कोक स्‍टुडिओ भारतने अनुव जैन यांचे हिंदी बॅलॅड (गाथागीत) ‘अर्ज़ किया है’सह आपला संगीतमय प्रवास सुरू ठेवला

News Service

राष्‍ट्रीय, २० ऑगस्‍ट २०२५: कोक स्‍टुडिओ भारत हे भारताच्‍या वैविध्‍यपूर्ण संगीत वारसाला प्रशंसित करणारे व्‍यासपीठ सीझन ३ चे पाचवे गाणे ‘अर्ज़ किया है’सह परतले आहे. या गाण्‍यामध्‍ये भारतातील सर्वात लोकप्रिय गायक व गीतकार अनुव जैन आहेत. अनुव जैन यांनी स्‍वत: संकल्पित, लेखन, संगीतबद्ध केलेल्‍या व गायलेल्‍या या गाण्‍यामधून प्रेम, दुरावा आणि न व्‍यक्‍त झालेल्‍या भावनांच्‍या वेदना जाणवतात. आपल्‍या खास हृदयस्‍पर्शी कथानकाच्या माध्‍यमातून अनुव जैन यांनी हे गाणे गायले आहे, ज्‍यामधून वाट पाहण्‍याचे क्षण, शांततेमधील भावना आणि असुरक्षिततेचे सौंदर्य कॅप्‍चर करण्‍यात आले आहे.

‘अर्ज़ किया है’ गाण्‍यामधून जिव्‍हाळ्याच्‍या भावना व्‍यक्‍त होतात, जेथे प्रत्‍येक पॉजमधून उत्‍कंठा व भावना दिसून येते. साध्या, पण लक्षवेधक गीतरचनेसह या गाण्‍यामधून काळाच्‍या ओघात लुप्‍त झालेल्‍या प्रेमाचा अनुभव मिळतो, जेथे उत्तरे शोधण्‍याचा प्रयत्‍न करणारी नजर, न व्‍यक्‍त झालेल्‍या भावना आणि हृदयामध्‍ये प्रेम जागृत करणारी आशा पाहायला मिळते. भारतीय इलेक्ट्रॉनिक जोडी लॉस्‍ट स्‍टोरीजने (रिषब जोशी) या गाण्‍यामध्‍ये अधिक सखोलता आणली आहे, ज्‍यांचे अनोखे प्रॉडक्‍शन व भावपूर्ण हार्मोनिका गाण्‍यामध्‍ये अधिक भावनेची भर करतात.

मान्‍सूनच्‍या उत्‍साहपूर्ण वातावरणाच्‍या पार्श्वभूमीवर आधारित हे हिंदी बॅलॅड भारताच्‍या काव्‍यात्‍मक वारसाला मानवंदना आहे. अनुव यांनी त्‍यांच्‍या गिटारच्या साथीने हे गाणे गायले आहे, ज्‍यासह कोक स्‍टुडिओ भारत सर्वोत्तम व्हिज्‍युअल्‍स व साऊंडसह या गाण्‍यामधील भावना जागृत करते, ज्‍यामध्‍ये गाण्‍यामधील आत्‍मीयतेशी बांधील राहिलेली सखोलता व मधुर संगीताचे संयोजन आहे.

कोका-कोला इंडियाचे आयएमएक्‍स लीड शंतनू गंगाणे म्‍हणाले, “या सीझनमधील प्रत्‍येक गाण्‍यासह कोक स्‍टुडिओ भारत भारतातील संगीतक्षेत्राच्‍या मर्यादांना दूर करत आहे. ‘अर्ज़ किया है’ गाण्‍यामधून निदर्शनास येते की व्‍यासपीठ मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि प्रामाणिक कथानकांना एकत्र आणत आहे, तसेच कलाकारांना प्रयोग करण्‍याचे व नाविन्‍यता आणण्‍याचे स्‍वातंत्र्य देत आहे. आमचा कोक स्‍टुडिओ भारतला भारतातील अनेक गाथांना त्‍यांच्‍या चाहत्‍यांसह साजरे करण्‍यासाठी निश्चित व्‍यासपीठ बनवण्‍याचा दृष्टिकोन आहे आणि‘अर्ज़ किया है’ एकमेकांना जोडणारे संगीत तयार करण्‍याच्‍या प्रवासाच्‍या दिशेने पाऊल आहे.”
गायक, गीतकार व संगीतकार अनुव जैन म्‍हणाले. “कोक स्‍टुडिओ भारत गाण्‍यांना त्‍यांच्‍या पैलूंशी बांधील राहण्‍यासाठी सुविधा देते आणि ‘अर्ज़ किया है’मधून ते दिसून येते. माझ्यासाठी या गाण्‍याची खासियत म्‍हणजे त्‍याची गीतरचना, त्‍यामध्‍ये आपल्‍या अनेकदा न व्‍यक्‍त होणाऱ्या भावना समाविष्‍ट आहेत. या गाण्‍याची निर्मिती करण्‍यासह गाताना संकोच व आशेमधील संबंध व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे श्रोते गाणे ऐकण्‍यासोबत त्‍यामध्‍ये भारावून जातील.”

प्रत्‍येक रीलीजसह कोक स्‍टुडिओ भारत प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण संगीतमय अभिव्‍यक्‍तींचा अनुभव देत आहे, वैविध्यपूर्ण शैली व प्रांतामधील कलाकारांना प्रकाशझोतात आणत आहेत, ज्‍यांचे आवाज व गाथा संस्‍कृतीशी जोडलेले आहेत. लोकसंगीतापासून समकालीन संगीतापर्यंत व्‍यासपीठाने अद्वितीय मंच तयार केला आहे, जेथे संगीतामधून भावना व्‍यक्‍त होतात, ज्‍या दीर्घकाळापर्यंत स्‍मरणात राहतात. सीझन ३ पुढे जात असताना कोक स्‍टुडिओ भारत भारतातील संगीत क्षेत्राची सखोलता व विविधतेला साजरे करण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button