कोका-कोला इंडिया पुरीमधील विक्रेत्‍यांना सक्षम करण्‍यासोबत लाखो व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचत आहे

News Service

नवी दिल्‍ली, ८ जुलै २०२५: ओडिशा रथ यात्रा २०२५ साठी लाखो भाविकांचे स्‍वागत करत असताना कोका-कोला इंडियाने आपल्‍या बॉटलिंग कार्यसंचालनांसोबत सहयोगाने भारतातील सर्वात मोठ्या सांस्‍कृतिक महोत्‍सवामध्‍ये येणाऱ्या भाविकांसाठी अल्‍पोपहार आणि हायड्रेशनची (पाणी व पेये) सुविधा उपलब्‍ध करून दिली. प्रत्‍यक्ष उपस्थित राहत कंपनीने पुरीमध्‍ये थंडगार पेये सहजपणे उपलब्‍ध करून दिली, तसेच स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला पाठिंबा दिला.

हे प्रयत्‍न शक्‍य करण्‍यासाठी कंपनीने पुरी शहरामध्‍ये मजबूत रिटेल व वितरण नेटवर्कच्‍या माध्‍यमातून पेये उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतली. पुरीमध्‍ये तैनात करण्‍यात आलेले हायड्रेशन पॉइण्‍ट्स, किओस्‍क्‍स आणि मोबाइल युनिट्सव्‍यतिरिक्‍त कंपनीने आपल्‍या व्‍यापक रिटेल व बॉटलिंग नेटवर्कचा फायदा घेतला, ज्‍यामधून स्‍थानिक सहयोगींच्‍या आर्थिक सक्षमीकरणाची खात्री मिळाली.  

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत या प्रयत्‍नामधून लास्‍ट-माइल रिटेल व्यवसायाला बळकटी देण्यासाठी, तळागाळातील पातळीवर आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या सांस्कृतिक क्षणांमध्ये त्यांची उपस्थिती प्रबळ करण्यासाठी कोका-कोला इंडियाचे व्यापक धोरण दिसून येते. स्थानिक विक्रेत्यांनी यात्रेदरम्‍यान तैनात करण्‍यात आलेल्‍या कार्ट्सचे व्‍यवस्‍थापन केले, ज्यामध्‍ये महिला उद्योजक देखील होत्‍या, ज्यामुळे महोत्‍सवादरम्‍यान प्रत्‍यक्ष उत्पन्‍नाच्या संधी निर्माण झाल्या. किरकोळ दुकाने आणि प्रमुख हॉटस्पॉटना कूलरसह सुसज्ज करून कोका-कोला इंडियाने लहान व्यवसायांना पाठिंबा दिला आणि संपूर्ण महोत्‍सवात थंड पेये मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेतली.

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्‍ट एशियाच्‍या फ्रँचायझी ऑपरेशन्‍स, डेव्‍हलपिंग मार्केट्सचे उपाध्‍यक्ष विनय नायर म्‍हणाले, “पुरीमधील आमच्‍या सहभागामधून कोका-कोला इंडियाने उद्देशाने हायड्रेशनवर लक्ष केंद्रित केल्‍याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात उत्पादने उपलब्‍ध करून देत आणि स्थानिक विक्रेते व महिला उद्योजकांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करत आम्ही या प्रदेशात सकारात्मक सामाजिक-आर्थिक प्रभाव निर्माण करत आहोत. आमचे बॉटलिंग नेटवर्क, आमचे वितरक भागीदार, किरकोळ ग्राहक आणि आमच्या समर्पित टीमच्या अविरत कटिबद्धतेमुळे हे शक्य झाले आहे.”

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेसचे ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणामधील कमर्शियल क्‍लस्‍टर हेड प्रसन्‍न बोराह म्‍हणाले, “कोका-कोलाच्‍या स्‍थानिक उद्योजकांना सक्षम करण्‍याच्‍या धोरणाचा ओडिशामध्‍ये उत्तम प्रभाव दिसून येत आहे. आमची प्रबळ रिटेल पोहोच आणि प्रत्‍यक्ष अंमलबजावणीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही पेये वितरित करण्‍यासोबत विकासाच्‍या संधी देखील देत आहोत. हे व्‍यापार आणि समुदाय निर्माण करणाऱ्या अंमलबजावणीचे मॉडेल आहे.”  

कोका-कोला इंडिया त्‍यांच्‍या सुपरपॉवर रिटेलर उपक्रमाच्‍या माध्‍यमातून स्‍थानिक विक्रेते आणि महिला उद्योजकांना रिटेल आऊटलेट्सचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास प्रशिक्षित व सुसज्‍ज करत आहे, ज्‍यामुळे हंगामी उपस्थितीमधून दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेची खात्री मिळते.

स्‍थानिक किरकोळ विक्रेत्‍या गायत्री सेनापती म्‍हणाल्‍या, “मी ११ वर्षांहून अधिक काळापासून कोका-कोला उत्‍पादनांची विक्री करत आहे. रथ यात्रादरम्‍यान अनेक भाविक येतात आणि प्रत्‍येकाला थंडगार पेये पाहिजे असतात. आम्‍ही किन्‍ले, थम्‍स अप, स्‍प्राइट, कोका-कोला आणि मिनट मेडचा साठा करतो. आमच्‍या स्‍टोअरमधील पेयांचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि आम्‍हाला त्‍याचा अभिमान वाटतो.”

पुरीमधील नृसिंह स्‍वीट्सचे मालक राजेश कुमार राणा म्‍हणाले, “आम्ही २५ वर्षांहून अधिक काळ हे दुकान चालवत आहोत आणि कोका-कोला आमच्या प्रवासाचा मोठा भाग बनले आहे. अनेक सण असल्याने लोक वर्षभर येथे येतात. आमचे पारंपारिक मिठाईचे दुकान आहे, जेथे आम्ही कोका-कोला, स्प्राइट, थम्स अप आणि पाणी यांसारखी थंडगार पेये देखील ठेवतो. आम्‍ही पर्यटकांना जे काही हवे असेल ते आमच्‍या दुकानामध्‍ये असण्‍याची खात्री घेतो.”

स्‍थानिक वितरक अजय शाह म्‍हणाले, “आम्ही २००२ पासून कोका-कोलासोबत काम करत आहोत. त्‍यावेळी व्यवसाय मंदावला होता, पण आम्हाला माहित होते की भविष्यात व्‍यवसाय वाढेल आणि तसेच घडले. आज, आम्ही खूप सक्षम आहोत. आम्ही सहा ट्रक चालवतो आणि रथयात्रा सारखे उत्सव आमच्‍यासाठी अत्‍यंत लाभदायी आहेत.”

कंपनीच्या व्यवसायात उद्देशपूर्ण दृष्टिकोन ठेवून आनंदन (कोका-कोला इंडिया फाउंडेशन) आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) यांनी या महोत्‍सवादरम्यान प्लास्टिक कचरा व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी पीईटी कचरा स्वच्छता मोहीम सुरू केली होती. मैदान साफ मोहिमेचा भाग म्हणून या प्रयत्‍नांमुळे संपूर्ण शहरामध्‍ये प्लास्टिक कचरा संकलन व सार्वजनिक सहभाग, समुद्रकिनारे स्वच्छता, प्लॉग रन आणि जागरूकता मोहिमेद्वारे प्लास्टिक कचरा कमी करण्यात आला. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.maidaansaaf.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button