मुंबई, १३ जानेवारी २०२५: मॅडिसन मीडिया या मॅडिसन वर्ल्डच्या विभागाला मॅडिसन मीडिया आणि ओओएचचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सखुजा यांना एडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय)कडून प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. या गौरवातून जाहिरात उद्योगाप्रति त्यांचे अमूल्य योगदान आणि मीडिया व आऊट ऑफ होम (ओओएच) विभागांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यातील नेतृत्व दिसून येते.
या गौरवाबाबत बोलताना मॅडिसन वर्ल्डचे अध्यक्ष सॅम बलसारा म्हणाले की, “हा जीवनगौरव पुरस्कार विक्रमच्या अथक कार्यपद्धतीचे, त्यांच्या सर्वोत्तमतेप्रति असलेल्या पॅशनचे आणि संपूर्ण मीडिया उद्योगावर सकारात्मक परिणाम घडवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

या पुरस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त करताना मॅडिसन मीडिया आणि ओओएचचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सखुजा म्हणाले की, “एएएआयकडून हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. माझ्यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या ३१ विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा मला आणखी आनंद झाला, कारण हे सर्व लोक खूप महान आहेत. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या सहकाऱ्यांकडून हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मला या पुरस्काराने गौरवण्यात आले त्याबद्दल मी संपूर्ण उद्योगाचे खूप आभार मानतो.”

अत्यंत दिमाखदार अशा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १० जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. या वेळी जाहिरात आणि मार्केटिंग उद्योगातील अत्यंत प्रभावशाली लोक एकत्र आले होते. पियूष पांडे, प्रसून जोशी, एन. पी. सिंग, अरविंद शर्मा, मधुकर कामत, रमेश नारायण, सॅम बलसारा, शशी सिन्हा, अनुप्रिया आचार्य, प्रशांत कुमार आणि उद्योगातील इतर अनेक मान्यवर लोक तसेच २०० पेक्षा अधिक लोक या वेळी उपस्थित होते.
