा (Net Profit): नफ्यात 41 टक्क्यांची शानदार वाढ झाली असून, तो 9.47 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

* EBITDA: कंपनीचा परिचालन नफा 35 टक्के वाढून 16 कोटी रुपये झाला आहे.

Q3 FY26 मध्ये आम्ही कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च महसूल आणि नफा मिळवला आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. सूक्ष्म सिंचन आणि सोलर EPC या दोन्ही क्षेत्रांतील मजबूत वाढीमुळे आमच्या उत्पन्नात 40 टक्के वाढ झाली आहे, कंपनीचे होल टाइम डायरेक्टर रितेश खिचाडिया यांनी निकालानंतर सांगितले आहे.

1997 मध्ये स्थापन झालेल्या कॅप्टन पॉलीप्लास्टकडे 25 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. कंपनीचे राजकोट (गुजरात) आणि कर्नूल (आंध्र प्रदेश) येथे उत्पादन प्रकल्प असून भारतातील 16 राज्यांमध्ये वितरण नेटवर्क पसरलेले आहे. कंपनी आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्येही उत्पादनांची निर्यात करते, अशी माहिती रितेश खिचडिया यांनी दिली आहे.

*सोलर क्षेत्रात मोठे यश:*

तिसऱ्या तिमाहीत कंपनीने सोलर पंप विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले. कंपनीला MSEDCL (महाराष्ट्र) कडून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दोन महत्त्वाच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

*27.69 कोटी रुपयांची ऑर्डर:*

1000 ऑफ-ग्रिड सोलर पंप पुरवणे आणि बसवणे.

*8.17 कोटी रुपयांची ऑर्डर:*

300 ऑफ-ग्रिड सोलर पंप पुरवणे आणि बसवणे. या दोन्ही ऑर्डर्सचे एकूण मूल्य 35.86 कोटी रुपये आहे.

*सरकारी धोरणांचा फायदा:*

सिंचन आणि सौर उपकरणांवरील GST 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या उत्पादनांची मागणी वाढली आहे, असे कंपनीने नमूद केले. याशिवाय, अर्थसंकल्पात “प्रति थेंब अधिक पीक” (Per Drop More Crop) आणि ‘पीएम-कुसुम’ (PM-KUSUM) योजनेला दिलेला पाठिंबा भविष्यातील वाढीसाठी पूरक ठरणार आहे.

*भविष्यातील नियोजित प्रकल्प:*

अहमदाबादमध्ये कंपनीचा 70,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा नवा प्लांट आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY26) कार्यान्वित होणार आहे. यामुळे उत्पादन क्षमता आणि नफा वाढण्यास मदत होईल. कंपनीने विना-अनुदानित विक्री, पीव्हीसी पाईप्स आणि निर्यातीवर (Exports) लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, IOCL सोबतच्या भागीदारीत गुजरातमध्ये पॉलिमर उत्पादनांच्या मार्केटिंगवरही भर दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button