ज्ञात अज्ञात

पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार पंकज झा ह्यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन हिरजी जहांगीर कलादालन, महात्मा गांधी मार्ग,…

एपीजे सत्या आर्ट फेस्टिव्हल २०२४ (क्रिएटिव्ह कॅस्केड्स) “Creative Cascades” कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत समुह कला प्रदर्शनाचे आयोजन

समुह कला प्रदर्शनकालावधी: २ ते ७ डिसेंबर २०२४स्थळ : कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, नरिमन पॉईंट मुंबईवेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ एपीजे एज्युकेशन द्वारा प्रस्तुत एका सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन केले असून हे प्रदर्शन कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, नरिमन पॉईंट मुंबई ४०००२१ येथे २ ते ७ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ ह्या कालावधीत रोज सर्वांना विनामूल्य बघता येईल. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन २ डिसेंबर २०२४ रोजी कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, मुंबई येथे संध्याकाळी ६ वाजता प्रमुख अतिथि – श्रीमती सुषमा पॉल बर्लीआ – चेअरमन एपीजे एज्युकेशन ह्यांच्या हस्ते होईल. त्यावेळी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर रसिक कलाप्रेमी, संग्राहक उपस्थित राहतील. ह्या प्रदर्शनात कलेच्या क्षेत्रातील मान्यवर कलाकार, विद्यार्थी, संशोधक तसेच रचनात्मक शैलीत आपल्या कलाकृती तयार करणारे प्रथितयश चित्रकार, शिल्पकार वगैरेंच्या कलाकृती ठेवण्यात येतील.      एपीजे एज्युकेशन ही संस्था डॉ. सत्यपॉल ह्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी सुरु केली व तिच्या छत्रछायेत हल्ली २६, प्रथितयश कलाशिक्षण व प्रसार करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. हा वारसा त्यांची सुपुत्री श्रीमती सुषमा पॉल बर्लीआ समर्थपणे सांभाळत असून ए पी जे सत्या व सर्वण ग्रुप, एपीजे सत्या  विद्यापीठ सोहना, गुरुग्राम हरयाणा, ए पी जे कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स, जालंधर, पंजाब व ए पी जे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, नवी दिल्ली वगैरे कलाप्रवर्तक संस्थांच्या माध्यमातून ते आर्ट फॉउंडेशन गेली ५० वर्षे कला शिक्षणाचे व  प्रसाराचे करीत आहे. ह्यासाठी ठिकठिकाणी कला प्रदर्शनाचे व कलामहोत्सवांचे ती संस्था नेहमी आयोजन करीत असते आणि त्याद्वारे अनेक होतकरू व गुणवान कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्याद्वारे त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा प्रसार ती संस्था करते. अशा प्रकारे तिने आजवर ललित कला अकादमी, नवी दिल्ली, रशियन वकालत, नवी दिल्ली, हॉटेल अशोका, नवी दिल्ली वगैरे ठिकाणी ह्या प्रकारे कलामहोत्सवांचे आयोजन केले असून त्याद्वारे अनेक गुणवान कलाकारांना त्यांची कला रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी बहुमोल मदत केली आहे. त्यात चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, छायाचित्रण वगैरेचा समावेश होतो.     प्रस्तुत प्रदर्शनात विविध माध्यमातील चित्रे व शिल्पाकृती, ड्रॉईंग्ज, टॅपेस्ट्रीएस, टेराकोटामधील कलारूपे, छायाचित्रे वगैरे ठेवण्यात येतील. त्यात मुख्यतः तैलरंग, जलरंग, एक्रिलिक रंग, मिक्स मीडिया, टेराकोटा ह्यातील कलाकृती व छायाचित्रे ह्यांचा समावेश राहील. विविध कलासंस्थांमधील चित्रकलेचे अध्ययन करणारे विद्यार्थी, संशोधक तसेच होतकरू कलाकार ह्यांनी विविध माध्यमांच्या व तंत्रांचा वापर करून तयार केलेली कलारूपे वास्तववादी शैली, निम्न अमूर्त शैली व अमूर्त शैली ह्यामध्ये असून त्यात निसर्गवैभव, व्यक्तिचित्रे, भावपुर्ण चित्रे, ऐतिहासिक वास्तूंचे महत्व विशद करणारी चित्रे, धार्मिक स्थळे व संकल्पना दर्शविणारी चित्रे, जीवनाचे वास्तव दर्शविणारी चित्रे सादर केली आहेत.

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत महुआ रे हिचे “अँनाज….. स्प्रिंग फोर्थ” हे चित्र- शिल्प प्रदर्शन

चित्रकर्ती – महुआ रेनेहरू सेंटर कलादालन, डॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई३ ते ९ डिसेंबर २०२४सकाळी ११ ते संध्याकाळी ७…

Annaz ….. Spring Forth” . Picture – sculpture Exhibition

Cinematographer – Mahua RayNehru Center Art Gallery , Dr. Annie Besant Road , Worli , Mumbai3 to 9 December 202411 AM to 7…

“Kalaspandan Art Festival – 2024” From 29 November to 1 December 2024 at the Nehru Centre

Including various artists and famous painters of India “ Ka Kala Spandan Art Festival – 2024 ” This grand art festival d. From 29 November to 1 December 2024 at Nehru Centre, 2nd…

“कलास्पंदन कला महोत्सव – २०२४” २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०२४ हया कालावधीत नेहरू सेंटर मध्ये

भारतातील विविध कलादालने व नामांकित चित्रकारांचा समावेश “कलास्पंदन कला महोत्सव – २०२४” हा भव्य कला महोत्सव दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०२४ हया दरम्यान मुंबईत…

जहांगिर आर्ट गॅलरीत मनिष सुतार यांचे सफरनामा हे चित्र प्रदर्शन

चित्रकार: मनिष सुतारस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबईकालावधी: २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४वेळ: सकाळी…

जहांगिर आर्ट गॅलरीत पॉल डिमेलो यांचे “विस्मृतीतील पाने” (OBLIVION PAGES) हे एकल चित्र प्रदर्शन 

चित्रकार: पॉल डिमेलोस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबईकालावधी: २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विस्मृतीतील पाने वसई येथील सुप्रसिद्ध…

जहांगिर आर्ट गॅलरीत मदन पवार यांचे ‘ब्ल्यू सिटीज – ‘द पोएटिक सोल’ हे चित्र प्रदर्शन 

ब्ल्यू सिटीचे ‘द पोएटिक सोल’ (निळसर शहराचा काव्यमय आत्मा) चित्रकार: मदन पवारस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई कालावधी: १९ ते २५ नोव्हेम्बर, २०२४वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत   सुप्रसिद्ध समकालीन चित्रकार मदन पवार यांच्या जलरंगातील चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई  ४००००१ येथे दिनांक १९ ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी जलरंगाच्या कलात्मक छटातून तयार केलेली चित्रे राजस्थानमधील जोधपुर शहरातील घरांचे सौंदर्य व त्यांचे रचनात्मक पैलू आकर्षक रीतीने दर्शवतात. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ नोव्हेंबर २०२४ रोजी जहांगीर कलादालन, मुंबई येथे ५.०० वाजता मान्यवर अतिथी परवेझ दमानिया(कला संग्राहक) व संजना शाह  (ताओ आर्ट गॅलरी,मुंबई) यांच्या हस्ते होईल. मदन पवार यांचे कलाशिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले. त्यांना अनेक मान्यवर कला प्रवर्तक संस्थांनी फेलोशिप व पारितोषिके देऊन गौरविले आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ललित कला अकादमी नवी दिल्लीतर्फे राष्ट्रीय एकात्मिक पुरस्कार, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईतर्फे फेलोशिप वगैरेचा समावेश होतो. त्यांनी मुंबई, पुणे, कोलकत्ता, हैदराबाद, नवी दिल्ली, लखनऊ वगैरे बऱ्याच ठिकाणी एकल व सामूहिक चित्रप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे सादर केली आहेत. तसेच वडोदरा, कोकण, जयपुर, सिमला, पुणे, मुंबई वगैरे ठिकाणी आर्टकॅम्प व वर्कशॉप मध्ये सक्रिय भाग घेतला व चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनांना सदैव उदंड व सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई, USA,जपान, पुणे, वडोदरा, नवी दिल्ली, गोवा, अहमदाबाद वगैरे ठिकाणी असणाऱ्या मान्यवर कलासंग्रहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत. प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची चित्रे जलरंगातील एका विशिष्ट्य तंत्रशैलीवर आधारित आहेत. राजस्थानातील जोधपुर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण घरे, त्यांचे छत, जोधपुर शहराच्या भिंतींचे रंग, घराचे मूलभूत सौंदर्य व रचनात्मक वैशिष्ट्ये एका आकर्षक पद्धतीने मदन पवार यांनी सादर केली आहेत. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी घराच्या भिंतींचे सोनेरी निळसर रंग त्यांनी प्रकर्षाने दर्शविले असून तेथील लोकांचे राहणीमान व जीवनशैली यांचे कलात्मक दर्शन घडविताना लाल दगडांच्या बांधकामात बांधलेली घरे मातीच्या पायऱ्यांसह काढली आहेत. ही कृतिशीलता व जिवंतपणा चित्रमाध्यमातून चित्रकाराने येथे सादर केली आहे. बांबूवर काम करणारे लोक, रंगीबेरंगी बांधणीच्या पगड्या घालणारे लोक, साड्या तयार करणारे लोक, सोनारांच्या गल्ल्या, पूजापाठ करणाऱ्या ब्राह्मणांची वस्ती वगैरे विविध मोहल्ल्यातील लोकांचे सामाजिक जीवन व इतर पैलू यांचे एक रम्य दर्शन घडवताना ‘ब्ल्यू सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोधपूर शहराची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या चित्रात दाखवली आहेत. जोधपुर मधील घर एक प्रकारचं लिंबाच्या ठोशाचे मॉर्टर म्हणजे सुरखीचुन वापरून बनवलेली असतात. ज्यामध्ये ताम्र सल्फेट वापरल्यामुळे त्या घरांच्या भिंतीला निळसर रंग येतो जो टर्माइट्सपासून संरक्षण देतो. या निळसर रंगाच्या वापरामुळे किल्ल्यावरून शहराच्या दृश्याला एक विशेष निळसर रंग प्राप्त होतो. मदन पवार यांनी त्यांच्या हवाई दृष्टिकोनांच्या रचनांमध्ये ग्रीडस व स्थापत्याच्या रचनांचा कलात्मक उपयोग केला आहे. त्यामुळे रंग भरून ह्या रचनांमध्ये जादुई प्रतिमांची निर्मिती होते व सर्वांना एक वेगळा दृश्यानुभव मिळतो. पॉल सेझानच्या फॉविस्ट लँडस्केपमधून प्रेरणा घेऊन मदन पवार यांनी आपल्या स्वतंत्र व कलात्मक शैलीत येथे बोलकी व अर्थपूर्ण चित्रे रसिकांपुढे सादर केली असून ती सर्वांना आगळावेगळी अनुभूती व शांती देतात आणि त्यांच्या अंतर्मनांचा ठाव घेतात. तसेच चित्रांमध्ये तीव्र व चौकोनी आकार आहेत जे एकमेकांशी निगडित आहेत व हा प्रभाव एक प्रकारे प्रिझमसारखा आहे.

व्हॉयेज

कोलकाता येथील सुप्रसिद्ध समकालीन चित्रकर्ती स्वाती रॉय यांचे ‘व्हॉयेज’ हे एकल चित्र प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, डॉ. आणि बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१९ येथे १९…

error: Content is protected !!
Call Now Button