ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनने (ऑस्ट्रेड) मुंबईत एक अनोखा “फेस्टिव्हल ऑफ ऑस्ट्रेलिया” महोत्सव आयोजित केला. हा महोत्सव चार शहरांमध्ये आयोजित केला जात आहे आणि मुंबईतील कार्यक्रमाने ऑस्ट्रेलियातील उच्च-गुणवत्तेच्या संस्था, विद्यापीठे, रिटेल आणि इतर व्यापार भागीदार एकत्र आणले. त्यांनी भारतीय ग्राहकांना ऑस्ट्रेलियाची प्रीमियम F&B उत्पादने दाखवली.
मुंबईनंतर ऑस्ट्रेडचा हा महोत्सव हैदराबाद (16 नोव्हेंबर), बेंगळुरू (18 नोव्हेंबर) आणि कोची (20 नोव्हेंबर) येथे आयोजित केला जाईल.
मुंबईतील कार्यक्रमामुळे भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या करिअरची आणि शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करणाऱ्या अभ्यासक्रमांवर चर्चा केली.
या कार्यक्रमांतर्गत, भारतीय विद्यार्थ्यांनी “नॉट-सो-नॅचरल डिजास्टर्स अँड हाऊ टू प्रिवेंट देम” या विषयावरील मास्टरक्लासमध्ये भाग घेतला. याचे संचालन प्रोफेसर डेविड सॅन्डरसन आयांनी केले, जे यूनिवर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स मध्ये इनॉगरल ज्युडिथ नीलसन चेयर ऑफ आर्किटेक्चर आहेत.
या कार्यक्रमात भारतीय शाळा, ऑस्ट्रेलियन विद्यापीठे आणि उद्योग भागीदार यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत पॅनल चर्चा देखील झाली. या चर्चेत विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमधून काय हवे आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेणेकरून ते परदेशात शिक्षण घेण्याबाबत अधिक चांगले निर्णय घेऊ शकतील.
ऑस्ट्रेलियाच्या फेस्टिव्हलमध्ये ऑस्ट्रेलियन फूड पॅव्हेलियन देखील होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम उत्पादने प्रदर्शित केली गेली. यामध्ये मध, पोषण बार, सॉस, चीज, पास्ता, सीफूड, लॅम्ब मीट आणि इतर अजोड उत्पादनांचा समावेश होता.
ऑस्ट्रेडने ऑस्ट्रेलियाच्या फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ‘ऑस्ट्रेलिया पॅव्हेलियन’ सेट करण्यासाठी जिओ मार्टसोबत तसेच ऑस्ट्रेलियन उत्पादनांच्या श्रेणीचे प्रदर्शन करण्यासाठी मुंबईस्थित किरकोळ विक्रेता फूड स्क्वेअरसोबत भागीदारी केली.
फेस्टिव्हल ऑफ ऑस्ट्रेलिया पाहुण्यांना लाइव्ह कुकिंग डेमो दरम्यान प्रमुख ऑस्ट्रेलियन घटकांपासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीही मिळाली.
मुंबईतील या महोत्सवावर भाष्य करताना, श्री जॉन साउथवेल, सीनियर ट्रेड एण्ड इनवेस्टमेंट कमिश्नर- साउथ एशिया, ऑस्ट्रेलियन ट्रेड एण्ड इनवेस्टमेंट कमिशन म्हणाले, “शिक्षण आणि पाककृतीमधील ऑस्ट्रेलियाचे अनोखे अनुभव अधोरेखित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या कार्यक्रमामुळे आम्ही भारतीय विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि खाद्यप्रेमींसाठी जागरूकता वाढवू आणि नवीन संधी उघडू अशी आशा करतो. अशा प्रकारे ते उच्च दर्जाचे शिक्षण आणि उत्तम पाककृती अनुभवांसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून ऑस्ट्रेलियाला ओळखतील. भारतीय ग्राहकांमध्ये वाढती मागणी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रीमियम F&B उत्पादनांचे प्रदर्शन करताना आम्हाला आनंद होत आहे. डाळींपासून ते लॅम्ब बिर्याणीपर्यंत भारतीय पदार्थांमध्ये ऑस्ट्रेलियन उत्पादने वाढत असल्याचे आपण पाहत आहोत.”
Live cooking demonstration using premium Australian ingredients at the Festival of Australia, Mumbai 2024
Indian students and parents interact with the Australian University representatives at the Festival of Australia 2024 Mumbai
Students from Mumbai at the Festival of Australia 2024 organised by the Australian Trade and Investment Commission