जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशन आणि युनायटेड वे बेंगळुरूकडून भारतात नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राम लाँच

News Service

चार-वर्षांचा कॉलेज व करिअर सुसज्‍जता प्रोग्राम अभियांत्रिकी टॅलेंट समूह वाढवण्‍यासाठी ४,००० विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचेल

बेंगळुरू, सप्‍टेंबर २४, २०२५: जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशनने आज भारतातील बेंगळुरू येथे नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राम लाँच करण्‍यासाठी युनायटेड वे बेंगळुरू (यूडब्‍ल्‍यूबीई) सोबत सहयोगाची घोषणा केली. भारतात नेक्‍स्‍ट इंजीनिअर्सच्‍या विस्‍तारीकरणामुळे विद्यार्थ्‍यांना एसटीईएम शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होईल आणि अभियांत्रिकी प्रमुखांच्‍या भावी पिढीला प्रेरित व सुसज्‍ज करत स्‍थानिक अभियांत्रिकी समूह विकसित होईल.

”बेंगळुरू दीर्घकाळापासून नाविन्‍यता आणि अभियांत्रिकी उत्‍कृष्‍टतेचे केंद्र आहे, ज्‍यामुळे आमच्‍या नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्रामसाठी स्‍वाभाविकपणे अनुकूल आहे,” असे जीई ऐरास्‍पेस फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा आणि जीई ऐरोस्‍पेस येथील पब्लिक अफेअर्सच्‍या जागतिक प्रमुख मेघन थर्लो म्‍हणाल्‍या. ”युनायटेड वे बेंगळुरूसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍हाला हजारो स्‍थानिक विद्यार्थ्‍यांना अभियांत्रिकीमध्‍ये करिअर घडवण्‍यास प्रेरित व सुसज्‍ज करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही उपस्थिती असण्‍यासोबत कार्यरत असलेल्‍या समुदायांमध्‍ये व्‍यक्‍तींना प्रेरित करण्‍यासाठी प्रयत्‍न करतो.”

नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राम १३ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष अध्‍ययन अनुभव, करिअर एक्‍स्‍पोजर आणि युनिव्‍हर्सिटीमधील अभ्‍यासाकरिता तयारीसह सुसज्‍ज करतो, तसेच अभियांत्रिकीमध्‍ये करिअर घडवण्‍यास प्रेरित करतो. जा‍गतिक स्‍तरावर आजच्‍या तारखेपर्यंत २६,००० हून अधिक विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचलेल्‍या या प्रोग्रामचा अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विविध तरूण टॅलेंटचा समूह विकसित करण्‍याचा मनसुबा आहे.

युनायटेड वे बेंगळुरूचा समुदायाचा अर्थपूर्ण बदल घडवून आणण्‍यासाठी सहयोगांच्‍या माध्‍यमातून महत्त्वपूर्ण सामाजिक समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा १७ वर्षांचा इतिहास आहे. या कौशल्‍यासोबत जीई ऐरोस्‍पेसचा बेंगळुरूमधील स्‍थानिक समुदायामधील स्‍वयंसेवेचा प्रबळ इतिहास नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राममधील सहभागींसाठी सहाय्यक वातावरणाला चालना देईल, जेथे ते अभियांत्रिकीमध्‍ये भावी करिअर घडवतील.

”भारतातील अभियांत्रिकी टॅलेंट अद्वितीय आहे आणि बेंगळुरू नाविन्‍यता हब म्‍हणून अग्रस्‍थानी आहे,” असे युनायटेड वे बेंगळुरूचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेश क्रिष्‍णन म्‍हणाले. ”यूडब्‍ल्‍यूबीईमध्‍ये आम्‍ही हा क्षमतेला व्‍यापून घेण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे खात्री घेतो की वंचित पार्श्वभूमीमधील विद्यार्थ्‍यांना समान संधी मिळेल, तसेच त्‍यांना अभियांत्रिकी क्षेत्रामध्‍ये प्रगती करण्‍यास आवश्‍यक असलेली महत्त्वपूर्ण विचारसरणी व आत्‍मविश्वासासह कौशल्‍ये आणि अनुभव मिळेल. या चार वर्षांच्‍या प्रोग्रामसाठी जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशनसोबतचा सहयोग आम्‍हाला या विद्यार्थ्‍यांना ओळखण्‍यासोबत अभियांत्रिकी आणि उपयोजित विज्ञानामध्‍ये करिअर घडवण्‍यास निपुण करण्‍यास मदत करतो, ज्‍यामुळे ते राष्‍ट्रनिर्मितीप्रती योगदान देऊ शकतील.”

युनायटेड वे बेंगळुरू नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्रामचे कार्यसंचालन पाहिल, ज्‍यामध्‍ये सुरूवातीच्‍या माध्‍यमिक शालेय विद्यार्थ्‍यांसाठी इंजीनिअरिंग डिस्‍कव्‍हरी आणि उच्‍च शिक्षणाकरिता तयारी करणाऱ्या मोठ्या विद्यार्थ्‍यांसाठी इंजीनिअरिंग अकॅडमीचा समावेश आहे. अकॅडमीधील विद्यार्थी सर्वोत्तम डिझाइन आव्‍हाने, करिअर प्रशिक्षण आणि युनिव्‍हर्सिटी-सुसज्‍ज कार्यशाळांमध्‍ये सहभाग घेतील. अकॅडमीमध्‍ये शिक्षण पूर्ण करण्‍यासह अभियांत्रिकी पदवी मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्‍यांना स्‍कॉलरशिप्‍स देखील मिळतील. या प्रोग्रामला २०२६ च्‍या प्रारंभी सुरुवात होईल, ज्‍याचा चार वर्षांमध्‍ये बेंगळुरूमधील ४,००० हून अधिक विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्‍याचा मनसुबा आहे.

”नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राममधून अभियांत्रिकी टॅलेंटच्‍या भावी पिढीला प्रेरित करण्‍याप्रती आमची सखोल कटिबद्धता दिसून येते आणि मला बेंगळुरूमध्‍ये हा प्रोग्राम लाँच होताना पाहण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो,” असे जीई ऐरोस्‍पेसच्‍या इंडिया टेक्‍नॉलॉजी सेंटरमधील चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर अलोक नंदा म्‍हणाले. ”आमच्‍या कर्मचाऱ्यांचा एसटीईएम शिक्षण्‍यामध्‍ये स्‍वयंसेवेचा दीर्घकालीन वारसा आहे आणि मला विश्वास आहे की त्‍यांची समर्पितता विद्यार्थ्‍यांसाठी सहाय्यक व प्रभावी वातावरण निर्माण करेल, जेथे ते अभियांत्रिकीमध्‍ये करिअर घडवण्‍यासाठी तयारी करत आहेत. सहयोागने आमचा उद्योगामधील कौशल्‍य तफावत दूर करण्‍याचा आणि उज्‍ज्‍वल भविष्‍याकरिता वैविध्‍यपूर्ण व शक्तिशाली अभियांत्रिकी समूह घडवण्‍याप्रती योगदान देण्‍याचा मनसुबा आहे.”

बेंगळुरू नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स उपक्रमामध्‍ये सामील होणारे नवीन शहर आहे आणि आशिया-पॅसिफिक प्रांतामध्‍ये लाँच करण्‍यात आलेला पहिला नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राम आहे. २०२४ मध्ये सिनसिनाटी, ओहायो येथे प्रोग्रामचा विस्तार आणि पोलंडमधील वॉर्सा येथे प्रोग्रामचा शुभारंभ झाल्यानंतर या प्रोग्रामचे विस्‍तारीकरण करण्‍यात आले आहे, तसेच आणखी काही प्रोग्राम्‍स सुरू होणार आहेत. जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशनने २०३० पर्यंत हा प्रोग्राम सुरू ठेवण्‍यासाठी पुढील ५ वर्षांमध्‍ये जवळपास २० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक केली आहे. 

विद्यार्थी, कुटुंबं आणि अधिक अध्‍ययनामध्‍ये रूची असलेल्‍या शाळा https://www.nextengineers.org/locations/bengaluru येथे भेट देऊ शकतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button