आपल्यापैकी बरेच जण आपल्या WhatsApp चॅटमध्ये वर्षानुवर्षांच्या मौल्यवान आठवणी बाळगतात – फोटो, भावना व्यक्त करणाऱ्या व्हॉइस टिपा आणि महत्त्वाची संभाषणे. त्यामुळेच तुमचा फोन हरवला किंवा तुम्हाला नवीन डिव्हाइसवर ट्रान्सफर करायचा असेल, तर त्यांचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे.

WhatsApp हे पहिले खाजगी मेसेजिंग ॲप होते जे तुमच्या चॅट बॅकअपसाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन देते, जेणेकरून तुमचे जुने मेसेज तुमच्याकडे राहू शकतील. आज, आम्ही पासकी-एन्क्रिप्ट केलेले बॅकअप सादर करून तुमच्या चॅट बॅकअपसाठी अतिरिक्त सुरक्षा सेट करणे पूर्वीपेक्षा सोपे करत आहोत.
पासकी तुम्हाला पासवर्ड किंवा ६४-अंकी कठीण एन्क्रिप्शन की लक्षात ठेवण्याऐवजी तुमचे चॅट बॅकअप एन्क्रिप्ट करण्यासाठी तुमचे फिंगरप्रिंट, चेहरा किंवा स्क्रीन लॉक कोड वापरू देतील. आता, फक्त एका टॅपने किंवा एका नजरेत, WhatsApp वरील तुमची वैयक्तिक चॅट आणि कॉल यांचे संरक्षण करणारी तीच सुरक्षा तुमच्या चॅट बॅकअपवर लागू केली जाते, जेणेकरून ते नेहमीच सुरक्षित, ॲक्सेस करण्यायोग्य आणि खाजगी राहतील.
हे आगामी आठवडे आणि महिन्यांमध्ये हळूहळू रोल आउट केले जाईल. सुरुवात करण्यासाठी, सेटिंग > चॅट > चॅट बॅकअप > एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित यावर जा.