कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले

~ नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान, डिझाइन आणि स्थिरतेचे संयोजन ~ मुंबई, ६ ऑक्टोबर २०२४: किया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकरने…

रोल्स-रॉईसने कलीननची सीरीज II भारतात सादर केली

~ जगातील सर्वोत्तम सुपर-लक्झरी एसयूव्ही ग्राहकांसाठी कस्टम मेड स्वरूपात उपलब्ध असेल ~ मुंबई, ६ ऑक्टोबर २०२४: रोल्स-रॉईस मोटर कार्स…

महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इलेक्ट्रिक सीव्ही उत्पादक कंपनीतर्फे ७.५२ लाख रुपये किंमतीत महिंद्रा ‘झिओ’ ४डब्ल्यू एससीव्ही लाँच

ही ई- एससीव्ही आपली सर्वाधिक रेंज, वेगवान चार्जिंग आणि नव्या वैशिष्ट्यांच्या मदतीने < 2 t 4W इलेक्ट्रिक विभागातील समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी सज्ज ·         महिंद्रा झिओजचे ३००+ व्ही हाय- व्होल्टेज आर्किटेक्चरमुळे मिळते जास्त चांगली उर्जा कार्यक्षमता, उच्च श्रेणी आणि चार्जिंगचा वेगवान वेळ ·         महिंद्रा झिओला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देण्यात आले असून ते १६० किमीपर्यंत वास्तविक ड्रायव्हिंग श्रेणी देते ·         महिंद्रा झिओ आपल्या ६० मिनिटांच्या वेगवान चार्जिंग सुविधेच्या मदतीने १००० किलोमीटर श्रेणी देते. ·         महिंद्रा झिओची आधुनिक इलेक्ट्रिक मोटर ३० केडब्ल्यू पॉवर आणि ११४ एनएम टॉर्क देते ·         लिक्विड कुल्ड २१.३ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक सर्वोच्च AIS038 हाय- व्होल्टेज बॅटरीचे मापदंड पूर्ण करणारा आहे ·         निमो युनिव्हर्सद्वारे फ्लीट्ससाठी फ्लीट मॅनेजमेंट सिस्टीम (एफएमएस) ताफ्यांसाठी आणि वैयक्तिक वापरासाठी नेमो ड्रायव्हर अप ·         एआय अनेबल्ड कॅमेरा एडीएएससमध्ये लेन डिपार्चर, पादचारी सुरक्षेसाठी धोक्याचे इशारे व इतर बरंच काही देण्यात आले आहे. ·         हिल होल्ड असिस्ट आणि क्रीप फंक्शन भरगच्च ट्रॅफिकमध्ये उपयुक्त ·         डिझेल एससीव्हीशी तुलना करता ग्राहकांना सात वर्षांत ७ लाख रुपये वाचवता येणार नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर २०२४ – महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) या भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या इलेक्ट्रिक तीन चाकी कंपनीने आज महिंद्रा झिओ या क्रांतीकारी, नव्या इलेक्ट्रिक चारचाकीचे अधिकृत लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. झिओ हे नाव ‘झिरो एमिशन ऑप्शन’ वरून घेण्यात आले असून ते इलेक्ट्रिक वाहनाचे पर्यावरणीय फायदे अधोरेखित करते. ही गाडी एमएलएमएमएलच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतुकीची सोय देण्याच्या आणि ग्राहकांना त्यांच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी मदत करण्याच्या तत्वाशी सुसंगत आहे. दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेली एमएलएमएमएल शहरी वाहतुकीच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. एमएलएमएमएलने महिंद्रा झिओची किंमत ७.५२ लाख रुपये एक्स– शोरूम पॅन भारत ठेवली आहे. त्यामुळे डिझेल एससीव्हीशी तुलना करता ग्राहकांना सात वर्षांत ७ लाख रुपये वाचवता येतील. ताकदवान कामगिरी महिंद्रा झिओमध्ये कार्यक्षम  हाय– व्होल्टेज ३००+ व्ही आर्किटेक्चर देण्यात आले आहे, जे उच्च प्रतीची उर्जा कार्यक्षमता, मोठी श्रेणी आणि वेगवान चार्जिंग देते. महिंद्रा झिओची आधुनिक मॅग्नेट सिंक्रोनॉस मोटर ३० केडब्ल्यू उर्जा आणि ११४ एनएम टॉर्क देते. यातील जबरदस्त २१.३ केडब्ल्यूएच लिक्विड– कुल्ड बॅटरी जबरदस्त कामगिरी करते. ६० किमीच्या सर्वोच्च वेगासह झिओ प्रवास पटकन संपवत असल्यामुळे मिळकतीचे प्रमाण वाढते.…

error: Content is protected !!
Call Now Button