- सॅमसंगच्या सातव्या पिढीमधील फोल्डेबल्ससाठी प्री-ऑर्डर्सनी विक्रम रचला, ज्यामधून फोल्डेबल स्मार्टफोन्सची मागणी आणि ग्राहकांमधील उत्साह दिसून आला
- गॅलॅक्सी झेड फोल्ड७, झेड फ्लिप७ आणि झेड फ्लिप७ एफईने भारतात ९ जुलै रोजी लाँच झाल्यापासून पहिल्या ४८ तासांमध्ये २१०,००० प्री-ऑर्डर्स सुनिश्चित केल्या
गुरूग्राम – जुलै, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज घोषणा केली की, कंपनीचे नुकतेच लाँच केलेले गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई स्मार्टफोन्सनी विक्रमी प्री-ऑर्डर्सची नोंद केली आहे, ज्यामधून ब्रँडच्या सातव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी ग्राहकांमध्ये मोठी मागणी आणि उत्साह दिसून येतो. गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई या स्मार्टफोन्सनी पहिल्या ४८ तासांमध्ये २१०,००० प्री-ऑर्डर्स संपादित करत मागील विक्रम मोडला आणि या वर्षाच्या सुरूवातीला गॅलॅक्सी एस२५ सिरीजसाठी मिळालेल्या प्री-ऑर्डर्ससोबत जवळपास बरोबरी केली.

“आमच्या ‘मेड इन इंडिया’ फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी विक्रमी प्री-ऑर्डर्ससह आमचा विश्वास दृढ झाला आहे की, भारतातील तरूण ग्राहक जलदपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आतापर्यंतचा आमचा सर्वात प्रगत स्मार्टफोन आहे, जो शक्तिशाली, आकर्षक, सर्वोत्तम व पोर्टेबल आहे. गॅलॅक्सी झेड फ्लिप७ वापरकर्त्यांशी जुळून जातो, त्यांचे टास्क्स पार पाडतो आणि त्यांना सक्षम करतो, ज्यामधून विश्वाशी संलग्न होण्याचा स्मार्टर व सर्वोत्तम मार्ग मिळतो. नवीन वन यूआय ८ आणि आऊट ऑफ द बॉक्स अँड्रॉईड १६ ची शक्ती असलेले हे नवीन डिवाईसेस वास्तविक मल्टीमोडल एआय अनुभव देतात. या नवीन डिवाईसेसचे यश आमच्या मोठ्या ध्येयासाठी आधारस्तंभ आहे, ते म्हणजे भारतात फोल्डेबल स्मार्टफोन्सना प्रमुख प्रवाहात आणणे,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये अचूक रचना व शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत, जी दैनंदिन संवादांना अधिक उत्साहित करतात. हा आतापर्यंतचा सर्वात सडपातळ व वजनाने हलका स्मार्टफोन आहे. फक्त २१५ ग्रॅम वजन असलेला गॅलॅक्सी झेड फोल्ड७ गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रापेक्षा वजनाने हलका आहे. फोल्ड केल्यानंतर या स्मार्टफोनची जाडी फक्त ८.९ मिमी आणि अनफोल्ड केल्यानंतर ४.२ मिमी मिमी आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रा स्मार्टफोनची प्रीमियम कार्यक्षमता व अनुभव देतो, तसेच अनफोल्ड केल्यानंतर सर्वात मोठ्या व लक्षवेधक डिस्प्लेसह कार्यक्षमता व उत्पादकतेचा नवीन स्तर दर्शवतो.
गॅलॅक्सी झेड फ्लिप७ मल्टीमोडल क्षमता असलेला सुसंगत एआय फोन आहे, ज्यामध्ये नवीन फ्लेक्सविंडो आहे. हा स्मार्टफोन सहजपणे खिशामध्ये मावतो, पण शक्तिशाली असून उत्तम साह्य करतो. या स्मार्टफोनमध्ये गॅलॅक्सी एआयसह एज-टू-एज फ्लेक्सविंडो, उच्च स्तरीय कॅमेरा आणि अत्यंत सुसंगत व प्रख्यात डिझाइन आहे. सर्वोत्तम वॉइस एआयपासून सर्वोत्तम सेल्फी क्षमतांपर्यंत गॅलॅक्सी झेड फ्लिप७ खिशाला परवडणारा सर्वोत्तम सोबती आहे, जो विनासायास परस्परसंवाद आणि दैनंदिन विश्वसनीयतेसाठी डिझाइन करण्यात आला आहे. फक्त १८८ ग्रॅम वजन आणि फोल्ड केला असताना जाडी फक्त १३.७ मिमी असलेला गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आतापर्यंतचा सर्वात स्लिम गॅलॅक्सी झेड फ्लिप आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ब्ल्यू शॅडो, सिल्व्हर शॅडो आणि जेट ब्लॅक अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर गॅलॅक्सी झेड फ्लिप७ ब्ल्यू शॅडो, जेट ब्लॅक आणि ओरल रेड या रंगांमध्ये येतो. गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई ब्लॅक व व्हाइट रंगांमध्ये येतो. याव्यतिरिक्त, Samsung.com च्या माध्यमातून गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडण्यासाठी अतिरिक्त रंग पर्याय असेल, तो म्हणजे मिंट.
दोन्ही डिवाईसेसमध्ये मल्टीमोडल एआय क्षमता आहेत, ज्यामधून उत्पादकता वाढवण्यासाठी गॅलॅक्सी झेड फोल्ड७ च्या विस्तृत फोल्डेबल डिस्प्लेचा अधिक फायदा देणारे अनुभव मिळतात. वास्तविक मल्टीमोडल एजंट म्हणून डिझाइन करण्यात आलेले वन यूआय ८ मोठ्या स्क्रिनवरील मल्टीटास्किंगसाठी सर्वोत्तम टूल्स देते, जे वापरकर्ते काय टाइप करतात, काय म्हणतात आणि काय पाहतात हे समजून घेते. गुगलच्या जेमिनी लाइव्हसह वापरकर्ते रिअल टाइममध्ये त्यांच्या स्क्रिनवर शेअर करू शकतात, तसेच एआय असिस्टण्टसह संवाद साधू शकतात, ज्यामुळे दिसणाऱ्या चित्रांवर आधारित संदर्भीय विनंत्या सक्षम होतात. वन यूआय ८ नवीन नॉक्स एन्हान्स्ड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन (केईईपी)सह वैयक्तिकृत एआय अनुभवांमध्ये सुधारित गोपनीयता देते. केईईपी डिवाईसेच्या सुरक्षित स्टोरेज क्षेत्रामध्ये एन्क्रिप्टेड, अॅप-विशिष्ट स्टोरेज वातावरण तयार करते, ज्यामधून प्रत्येक अॅप त्यांच्या संवेदनशील माहितीसह उपलब्ध होण्याची खात्री मिळू शकते.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ वरील मुख्य डिस्प्ले मागील जनरेशनच्या तुलनेत ११ टक्के मोठा आहे. ८-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X मुख्य डिस्प्ले संपन्न कॉन्ट्रास्ट आणि आकर्षक रंगसंगती देतो, ज्यासह सर्वकाही स्पष्टपणे दिसते या स्मार्टफोनमध्ये व्हिजन बूस्टर आणि जवळपास २,६०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस देखील आहे.