लहान नगरांपासून जागतिक मंचापर्यंत: सॅमसंग व स्‍टार्टअप इंडियाने भारतातील इनोव्‍हेटर्सच्‍या भावी पिढीला सक्षम करण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

News Service
  • हा सार्वजनिक-खाजगी सहयोग भारतातील तरूणांमध्‍ये नाविन्‍यता आणि उद्योजकतेला चालना देणार
  • सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो विद्यार्थी आणि उत्‍पादन स्‍टार्टअप्‍सना सक्षम करण्‍यासाठी स्‍टार्टअप इंडियाच्‍या देशभरातील परिसंस्‍थेचा फायदा घेणार
  • सॅम्‍संग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोच्‍या टॉप १०० शॉर्टलिस्‍टमध्‍ये बिहारमधील समस्‍तीपूर, आंध्रप्रदेशमधील गुंटूर, जम्‍मू व काश्‍मीरमधील बारामुल्‍ला आणि आसाममधील काचर अशा जिल्‍ह्यांमधील तळागाळातील टॅलेंट उदयास आले आहेत

गुरूग्राम, भारत – जुलै 30, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने भारतातील दुर्गम भागांमधील तरूण इनोव्‍हेटर्सना सक्षम करण्‍यासाठी आणि सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसह देशातील स्‍टार्टअप परिसंस्‍था मजबूत करण्‍यासाठी भारत सरकारचा प्रमुख उपक्रम स्‍टार्टअप इंडियासोबत धोरणात्‍मक सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे.

नवी दिल्‍लीमध्‍ये या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली, ज्‍यासह सॅमसंगची प्रमुख देशव्‍यापी इनोव्‍हेशन स्‍पर्धा सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो आणि स्‍टार्टअप इंडियाचे समावेशन, मार्गदर्शन व धोरण पाठबळाची प्रबळ देशव्‍यापी परिसंस्‍था एकत्र आले आहे. या सहयोगाचा विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील उच्‍च क्षमता असलेल्‍या प्रतिभांना ओळखण्‍याचा आणि निपुण करण्याचा मनसुबा आहे, जेथे त्‍यांना पायाभूत सुविधा, तज्ञ मार्गदर्शन, बाजारपेठ संपर्क आणि निधी संधी उपलब्‍ध करून दिल्‍या जातील.

”सॅमसंगमध्‍ये आमचा विश्वास आहे की, तरूण विचारवंतांना योग्‍य व्‍यासपीठ व पाठबळासह सक्षम केल्‍यास नाविन्‍यतेला चालना मिळते. स्‍टार्टअप इंडियासोबतचा आमचा सहयोग त्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोचा दृष्टिकोन आणि स्‍टार्टअप इंडियाची व्‍यापक परिसंस्‍था व नेटवर्कला एकत्र आणत आमचा भारतातील दुर्गम भागांमधील भावी चेंजमेकर्सना भविष्‍यातील समस्‍यांचे निवारक बनवण्‍याचा मनसुबा आहे. हा सहयोग स्किल इंडिया व डिजिटल इंडिया उपक्रमांशी संलग्‍न आहे आणि देशातील नाविन्‍यता परिसंस्‍था प्रबळ करण्‍याचा उद्देश आहे,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्‍यक्ष एसपी चुन म्‍हणाले.

”नाविन्‍यता विकासासाठी, नवीन क्षमता समोर आणण्‍यासाठी, प्रगतीला चालना देण्‍यासाठी आणि उज्‍ज्‍वल भविष्‍याला आकार देणारे उपाय सक्षम करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच, तरूण इनोव्‍हेटर्सना सक्षम करणे भारताच्‍या विकासगाथेसाठी महत्त्वाचे आहे. स्‍टार्टअप इंडिया आणि सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोमधील या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सर्वसमावेशक, नाविन्‍यता-केंद्रित परिसंस्‍था निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दृढ करत आहोत. हा सहयोग द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील तरूणांना संकल्‍पना मांडण्‍यास व नाविन्‍यता आणण्‍यास प्रेरित करेल, तसेच आत्‍मनिर्भर भारताच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न देखील आहे. आम्‍हाला सॅमसंगला देशभरातील उद्योजकता उत्‍साहाला चालना देताना पाहून आनंद होत आहे,” असे भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (डीपीआयआयटी) सहसचिव श्री. संजीव म्हणाले.

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो प्रमुख नाविन्‍यता व शैक्षणिक उपक्रम आहे, जो भारतातील तरूणांमध्‍ये समस्‍या-निवारण, सर्जनशीलता आणि सामााजिक प्रभावाला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून तरूण विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये वास्‍तविक विश्‍वातील समस्‍या ओळखण्‍यास आणि रचनात्‍मक विचारसरणी, तंत्रज्ञान व उद्योजकता कौशल्‍यांचा वापर करत महत्त्‍वपूर्ण उपाय सादर करण्‍याप्रती काम करण्‍यास प्रेरित करण्‍यात येते. हा उपक्रम तज्ञ व गुंतवणूकदारांसमोर संकल्‍पना मांडण्‍यासाठी मार्गदर्शन, वर्कशॉप्‍स, प्रोटोटाइप विकास पाठिंबा आणि संधी देतो.
या नवीन सहयोगामध्‍ये स्टार्टअप इंडिया आपल्‍या समावेशन व विकासाच्‍या व्‍यापक नेटवर्कचा फायदा घेईल, तर सॅमसंग प्रत्‍यक्ष अध्‍ययन व नाविन्‍यता आव्‍हानांच्‍या माध्‍यमातून विद्यार्थी व तरूण इनोव्‍हेटर्ससोबत प्रत्‍यक्ष संलग्‍न होईल. तळागाळापासून नाविन्‍यतेला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा एकीकृत दृष्टिकोन भारताच्‍या शिक्षण व उद्योजकता परिसंस्‍थेमध्‍ये नाविन्‍यता आणेल.

सॅमसंग इंडिया आणि स्‍टार्टअप इंडिया यांच्‍यामधील हे मॉडेल सार्वजनिक-खाजगी सहयोग मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया मिशन्‍सप्रती समान कटिबद्धतेला अधिक दृढ करते, तसेच भारताच्‍या तंत्रज्ञान व उत्‍पादन-केंद्रित भविष्‍यामध्‍ये तरूण, स्‍थानिक इनोव्‍हेटर्सना प्रथम प्राधान्‍य देतो.

२०१० मध्‍ये प्रथम यूएसमध्‍ये लाँच करण्‍यात आलेला उपक्रम सॉल्व्‍ह फॉर टूमारो सध्‍या ६८ देशांमध्‍ये कार्यरत आहे आणि जगभरातील ३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्‍ये सहभाग घेतला आहे. २०२५ एडिशन टॉप ४ विजेत्‍या टीम्‍सना समावेशन प्रोग्राम देते, ज्‍यांना १ कोटी रूपये अनुदान मिळेल. तसेच टॉप २० टीम्‍सना २० लाख रूपये मिळतील, तर टॉप ४० टीम्‍सना ८ लाख रूपये मिळतील.

या वर्षी सहभागींना चार प्रमुख थीम्‍समध्‍ये सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले: सुरक्षित, प्रतिभावान व सर्वसमावेशक भारतासाठी एआय, भारतातील आरोग्‍य, स्‍वच्‍छता व स्‍वास्‍थ्‍याचे भविष्‍य, शिक्षण व उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी क्रीडा व तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सामाजिक बदल आणि तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून पर्यावरणीय स्थिरता. स्‍थानिक स्‍तरावर देखील शॉर्टलिस्‍ट्स करण्‍यात आले. या उपक्रमामध्‍ये भारतातील काही दुर्गम जिल्‍ह्यांमधील तरूण इनोव्‍हेटर्सचा शोध घेण्‍यात आला, ज्‍यामध्‍ये बिहारमधील समस्तीपूर, आंध्रप्रदेशातील गुंटूर, जम्मू व काश्मीरमधील बारामुल्ला आणि आसाममधील काचर यांचा समावेश आहे. या उपक्रमाची पोहोच व प्रभावामधून कव्‍हर करण्‍यात आलेल्‍या भौगोलिक क्षेत्रांमधील उपक्रमाची व्‍याप्‍ती, तसेच चारही थीम्‍ससाठी देण्‍यात आलेल्‍या संकल्‍पनांची कल्‍पकता दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button