रेडिट एकमेव गंतव्य आहे, जेथे तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल काळजी आहे त्याबाबत वास्तविक मानवी दृष्टिकोन मिळू शकतात, ज्यामध्ये क्रिकेट आणि आता सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे!
आज, आम्ही घोषणा करत आहोत की ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकर नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रेडिटशी सामील झाले आहे. या सहयोगामधून क्रिकेट सारखी समान आवड असलेल्या डिजिटल समुदायांना चालना देण्याप्रती रेडिटची कटिबद्धता दिसून येते. तसेच, व्यापक क्रीडा क्षेत्रात रेडिटची वाढती प्रासंगिकता देखील निदर्शनास यते, जो मोठ्या प्रमाणात सहभाग आणि खेळ आमच्या विविध वापरकर्त्यांमध्ये निर्माण करणाऱ्या उत्साहाला निदर्शनास आणतो. या वर्षाच्या सुरूवातीला रेडिटने इटलीमधील प्रोफेशनल फुटबॉल लीग सिरी ए (Serie A) सोबत सहयोगाची घोषणा केली आणि गेल्या वर्षी एनएफएल, एनबीए, एमएलबी, पीजीए टूर व नॅस्कार यांसारख्या प्रमुख यूएस प्रोफेशनल स्पोर्ट्स लीगसोबतच्या नवीन सहयोग प्रोग्रामची (a new partnership program) घोषणा केली. रेडिटवरील स्पोर्ट्स ग्रुप झपाट्याने विकसित होणारा ग्रुप आहे (वार्षिक ३० टक्क्यांहून अधिक वाढ), जेथे १००० हून अधिक समुदायामधील उत्कट चाहते एकत्र येतात(1).
या महिन्याच्या सुरूवातीला क्रीडा चाहत्यांना चाहत्यांद्वारे संचालित r/SachinTendulkar सह रेडिट समुदायांमध्ये महान क्रिकेट खेळाडू तेंडुलकर यांच्याशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळेल. त्यांच्या ऑफिशियल रेडिट प्रोफाइलच्या माध्यमातून दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर वैयक्तिक माहिती, सामन्याबाबत माहिती आणि विशेष कन्टेन्ट शेअर करतील. आगामी महिन्यांमध्ये तेंडुलकर भारतातील, तसेच जगभरातील इतर बाजारपेठांमधील रेडिटसाठी नवीन मार्केटिंग मोहिमेमध्ये देखील दिसतील.
”माझ्यासाठी क्रिकेट नेहमी मैदानावर व मैदानाबाहेर व्यक्तींसोबत असलेल्या खास नात्याबाबत आहे. रेडिटबाबत जाणून घेतल्यानंतर त्यांच्याबाबत खास बाब म्हणजे समुदायांना एकत्र आणणारी आवड,” असे सचिन तेंडुलकर म्हणाले. ”मी विशेषत: r/IndiaCricket आणि r/IndianSports वरील संवाद जाणून घेण्यास उत्सुक आहे. हा अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे, जेथे व्यक्ती त्यांना आवडणाऱ्या गोष्टी शेअर करतात. या सहयोगाने मला चाहत्यांशी नवीन पद्धतीने कनेक्ट होण्याची आणि खेळाप्रती आमच्या समान प्रेमाला साजरे करण्याची संधी दिली आहे.”
”क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये मर्यादांना दूर करण्याची आणि त्यांच्या असाधारण टॅलेंटच्या माध्यमातून व्यक्तींना एकत्र आणण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. मैदानावर त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांमध्ये प्रबळ सामुदायिक भावना जागृत केली, जे ‘मास्टर ब्लास्टर’साठी समान कौतुकासह एकत्र आले,” असे रेडिटच्या इंटरनॅशनल ग्रोथचे उपाध्यक्ष दुर्गेश कौशिक म्हणाले.
”ही अद्वितीय सामुदायिक भावना रेडिटमध्ये आमच्या सक्षमीकरण व विकास करण्याच्या मनसुब्याशी संलग्न आहे. आमचा रेडिटच्या क्रिकेट समुदायांना वैविध्यपूर्ण डिजिटल स्पेस बनवण्याचा दृष्टिकोन आहे, जेथे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यामधील चाहते एकत्र येऊ शकतात, कनेक्ट होऊ शकतात, खेळाप्रती त्यांची आवड शेअर करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतात. आम्हाला रेडिटचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ‘मास्टर ब्लास्टर’चे अधिकृतरित्या स्वागत करण्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, त्यांच्यासोबतचा सहयोग जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा अनुभव उत्साहित करेल, त्यांना महान खेळाडूसोबत संवाद साधण्याची व कनेक्ट होण्याची अद्वितीय संधी देईल.”
गेल्या वर्षभरात r/IndiaCricket (वार्षिक ७३ टक्क्यांहून अधिक वाढ (2)) आणि r/MumbaiIndians (वार्षिक ५८ टक्क्यांहून अधिक वाढ (2)) यांसारख्या चाहत्यांद्वारे संचालित समुदायांचा समावेश असलेल्या रेडिटच्या ‘क्रिकेटव्हर्स’मध्ये विक्रमी गती दिसण्यात आली आहे:
• गेल्या १२ महिन्यांमध्ये रेडिटवर क्रिकेट समुदायांसाठी ३.७ बिलियनहून अधिक स्क्रिनव्ह्यूज(3)
• गेल्या १२ महिन्यांमध्ये रेडिटवर क्रिकेट समुदायांमध्ये ३२ दशलक्षहून अधिक जागतिक सहभाग (पोस्ट्स, मते, कमेंट्स)(4)
सचिन तेंडुलकर यांच्याबाबत
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी क्रिकेट मैदानावर उतरलेले सचिन तेंडुलकर आज क्रिकेट जगतातील महान खेळाडू आहेत. मैदानावर त्यांची उत्तम कामगिरी आणि विक्रमांमुळे ते तरूणपणी ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यानंतर अनेक पिढ्यांसाठी आयकॉन व आदर्श बनले. जगभरातील चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेले सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. मैदानाबाहेर सचिन बहुमूल्य सेलिब्रिटी म्हणून प्रशंसित आहेत. क्रिकेट व त्यापलीकडे योगदानासाठी त्यांना भारतरत्न (भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार), पद्म विभुषण, पद्मश्री, राजीव गांधी खेळ रत्न, लॉरेस स्पोर्टींग मोमेण्ट अवॉर्ड यांसह इतर पुरस्कारांसह सन्मानित करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून युनिसेफ गुडविल अॅम्बेसेसडर असलेले सचिन क्रिकेट मैदानाबाहेर त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून लाखो व्यक्तींना प्रेरित करत आहेत. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनद्वारे नेतृत्वित त्यांचे परोपकारी उपक्रम मुलांसाठी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडावर लक्ष केंद्रित करतात, ज्यांचा दरवर्षाला भारतातील दुर्गम व वंचित समुदायांमधील १००,००० हून अधिक मुलांवर प्रभाव पडत आहे.
- Source: Reddit Internal Data, 2024 vs 2023
- Source: Reddit Internal Data, Q1 2025 vs Q1 2024
- Source: Reddit Internal Data, April 2024 – April 2025
- Source: Reddit Internal Data, April 2024 – April 2025