नवी दिल्ली, जुलै २, २०२५: माझा या कोका-कोला इंडियाच्या प्रख्यात स्वदेशी मँगो ड्रिंकने एआय-पॉवर्ड प्लॅटफॉर्म ‘मेरी छोटी वाली जीत’ लाँच केला आहे, जो जीवनातील दैनंदिन विजयी क्षणांना प्रकाशझोतात आणतो, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. ऑगील्व्ही इंडियाने विकसित केलेला हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना फोटो अपलोड करण्याचे आणि त्यांच्या ‘छोटी वाली जीत’बाबत लहान कहाण्या शेअर करण्याचे आवाहन करतो. बदल्यात, प्लॅटफॉर्म माझा-स्टाइलमध्ये सर्वोत्तम अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करतो, ज्यामुळे दैनंदिन क्षण संस्मरणीय गाथांमध्ये बदलून जातात.

संपूर्ण जगात सामान्यत: भव्य यशांवर लक्ष केंद्रित केले जाते, पण माझाने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम अखेर पूर्ण करायचे असो, नवीन गाणे किंवा गिटार शिकायचे असो किंवा ऑफिसमध्ये उत्तम प्रेझेन्टेशन सादर करायचे असो माझाचा प्रत्येक लहान विजयाला उत्साहपूर्ण क्षणामध्ये बदलण्यावर विश्वास आहे. आणि तो क्षण येताच नक्की म्हटले जाते ‘माझा हो जाये’.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या न्यूट्रिशन कॅटेगरीच्या विपणनाचे संचालक अजय कोनाळे म्हणाले, ”या वर्षाच्या सुरूवातीला आम्ही माझासाठी नवीन पोझिशनिंग सादर केले, ज्यामुळे ते दैनंदिन लहान विजयांना साजरे करण्यासाठी आवश्यक पेय बनले आहे. ‘मेरी छोटी वाली जीत’ प्लॅटफॉर्मच्या लाँचसह आम्ही या उत्साहाला अधिक पुढे घेऊन जात आहोत, जेथे सर्वोत्तम, आनंददायी व सामाजिक स्तरावर शेअर केल्या जाणाऱ्या आधुनिक फॉर्मेटमध्ये ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करत आहोत. ग्राहकांचे डिजिटल जीवन बदलत असताना माझा देखील बदलत आहे, पण उत्साहपूर्ण आनंद देण्यााचे, तसेच लहान, पण महत्त्वपूर्ण क्षणांना सन्मानित करण्याचे आपले तत्त्व कायम ठेवत आहे.”
वैयक्तिक आणि कौटुंबिक क्षणांचा आनंद देणाऱ्या माझाने मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी अभिनय क्षेत्रातील आदर्श जोडपे जिनिलिया व रितेश देशमुख यांना ऑनबोर्ड केले आहे. एकमेकांना उत्साहित करायचे असो किंवा लहानात लहान गोष्टींचा आनंद घ्यायचा असो ते प्रेक्षकांना त्याचे महत्व दर्शवतात, जे माझा देखील दर्शवते.
जिनिलिया देशमुख म्हणाल्या, ”जीवनातील सर्वात सुंदर क्षण मोठ्या यशांमधून मिळतात असे नाही, माझ्या मुलांना नवीन डान्स स्टेप शिकवणे किंवा चित्र रंगवणे असे लहान, अनपेक्षित विजयी क्षण देखील मोठा आनंद देऊन जातात. ‘मेरी छोटी वाली जीत’ प्लॅटफॉर्म याबाबत आहे. आई व कामकाजी महिला असल्याने मी प्रत्येक लहान विजयाचा आनंद घेण्यास शिकले आहे. हा प्लॅटफॉर्म त्या लहान विजयांना साजरे करण्याचे खास माध्यम आहे, ज्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण जे जीवनात महत्त्वाचे असतात.”
रितेश देशमुख म्हणाले, ”आपण अशा विश्वामध्ये राहतो, जेथे मोठ्या क्षणांना अधिक प्राधान्य दिले जाते. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, पाककलेत नवीन खाद्यपदार्थ बनवणे किंवा नवीन फूटबॉल ट्रिक शिकणे यांसारखे लहान क्षण देखील तुमचा उत्साह वाढवतात. माझ्यासाठी दररोज असे लहान क्षण जीवनाला अधिक वास्तविक, अधिक कनेक्टेड व उत्साही बनवतात. माझा प्रत्येकाला लहान विजयांना देखील साजरे करण्यास प्रेरित करत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे.”
डब्ल्यूपीपीमधील ओपनएक्सचा भाग म्हणून ऑगील्व्ही इंडियाने या मोहिमेची संकल्पना मांडली आहे. ऑगील्व्ही इंडियाचे सीसीओ सुकेश नायक म्हणाले, ”माझाचा लहान विजयांच्या साजरीकरणासोबतचा सहयोग साध्या विचारामधून आला आहे, ते म्हणजे, अत्यंत धकाधकीच्या विश्वामध्ये माझाचा जीवन संपन्न करण्याच्या साध्या उत्साहपूर्ण क्षणांच्या क्षमतेवर विश्वास आहे. हा प्लॅटफॉर्म सामान्य क्षणामधील आकर्षकतेला मानवंदना आहे, जो प्रत्येकाला आनंद आणणारे क्षण ओळखण्यास, कौतुक करण्यास आणि शेअर करण्यास प्रेरित करतो. स्वास्थ्य व आनंदाप्रती योगदान देणाऱ्या प्रत्येक लहान विजयाला ओळखणे व साजरे करणे महत्त्वाचे आहे.”
खऱ्या रसाळ हापूस आंब्याच्या गोडव्यासह बनवण्यात आलेला माझा दशकांपासून भारताील पसंतीचे मँगो ड्रिंक आहे. या नवीन डिजिटल अनुभवासह ब्रँड ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करत आहे, जेथे त्यांना स्वत:कडे लक्ष देण्याचा आणि त्यांच्या दैनंदिन विजयांना प्रकाशझोतात आणण्याचा नवीन मार्ग देत आहे.