सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याचे अंतिम आवाहन: तुमची संकल्‍पना भावी मोठे सोल्‍यूशन ठरू शकते

News Service

नवी दिल्‍लीपासून ते थेट कोल्‍हापूरपर्यंत हजारो विद्यार्थ्‍यांनी अर्ज केला आहे, आता सर्वोत्तम संकल्‍पनांसह वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांचे निराकरण करण्‍याची आणि कदाचित १ कोटी रूपये जिंकण्‍याची तुमची वेळ आहे. ३० जूनपर्यंत अर्ज करा.

भारत, जून २६, २०२५: नवी दिल्‍लीपासून ते थेट कोल्‍हापूरपर्यंत विविध शहरे व क्‍लासरूम्‍समधील हजारो विद्यार्थ्‍यांनी ‘मी भविष्‍यासाठी समस्‍यांचे निराकरण करू शकतो’ या साहसी विश्‍वासासह पुढाकार घेतला आहे. आता, सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो रोडशोज समाप्‍त होण्‍याच्‍या अंतिम टप्‍प्‍यात असताना भारतातील तरूण चेंजमेकर्सकरिता त्‍यांच्‍या संकल्‍पनांना कृती आणण्‍याच्‍या संधीचा फायदा घेण्‍याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

१४ ते २२ वर्षांच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी राष्‍ट्रीय इनोव्‍हेशन स्‍पर्धा सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. या स्‍पर्धेने देशभरात आधीच उत्‍सुकता निर्माण केली आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्‍यात आलेला हा उपक्रम भारतभरातील वि़द्यार्थ्‍यांना डिझाइन थिंकिंग टूल्‍स, सॅमसंग व आयआयटी दिल्‍ली तज्ञांकडून मार्गदर्शन, गुंतवणूकदारांसोबत संपर्क, प्रोटाटाइपिंग सपोर्ट आणि १ कोटी रूपये जिंकण्‍याची संधी यांसह सक्षम करतो.

पण बक्षीसापेक्षा या उपक्रमाला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारी बाब म्‍हणजे उपक्रमाचा उद्देश.
गेल्‍या काही आठवड्यांपासून ओपन हाऊसेस आणि रोडशोने असाधारण दूरदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषणासाठी मानसिक आरोग्य अॅप्स आणि एआय-संचालित सोल्‍यूशन्‍सचे स्‍वप्‍न पाहिले. गुजरात आणि महाराष्‍ट्रामध्‍ये शाश्वत पॅकेजिंग, वारसाला उजाळा आणि सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील संकल्‍पनांना व्‍यासपीठ मिळाले. प्रत्येक शहरात एक संदेश स्‍पष्‍टपणे पसरला – भारतातील तरूण वास्तविक विश्‍वातील समस्यांसाठी वास्तविक सोल्‍यूशन्‍स तयार करण्यास सज्ज आहेत.

आता, तुमची वेळ आहे.
तुम्‍हाला विश्‍वामध्‍ये एखादी समस्‍या दिसली असेल आणि तुम्‍ही विचार करत असाल की ‘या समस्‍येचे निराकरण का केले जात नाही?’, तर यासाठी उत्तर कदाचित असेल की तुम्‍हालाच त्‍या समस्‍येचे निराकरण करायचे आहे.

शेतकऱ्यांना स्‍मार्ट सिंचन पद्धतींसह मदत करायची असेल, ऑनलाइन असलेल्‍या किशोरवयीनांसाठी सुरक्षितता निर्माण करायची असेल किंवा शहराला अधिक उत्तम बनवायचे असेल तर तुमची संकल्‍पना उपयुक्‍त ठरू शकते.

गाझियाबादमधील विद्यार्थीनी इशिता म्‍हणाली, “पहिल्‍यांदाच मला कोणीतरी विचारले की, मला कोणत्‍या समस्‍येचे निराकरण करायचे आहे. या प्रश्‍नाने सर्वकाही बदलले.”

पुण्‍यामधील विद्यार्थी आकाश म्‍हणाला, “मी ‘योग्‍य वेळेची’ वाट बघत न राहता प्रत्‍यक्ष सोल्‍यूशन निर्माण करायला सुरूवात केली. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोने मला विश्‍वास दिला की, माझी संकल्‍पना महत्त्वाची आहे.”

या गाथा फक्‍त सुरूवात आहे. पुढील गाथा तुमची असू शकते.
सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो फक्‍त उत्तम कोडर किंवा टेक तज्ञ नाही तर सहानुभूती, जिज्ञासू वृत्ती आणि प्रयत्‍न करण्‍याच्‍या धाडसाबाबत आहे. स्‍वच्‍छ शहर, सुरक्षित रस्‍ते, आरोग्‍यदायी समुदाय आणि कोणत्‍याही मताकडे दुर्लक्ष न केले जाणाऱ्या भविष्‍याचे स्‍वप्‍न पाहणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी ही स्‍पर्धा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button