महाराष्ट्र, ऑक्टोबर २०२५: संपूर्ण महाराष्ट्रात सणासुदीचा काळ उत्साहात सुरू असताना प्रत्येक रस्ता, बाजारपेठ आणि आसपासचा परिसर रंग, आनंद व एकतेसह भरून गेले आहेत. कोका-कोला इंडिया या प्रसंगांना विशेष करणाऱ्या व्यक्तींना आणि समुदायांना प्रशंसित करत आहे, तसेच रिफ्रेशमेंट नेहमी आवाक्यात असण्याची खात्री घेत आहे आणि क्षण तयार करत आहे, जेथे कुटुंबं व मित्र एकत्र येऊन उत्साहाचा आनंद घेऊ शकतात.

‘लोकली युअर्स’ मोहिमेसह कंपनी आपला नेबरहूड-फर्स्ट दृष्टिकोन अधिक दृढ करत आहे, तसेच थंडगार पेये अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत आहे आणि स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना प्रकाशझोतात आणत आहे, जे समुदायांना उत्तम सुविधा देतात. ग्राहकांच्या प्रवासामध्ये अनेक टचपॉइण्ट्स निर्माण करत कोका-कोला इंडिया दैनंदिन समारोहांना आपलेपणाच्या एकत्रित क्षणात बदलण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
या सीझनमध्ये अद्वितीय उत्साहाची भर करत आहे माझाचा ‘शारोद शेरा आबाशोन’. हा रेसिडण्ट वेल्फेअर असोसिएशन (आरडब्ल्यूए) उपक्रम समुदायांमध्ये काळजी व सुसंगता आणणाऱ्या गृहनिर्माण सोसायटींना प्रकाशझोतात आणतो. पाच श्रेणींमधील स्पर्धेच्या माध्यमातून सोसायटी लहान यश व दैनंदिन प्रयत्नांना दाखवू शकतात, जे त्यांच्या साजरीकरणाला अर्थपूर्ण बनवतात. या निवासी-केंद्रित योगदानांना सन्मानित करत हा उपक्रम या संबंधांना सक्रियपणे निपुण करणाऱ्या व्यक्तींना प्रशंसित करतो.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट आशियाचे विकसित होत असलेल्या बाजारपेठांमधील फ्रँचायझी ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष करण आचपाल म्हणाले, ”आमच्या यंत्रणेची ताकद विशेषत: साजरीकरण सर्वोच्च असलेल्या सणासुदीच्या काळादरम्यान समुदायांच्या उत्साहाशी जुडले जाण्याच्या क्षमतेमध्ये सामावलेली आहे. आमचे ही वाढ ग्राहकांसाठी विश्वासार्ह उपलब्धतेमध्ये बदलेल आणि आमच्या सहयोगींसाठी प्रबळपणे वाटचाल करता येईल, याची खात्री घेण्यावर लक्ष केंद्रित आहे. आमचा मनसुबा आहे की, या सीझनदरम्यान निर्माण करण्यात आलेले मूल्य समुदायांना साजरीकरणानंतर देखील सक्षम करेल.”
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विनय नायर म्हणाले, ”देशातील या भागामध्ये सण म्हणजे अतिथींना सोयीसुविधा देण्यासोबत सामुदायिक समारोहांना महत्त्व देणे देखील आवश्यक आहे. घरामध्ये किंवा स्थानिक स्टोअरमध्ये जलदपणे थंडगार पेयाचा आस्वाद द्यायचा असो आदरातिथ्याची भावना या सीझनला विशेष बनवते.”
या बाबीला पूरक म्हणून स्प्राइट आपल्या ‘स्प्राइट गटक थंड रख’ मोहिमेसह स्टेशन्स व ट्रॅव्हल हबमधील पर्यटकांपर्यंत पोहोचत आहे, तर कोका-कोलाने व्यक्तींना थंडगार पेयाचा आस्वाद घेण्यास एकत्र आणण्यासाठी कूलिंग पॉइण्ट्ससह कम्युनिटी हब्स आणि स्थानिक हँगआऊट्स सुरू केले आहेत. एकत्रित हे क्रियाकलाप खात्री देतात की, ग्राहक सणाचा आनंद घेण्यासोबत रिफ्रेशमेंटचा अनुभव घेऊ शकतात.
कोका-कोला इंडियाची कटिबद्धता रिफ्रेशमेंटच्या पलीकडे जाते. आपल्या प्रयत्नांमध्ये समुदाय, रिटेलर्स व निवासींना प्राधान्य देत कंपनी सामान्य समारोहांना अर्थपूर्ण साजरीकरणामध्ये बदलत आहे आणि सणासुदीच्या काळानंतर देखील टिकून राहणारे संबंध निर्माण करत आहे.