- यामाहा RayZR 125 Fi Hybrid रेंजवर विना अतिरिक्त खर्चामध्ये उद्योग अग्रणी 10-वर्ष ‘टोटल वॉरंटी’ देखील आहे
यामाहा मोटर कं. लि. (वायएमसी) आज आपला 70वा स्थापना दिन साजरा करत आहे, जो जगभरातील ग्राहकांना नाविन्यता, कार्यक्षमता आणि राइडिंग उत्साह देण्याच्या त्यांच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 1955 पासून यामाहा आपल्या चॅलेंजर उत्साहाशी बांधील राहिली आहे, अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि गतीशीलतेप्रती आवड दर्शवत आहे, जी लाखो राइडर्सना प्रेरित करते.

या खास प्रसंगाला साजरे करण्यासाठी इंडिया यामाहा मोटर त्यांच्या लोकप्रिय RayZR 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid Street Rally वर 7,000 रूपयांचा (एक्स-शोरूम किमतीवर) प्राइस बेनीफिट देत आहे. ही मर्यादित कालावधीसाठी सेलिब्रेटरी ऑफर ग्राहकांचे त्यांनी दशकांपासून सातत्याने दाखवलेला विश्वास व पाठिंब्याकरिता आभार मानण्याची आमची पद्धत आहे. या फायद्यासह ग्राहक आता अंतिम ऑन-रोड किमतीवर जवळपास 10,000 रूपयांची बचत करू शकतात. या ऑफरमध्ये यामाहाच्या उद्योग-अग्रणी 10-वर्ष ‘टोटल वॉरंटी’चा देखील समावेश आहे, ज्यामुळे RayZR 125cc सेगमेंटमधील अधिक लक्षवेधक निवड बनली आहे.
या 10-वर्ष ‘टोटल वॉरंटी’मध्ये 2-वर्ष स्टॅण्डर्ड वॉरंटी आणि 8-वर्ष एक्स्टेण्डेड वॉरंटीचा समावेश आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण इंजिन व इलेक्ट्रिकल कम्पोनण्ट्ससह जवळपास 1,00,000 किमीसाठी फ्यूएल इंजेक्शन (Fi) सिस्टमला कव्हर केले जाईल. पुढील मालकांना हस्तांतरित करता येऊ शकणाऱ्या या उद्योग-अग्रणी कव्हरेजमधून यामाहाचा आपल्या उत्पादन टिकाऊपणावरील आत्मविश्वास दिसून येतो आणि दीर्घकालीन मालकीहक्क मूल्यामध्ये वाढ करतो.

RayZR 125 Fi Hybrid आजच्या शहरी राइडर्सच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जे कार्यक्षमता व व्यावहारिकतेचा शोध घेतात. या स्कूटरमधील 125cc Fi ब्लू कोअर इंजिनसह हायब्रिड पॉवर असिस्ट सुधारित अॅक्सेलरेशन आणि इंधन कार्यक्षमता देते, जे शहरातील क्रूझिंग प्रवासासाठी अनुकूल आहे. स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) सुलभ, शांतमय स्टार्ट देते, ज्यामुळे दैनंदिन राइड अधिक सोईस्कर होते. E20 इंधन सुसंगतेसह या स्कूटरमधील फ्यूचर-रेडी आणि 21-लिटर अंडर-सीट स्टोरेज या स्कूटरला दैनंदिन वापरासाठी व्यावहारिक बनवते. राइडर्सना सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा देखील फायदा होतो, जसे राइडिंगदरम्यान सर्वोत्तम आरामदायीपणासाठी फ्रण्ट टेलिस्कोपिक सस्पेंशन, अधिक सुरक्षिततेसाठी साइड स्टॅण्ड इंजिन कट-ऑफ स्विच, वाहतूकीमध्ये सुधारित मायलेजसाठी ऑटोमॅटिक स्टॉप-अॅण्ड-स्टार्ट सिस्टम आणि फुली डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह Y-कनेक्ट ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी, जी राइडर्सना चालता-फिरता माहितीपूर्ण व कनेक्टेड ठेवते.

मॉडेल व्हेरिएण्ट उपलब्ध रंग नवीन किंमत
(एक्स-शोरूम, दिल्ली)
RayZR 125 Fi Hybrid ड्रम सियान ब्ल्यू, मेटलिक ब्लॅक आणि मॅट रेड 79,340
डिस्क सियान ब्ल्यू, मेटलिक ब्लॅक, मॅट रेड, रेसिंग ब्ल्यू आणि डार्क मॅट ब्ल्यू 86,430
RayZR 125 Fi Hybrid Street Rally डिस्क आइस फ्लूओ व्हर्मिलियन, सायबर ग्रीन आणि मॅट ब्लॅक 92,970
यामाहाने विद्यमान उत्पादने आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून राइडर्सना दृढ मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 1955 मध्ये स्थापनेसाठी चालना दिलेल्या त्याच उत्साहासह यामाहा ग्राहकांच्या विश्वासाने आणि 70 वर्षांच्या त्यांच्या गौरवशाली वारशाने प्रेरित होऊन नवीन आव्हानांना सामोरे जाईल.