मुंबई, जून १७, २०२५: एचडीएफसी लाइफ ही भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी आणि दिगंबर कॅपफिन लिमिटेड यांनी सहयोग केला आहे. या सहयोगाचा मायक्रो लोन्स कव्हर करत आर्थिक समावेशन सुधारण्याचा मनसुबा आहे. हा सहयोग भारतातील वंचित प्रदेशांमध्ये जीवन विमा (life insurance) मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देईल.
हा सहयोग राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमालय प्रदेश आणि जम्मू व काश्मीर येथील १२० जिल्ह्यांमधील दिगंबर कॅपफिनच्या व्यापक नेटवर्कचा फायदा घेईल, ज्यामुळे अर्ध-शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्ये जीवन विमा अधिक प्रमाणात उपलब्ध होईल.

हा सहयोग दोन्ही कंपन्यांच्या समान उद्देशावर भर देईल, तो म्हणजे वैविध्यपूर्ण आणि यापूर्वी वंचित राहिलेल्या समुदायांपर्यंत पोहोचत आर्थिक समावेशन तफावत दूर करणे. हा उपक्रम प्रत्येक भारतीयासाठी जीवन विमा उपलब्ध करून देण्याप्रती एचडीएफसी लाइफच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे, ज्याद्वारे सर्वांसाठी आर्थिक सुरक्षितता व सक्षमीकरणाच्या मोठ्या ध्येयाप्रती योगदान देईल.
याबाबत मत व्यक्त करत एचडीएफसी लाइफचे कार्यकारी संचालक व चीफ बिझनेस ऑफिसर विनीत अरोरा म्हणाले, ”आम्हाला दिगंबर कॅपफिन लिमिटेडसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. जीवन विमा उद्योग ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ ध्येय संपादित करण्यास सज्ज आहे. एचडीएफसी लाइफमध्ये आम्ही भौगोलिक क्षेत्रांमध्ये आमची उपस्थिती वाढवत हे सहयोगात्मक ध्येय संपादित करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आमचा विश्वास आहे की हा सहयोग व्यक्तींना, विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागामधील व्यक्तींना विमा संरक्षण देण्यामध्ये आणि त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुनिश्चित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत दिगंबर कॅपफिन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन म्हणाले, ”आम्हाला एचडीएफसी लाइफसोबत सहयोग करण्याचा अत्यंत आनंद होत आहे, ज्याद्वारे आम्ही वंचित उद्योजकांना देण्यात आलेले प्रत्येक कर्ज सामाजिक सुरक्षितता देण्याची खात्री घेऊ. हा सहयोग कर्जदाराच्या दु:खद निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण देईल. एचडीएफसी लाइफचा ग्राहक केंद्रित्वावरील प्रबळ फोकस आणि सोप्या, एण्ड-टू-एण्ड प्रक्रिया दिगंबर कॅपफिन लिमिटेडला तळागाळातील अल्प-उत्पन्न असलेल्या व्यक्तींना प्रभावीपणे विमा कव्हरेज देण्यास सक्षम करतील.”