दरवर्षी जगभरातील लाखो व्यक्तींना फ्लू आजार होतो. तसेच, दरवर्षाला १ बिलियनहून अधिक प्रकरणे आढळून येतात, ज्यामध्ये ३ ते ५ दशलक्ष प्रकरणे गंभीर असतात. ज्यामुळे हा आजार हंगामी आजारांपेक्षा अधिक घातक आहे. सर्दी-खोकल्यासह होणाऱ्या या फ्लू आजारामुळे दैनंदिन जीवन व कामात मोठा अडथळा येऊ शकतो. स्वत:चे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, पण जागरूकतेचा अभाव व गैरसमजांमुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: श्रमजीवी व्यावसायिकांना फ्लू आजार होण्याचा सर्वाधिक धोका आहे. तुम्ही शहरातील कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी असा किंवा लहान नगरामधील कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी असा फ्लू आजाराचा तुमचे कुटुंब आणि काम व जीवनावर परिणाम होऊ शकतो. अनेक लोक आजारी असताना देखील कामावर जातात, परिणामत: कामावर लक्ष लागत नाहीत, तसेच इतरांना देखील फ्लू आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच, डॉक्टरांकडे जाण्याच्या, औषधोपचारांचा आणि हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या खर्चांमुळे अधिक तणाव येऊ शकतो. अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. जेजो करणकुमार म्हणाले, “फ्लूचा कामाच्या ठिकाणी उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. भारतात आरोग्यसेवा सिस्टमवर संसर्गजन्य आजारांचा मोठा दबाव आहे, ज्यामुळे फ्लू लसीकरणाबाबत जागरुकता वाढवणे महत्त्वाचे आहे. लसीकरण केल्यास तुमचे फ्लूपासून संरक्षण होते. तसेच तुमचे संरक्षण होण्यासोबत सार्वजनिक आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होते, ज्यामुळे फ्लूच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्या कमी होऊ शकतात.” भारतात फ्लू लसीकरणाचा अवलंब आजही सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये असला तरी वाढत्या जागरूकतेमुळे अधिकाधिक व्यक्तींचे फ्लूपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलचे चेस्ट मेडिसीनचे सीनियर कन्सल्टण्ट डॉ. सुजीत के. राजन म्हणाले, “फ्लू लस सुरक्षित, गुणकारी आहे आणि दरवर्षी सर्वात सामान्य व्हायरस स्टेन्सनुसार अपडेट केली जाते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) फ्लू विषाणूंवर देखरेख ठेवते आणि इन्फ्लूएन्झा सीझन्ससाठी वर्षातून दोनदा लस अपडेट करते. 65 वर्षांनंतर निरोगी जीवनशैली कायम राखणे आणि दरवर्षी लस घेणे ही स्वतःचे संरक्षण करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. काही अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या 65 वर्षांखालील रुग्णांनाही वार्षिक इन्फ्लूएंझा लसीकरणाचा फायदा होऊ शकतो. दरवर्षी एकदा लस घेतल्यास फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि न्यूमोनिया सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण होऊ शकते. लस घेतल्याने तुम्ही स्वत:चे संरक्षण करण्यासोबत आसपासच्या इतरांना सुरक्षित ठेवण्यास देखील मदत करता.” भारतात, सर्वात समान्य फ्लू विषाणू आहेत सबटाइप ए (एच१एन१) आणि ए (एच३एन२). हिवाळा व पावसाळ्यादरम्यान फ्लूचा प्रसार सवाधिक होतो आणि संसर्गित व्यक्ती खोकल्यास, शिंकल्यास किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या लहान ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरतो. कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी नियमितपणे हात स्वच्छ धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झााकून ठेवा. बरे वाटत नसल्यास घरीच राहा, ज्यामुळे फ्लूचा प्रसार होणार नाही. कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी सवयींचे पालन करणे आणि दरवर्षी लसीकरण करणे यामुळे तुमचे व तुमच्या आसपासच्या व्यक्तींचे फ्लूपासून संरक्षण होण्यास मदत होते.
Category: Business
भारतातील ९८ टक्के व्यवसाय प्रमुख जलदपणे एआयचा अवलंब करत आहेत, पण कुशल टॅलेंट सापडणे आव्हानात्मक ठरत आहे: लिंक्डइन
● भारतातील ५४ टक्के रिक्रूटर्स म्हणतात की, फक्त अर्धे किंवा अर्ध्याहून कमी रोजगारासाठी केलेले अर्ज आवश्यक…
कोटकचे नवीन ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा’मधून महत्त्वाकांक्षी भारतीयांचा उत्साह दिसून येतो
मुंबई, फेब्रुवारी २५, २०२५ – कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) आज परिवर्तनात्मक नवीन ग्रुप ब्रँड…
AI powered smart parking system by Park+, manages over 5 lakh vehicles at MahaKumbh 2025
National | 26th February, 2025: Park+, India’s leading auto-tech super app, today announced a major milestone-…
कायनेटिक ग्रीन ई-लुनासाठी नवीन टीव्हीसी लाँच करणार, आधुनिक ट्विस्टसह आयकॉनिक टॅगलाइन ‘चल मेरी लुना’ला पुन्हा आणले
पुणे, २५ फेब्रुवारी २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्समधील अग्रणी…
Marriott Bonvoy and Manchester United Invite the Club’s Most Passionate Fans for a Once-in-a-Lifetime Stay in The Captain’s Suite Inspired by Legend Gary Neville
One lucky fan will meet the iconic player, sleep over in the revamped Marriott Hotels’ Suite…
स्वप्नं बघणे आणि उद्दिष्टे ठेवणे प्रत्येकाला शक्य व्हावे म्हणून एचडीएफसी लाइफ आणत आहे ‘क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हाण्टेज’
मुंबई, फेब्रुवारी २४, २०२५: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपनीने एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हांटेज (HDFC Life Click 2 Achieve Par Advantage) हे आपले नवीनतम उत्पादन सर्वांसमोर आणले आहे. व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांशी निगडित उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून हे पार्टिसिपेटिंग उत्पादन तयार करण्यात आले आहेत. व्यक्ती त्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा/उद्दिष्टांसाठी सातत्याने बचत करत असतात आणि त्यांचे प्राधान्य सुरुवातीच्या टप्प्यापासून रोखता (लघुकालीन गरजांसाठी), लवचिकता आणि भविष्यकाळासाठी आर्थिक सुरक्षितता यांना असते, असे निरीक्षण आहे. एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हांटेज पुढील सुविधांनी युक्त आहे: ग्राहक त्यांच्या भविष्यकाळातील गरजांनुसार हे पर्याय कोणत्याही संगतीमध्ये (कॉम्बिनेशन) निवडू शकतात. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक विमा संरक्षणासह ही योजना पुढील बाबीही देऊ करते: अतिरिक्त आयुर्विमा संरक्षण– याद्वारे विमा काढणाऱ्या व्यक्तीला जोडीदारासाठी संरक्षण घेण्याची मुभा मिळते. करविषयक लाभ – प्रचलित कर कायद्यांच्या आधारे व्यक्तींना हे लाभ लागू होतात. आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला आयुर्विमा संरक्षण आवश्यक आहे. एचडीएफसी लाइफ ही कंपनी आयुर्विमा (life insurance) क्षेत्रात नवोन्मेष्कारी कस्टमाइझ करण्याजोगी उत्पादने देऊ करत आहे. भारतीय ग्राहकाच्या सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या गरजांची पूर्तता ही उत्पादने करतात. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार अनेक सेवापर्याय पुरवणारा ठोस डिजिटल प्लॅटफॉर्म कंपनी देऊ करते. दावे चुकते करण्याचे सातत्यपूर्ण व वाढते प्रमाण एचडीएफसी लाइफची ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी दाखवून देते. आर्थिक वर्ष २४ मध्ये हे प्रमाण ९९.५० टक्के होते. एचडीएफसी लाइफच्या प्रोडक्ट्स अँड सेगमेंट्स विभागाचे प्रमुख अनीश खन्ना या उत्पादनाबद्दल म्हणाले, “आयुर्विमा उत्पादने ही प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित केलेली असावीत, असे एचडीएफसी लाइफला वाटते. या गरजा व्यक्तीचे वय, आयुष्यातील टप्पा, वर्तमान उत्पन्न व भविष्यकाळातील योजना यांवर अवलंबून असतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच घराची खरेदी, मुलांना प्रतिष्ठेच्या शिक्षणसंस्थांमध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेऊन देणे यांसारखी उद्दिष्टे साध्य करणे ही प्रत्येक व्यक्तीची स्वप्नं असतात. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एखाद्या साधनामार्फत दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असते. हे साधन लवचिकता, रोखता व आर्थिक सुरक्षितता देणारे असावे लागते. अधिक चांगला भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक सुरक्षा उपायांच्या मदतीने अनिश्चिततांपासून आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील व्यक्तींना एक साधन पुरवण्याच्या उद्देशाने एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हाण्टेज हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे.”
Toyota Kirloskar Motor Honoured with ‘Star Performer Award’ at the Prestigious EEPC India National Export Awards
Bangalore, 25th February 2025: Recognising its export excellence, Toyota Kirloskar Motor (TKM) was recently honoured with…
Kotak’s New Brand Philosophy ‘Hausla Hai Toh Ho Jayega’ Reflects the Spirit of Aspirational India
Mumbai, February 25th, 2025 – Kotak Mahindra Bank (“KMBL” / “Kotak”) today introduced ‘Hausla Hai Toh…