राष्ट्रीय, १८ जून, २०२५: भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत वारशाचा उत्सव साजरा करत कोक स्टुडिओ भारतने तिसऱ्या सीझनमध्येही लोकांची मने जिंकली आहेत. होली आयी रे, होलो लोलो आणि पंजाब वेख के यांसारख्या तीन वेगळ्या गाण्यांसह या प्लॅटफॉर्मने भारताच्या सांस्कृतिक वारसाला सादर केले आहे. आता, ते त्यांचे चौथे गाणे ‘इश्क बावला’ घेऊन येत आहे. हरियाणवी रॅपर धांडा न्योलीवाला यांनी हे गाणे लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायले आहे, तसेच या गाण्यामध्ये क्षवीर ग्रेवाल देखील आहेत. इश्क बावला हरवलेल्या प्रेमाची कथा पुन्हा नव्याने मांडतो आणि आत्म-चिंतन व स्व-ओळख याबद्दल बोलतो. हरियाणातील जुन्या कथांपासून प्रेरित हे गाणे स्व-जागरूकतेच्या क्षमतेला दाखवते आणि लोकांना विचार करण्यास, शिकण्यास आणि प्रगती करण्यास प्रेरित करते.
#इश्कबावला हे गाणे हरियाणवी पद्धतीने प्रेमाच्या गुंतागूंतीच्या मार्गांना दाखवते, जे जुन्या लोककथांच्या नाट्यमय प्रेमकथांनी प्रेरित आहे. हे फक्त एक गाणे नाही तर प्रेमभंगाच्या अनुभवाला नव्या पद्धतीने सादर करते. हे उत्साहपूर्ण गाणे आहे, जे पुढे जात राहण्यास आणि चांगले बनण्यास प्रेरित करते.
हरियाणवी रॅपर धांडा न्योलीवाला त्याच्या विशिष्ट शैली आणि प्रवाहाने प्रभावी सादरीकरण करतात, गाण्यांमध्ये संबंधित कथा गुंतवतात. त्यांच्यासोबत क्षवीर ग्रेवाल आहेत, ज्यांचा मधुर आवाज प्रेम आणि प्रेमभंगाच्या शोधामध्ये नवीन अर्थाची भर करतो. या गाण्याच्या निर्मितीमध्ये आधुनिक साऊंड्स आणि पारंपारिक हरियाणवी वाद्यांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये डेरू, बुगचू व घडा या वाद्यांचा समावेश आहे. ही वाद्ये मधुरमय संगीतचा अनुभव देतात, जे परिचित व नवीन आहे.
कलाकार प्रवीण धांडा (धांडा न्योलीवाला) यांनी त्यांच्या नवीन शैलीतील रॅप बीट्स आणि प्रामाणिक गीतांसह अद्भुत कामगिरी केली आहे. ते रॅपर असण्यासोबत हरियाणाचा सांस्कृतिक आवाज आहेत, जे जागतिक हिप-हॉप रंगमंचावर आपली संस्कृती आणण्यासाठी समर्पित आहेत. हर्षवीर सिंग ग्रेवाल उर्फ क्षवीर यांनी, गाण्यात सूर आणि भावनांची भर केली आहे, तसेच धांडाच्या रॅपशी उत्तम समन्वय साधला आहे. एकत्रित दोघांनी निर्माण केलेल्या कथेमध्ये स्थानिक ओळख व आधुनिकतेचे मिश्रण आहे. आपल्या संस्कृतींमधून प्रेरणा घेत दोघांनी डेरू, बुगचू व घडा अशी पारंपारिक लोकगीत वाद्ये आणि आधुनिक, रॅप-प्रेरित तालांचे सुरेख संयोजन साधले आहे. ज्यामधून तयार झालेले गाणे स्थानिक व जागतिक स्तरावर विशेष आहे.
कोका–कोला इंडियाचे आयएमएक्स लीड शंतनू गांगणे म्हणाले, “कोक स्टुडिओ भारत स्पष्ट धोरणात्मक उद्देशावर निर्माण करण्यात आले आहे, ते म्हणजे भारताची संपन्न संस्कृती व विविधता प्रकाशझोतात आणत जगासमोर भारतीय गायकांना सादर करणे. प्रत्येक नवीन गाण्यासह आम्ही मंच तयार करत आहोत, जेथे धांडा न्योलीवाला व क्षवीर ग्रवाल यांसारखे प्रादेशिक कलाकार श्रोत्यांच्या नवीन पिढीसाठी परंपरेला नवीन रूप देऊ शकतात. कोक स्टुडिओमध्ये आम्ही संस्कृतीमध्ये रूजलेल्या, तसेच चाहत्यांशी संबंधित असलेल्या गाथा सादर करण्याचा प्रयत्न करतो.”
धांडा न्योलीवाला म्हणाले, “कोक स्टुडिओ भारत मंचापेक्षा अधिक आहे. या व्यासपीठाने संगीताचा आनंद घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला आहे. ‘इश्क बावला’च्या माध्यमातून आम्ही आवाजासह माझी संस्कृती व माझ्या लोकांना सादर केले आहे. या प्लॅटफॉर्मने आम्हाला प्रामाणिकपणे आमच्या अभिव्यक्ती सादर करण्याचे आणि अधिकाधिक प्रेक्षकांना हरियाणाचा आवाज पोहोचवण्याची संधी दिली.”
क्षवीर ग्रेवाल म्हणाले, “धांडा न्योलीवाला आणि कोक स्टुडिओ भारत यांच्यासह ‘इश्क बावला’साठी काम करताना मला अंतर्गत व कालातीत संकल्पनेचा शोध घेण्याची संधी मिळाली. सपोर्ट, सर्जनशीलता आणि सहयोगात्मक मानसिकतेने गाण्याचा स्तर उंचावला आणि आमच्या कथेला आवाज दिला, जो आजच्या पिढीला प्रेरित करतो.”
कोक स्टुडिओ इंडियाचा तिसरा सीझन जसजसा पुढे जात आहे तसतसे ते भारतातील स्वदेशी कलेसाठी एक उत्तम व्यासपीठ बनत आहे. ते सांस्कृतिक वारसा आणि समकालीन साऊंडला एकत्रित करतात, तसेच निर्माण करणारे संगीत सीमेपलीकडे जाते. ‘इश्क बावला‘ सारख्या गाण्यांसह प्लॅटफॉर्म संस्कृतीमध्ये सामावलेले, संबंधित व हृदयस्पर्शी कथानक सादर करण्याप्रती कटिबद्ध आहे.