क्‍लीअरट्रिप अनपॅक २०२५ – भारतीयांनी सुट्टीदरम्‍यान विमानाने केलेला प्रवास, मुक्‍काम आणि सुट्टीच्‍या निेयोजनाबाबत माहिती

News Service
  • जनरेशन झेड पर्यटकांमध्‍ये ६५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली – दुबई, क्‍वालालंपूर आणि बँकॉक ही सर्वाधिक पसंतीची गंतव्‍ये होती.
  • यूपीआय पेमेंट्स ६ टक्‍क्‍यांनी आणि क्रेडिट कार्ड पेमेंट्स ८ टक्‍क्‍यांनी वाढले; ६६ टक्‍के बुकिंग्‍ज स्‍मार्टफोनच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आले.
  • उत्तर प्रदेश सर्वाधिक भेट देण्‍यात आलेले राज्‍य ठरले – निवासस्‍थानाचा शोध प्रयागराज (तिप्‍पट) आणि बरेली (चौपट) यांच्‍यासाठी मोठ्या प्रमाणात वाढले.
  • व्हिएतनाम उदयोन्‍मुख आंतरराष्‍ट्रीय पर्यटन स्‍थळ म्‍हणून उदयास आले.
  • दिल्‍ली व बेंगळुरू अव्‍वल सोलो ट्रॅव्‍हल गंतव्‍ये ठरली.
  • काल्‍मकेशन, वर्केशन, डिजिटल डिटॉक्‍स आणि अॅडव्‍हेंचर ट्रॅव्‍हल हे काही उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड्स होते.
  • दोन व्‍यक्‍तींनी एक वर्ष आधीच निवासस्‍थानांचे बुकिंग केले, सर्वाधिक मुक्‍कामाचे बुकिंग एक महिन्‍यासाठी करण्‍यात आले होते.
  • ३ लाख व्‍यक्‍तींनी रात्री ३ ते सकाळी ४ यादरम्‍यान फ्लाइट्सचे बुकिंग केले.
  • सर्वात स्‍वस्‍त फ्लाइट ० रूपये आणि सर्वात स्‍वस्‍त हॉटेल ४८ रूपये; सर्वात महाग फ्लाइट ४.३ लाख रूपयांमध्‍ये बुक करण्‍यात आली आणि सर्वात महाग निवासस्‍थान ४.३४ लाख रूपयांना बुक करण्‍यात आले.
  • डिपार्चरच्‍या ४८ तासांमध्‍ये ३८ लाख फ्लाइट बुकिंग्‍ज करण्‍यात आल्‍या.

बेंगळुरू, १७ डिसेंबर २०२५: क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आणि भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्मने आज २०२५ मध्‍ये भारतीयांनी सुट्टीदरम्‍यान विमानाने केलेला प्रवास, मुक्‍काम आणि सुट्टीच्‍या नियोजनाचे पुनरावलोकन ‘क्‍लीअरट्रिप अनपॅक’ जारी केले. या वर्षाची खासियत म्‍हणजे जनरेशन झेड पर्यटकांमध्‍ये मोठ्या संख्‍येने वाढ झाली आणि ‘मूल्‍य व किफायतशीरपणा’ अग्रणी ऑफरिंग ठरली, जिने लाखो भारतीयांचे लक्ष वेधून घेतले.

१. वर्षातील खास वैशिष्‍ट्य: किफायतशीरपणा, मूल्‍य आणि जनरेशन झेड!
● सोईस्‍कर यूपीआय पेमेंट्स आणि अनेक बँकांसोबत सहयोगांमुळे यूपीआय व्‍यवहारांमध्‍ये ६ टक्‍के वाढ झाली आणि क्रेडिट कार्ड पेमेंट्समध्‍ये ८ टक्‍के वाढ झाली.
● क्‍लीअरट्रिपवर ६५ टक्‍क्‍यांहून अधिक बुकिंग्‍ज बजेट व मध्‍यम रेंजच्‍या हॉटेल्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीसाठी करण्‍यात आले.
● स्‍मार्टफोनमधील क्‍लीअरट्रिप मोबाइल अॅपववर ६५ टक्‍के बुकिंग्‍ज करण्‍यात आले.
● २०२५ मध्‍ये जनरेशन झेड पर्यटकांमध्‍ये ६५० टक्‍के वाढ झाली. त्‍यांनी या वर्षी विविध पर्यटन स्‍थळांवर जाण्‍याचा आनंद घेतला.
● सर्वाधिक ‘पसंतीची’ गंतव्‍ये होते दुबई, क्‍वॉलालंपूर व बँकॉक – #GenZApproved!

२. भारतीयांनी केलेल्‍या प्रवासाबाबत माहिती
● व्हिएतनाम २०२५ मधील उदयोन्‍मुख आंतरराष्‍ट्रीय पर्यटन स्‍थळ ठरले, जेथे पर्यटक संख्‍येमध्‍ये १३३ टक्‍के वाढ झाली.
● आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रवास करण्‍यामागील आत्‍मविश्वासासाठी प्रमुख कारण क्‍लीअरट्रिपचे व्हिसा रिजेक्‍शन कव्‍हर होते.
● वाराणसी आणि अंदमान बेटावर जाणाऱ्या पर्यटकांच्‍या संख्‍येत सरासरी २० टक्‍के वाढ झाली.
● उत्तर प्रदेश २०२५ मध्‍ये सर्वाधिक भेट देण्‍यात आलेले राज्‍य ठरले. निवासस्‍थानाचा शोध प्रयागराज (तिप्‍पट) आणि बरेली (चौपट) यांच्‍यासाठी मोठ्या प्रमाणात वाढला.
● दिल्‍ली व बेंगळुरू यंदा अव्‍वल दोन सोलो ट्रॅव्‍हल गंतव्‍ये ठरली. दिल्‍लीमधून हिमाचल प्रदेश, जयपूर आणि आग्रा येथे सर्वाधिक ये-जा प्रवास दिसण्‍यात आली. बेंगळुरूमधून कूर्ग, उटी आणि कोडाइकनालसाठी प्रवास करण्‍यात आला – विश्रांतीसाठी किंवा आयटी/टेक पार्क्‍ससाठी? किंवा दोन्‍हींसाठी!
● फुकेत, क्‍वॉलालंपूर आणि बँकॉक २०२५ मधील सर्वात लोकप्रिय गंतव्‍ये ठरली.
● २०२५ मध्‍ये काही ट्रेण्‍ड्स देखील उदयास आले:
○ पर्यटकांनी कामापेक्षा शांतमय विरंगुळ्याला प्राधान्‍य दिले, जेथे त्‍यांनी ऋषीकेश, कूर्ग आणि अल्‍लेपी येथे ‘कॅल्‍मकेशन’चा आनंद घेतला.
○ कामात व्‍यस्‍त किंवा घरातून काम करणारे? गोवा, पॉंडिचेरी व दार्जिलिंग अव्‍वल ‘वर्केशन’ गंतव्‍ये ठरली.
○ स्पिटी, अंदमान व लडाख ही ‘डिजिटल डिटॉक्‍स’साठी सर्वाधिक पसंतीची गंतव्‍ये ठरली.
○ संपूर्ण भारतातील ‘अॅडव्‍हेंचर जंकीज’नी यंदा बिर बिलिंग, लक्षद्वीप आणि ऑली येथे साहसी पर्यटनाचा आनंद घेतला.

आगळेवेगळे पर्यटक आणि त्‍यांनी पर्यटनाबाबत केलेले नियोजन
● काही पर्यटकांनी चिकमंगळुरू, कर्नाटकमध्‍ये निवासस्‍थानासाठी ३६१ दिवस आधी बुकिंग केले. काही पर्यटकंनी रिबंदर, गोव्‍यामध्‍ये निवाासस्‍थानासाठी ३५० दिवस आधी बुकिंग केले.
● ३,००,००० व्‍यक्‍तींनी रात्री ३ ते सकाळी ४ दरम्‍यान तिकिटे बुक केली. या व्‍यक्‍तींनी जगातील सर्वाते मोठे व्‍यावसायिक विमान ३५३ एअरबस-३८० मधून प्रवास केला.
● बेंगळुरूमध्‍ये पर्यटकांनी एकाच मालमत्तेत सलग ३० दिवस मुक्‍काम केला. कोलकातामध्‍ये सलग २९ दिवस मुक्‍काम केला.
● क्‍लीअरट्रिपवर बुक करण्‍यात आलेल्‍या सर्वात स्‍वस्‍त फ्लाइटचा खर्च ० रूपये होता (ऑफर्स व वॉलेट क्रेडिट्सच्‍या माध्‍यमातून पूर्णपणे रिडिम करण्‍यात आले). सर्वात स्‍वस्‍त निवास ४८ रूपये होते. या व्‍यक्‍ती आता केस स्‍टडीज करत आहेत.
● एका पर्यटकाने दिल्‍ली-गुवाहाटी फ्लाइटवर २,४०,००० रूपये खर्च केले, तर आणखी एका पर्यटकाने पॅरिस-मुंबई फ्लाइटवर ४,४३,००० रूपये खर्च केले.
● यंदा बुक करण्‍यात आलेला सर्वात महाग हॉटेल मुक्‍काम मालदिवमध्‍ये ४,४१,००० रूपये होता. आम्‍हाला वाटते की, कदाचित हा खर्च विसरलेल्‍या अॅनिव्‍हर्सरी सेलिब्रेशनसाठी असेल.
● एका पर्यटकाने गाजियाबाद-बेंगळुरू फ्लाइटमध्‍ये अतिरिक्‍त सामानासाठी ६५,००० रूपये खर्च केले.
● डिपार्चरच्‍या ४८ तासांमध्‍ये ३८,००,००० फ्लाइट बुकिंग्‍ज करण्‍यात आले, यामधून भारतातील लोकांमधील अचानक किंवा ऐनवेळी प्रवास करण्‍याची वाढती सवय दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button