एचडीएफसी लाइफकडून पॉलिसीधारकांसाठी ४१०२ कोटी रूपयांचा बोनस जाहीर

News Service

मुंबई, जून, २०२५: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या जीवन विमा कंपनीने १७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४१०२ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. एचडीएफसी लाइफने त्यांच्या सहभागी* पॉलिसींवर जाहीर केलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस आहे, ज्याचा फायदा २१.९० लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना होईल. हा टप्पा आणखी खास बनवणारी बाब म्‍हणजे एचडीएफसी लाइफला २५ वर्ष पूर्ण होत असताना ही घोषणा करण्‍यात आली आहे.

घोषित केलेल्या एकूण बोनसमधून चालू आर्थिक वर्षात पॉलिसींना सर्व्हायवल किंवा मॅच्युरिटी पेमेंटचा भाग म्हणून ३२३२ कोटी रुपये देण्‍यात येतील आणि उर्वरित रक्‍कम पॉलिसी बेनिफिट्स म्हणून जमा होईल आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षांत हे बेनिफिट पेमेंट केल्यावर दिले जाईल.

एचडीएफसी लाइफने घोषित केलेला वार्षिक बोनस दर चार वर्षांनी अंदाजे दुप्पट झाला आहे, ज्यामुळे नफ्यासह फंड कामगिरी आणि पॉलिसीधारक मूल्यात सातत्यपूर्ण वाढ दिसून येते. कंपनीने सुरुवातीपासून सर्व पात्र सहभागी पॉलिसींमध्ये एकूण २२,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण संचयित बोनस रक्‍कम जाहीर केली आहे.

एचडीएफसी लाइफच्‍या नियुक्‍त अॅक्च्युअरी ईश्वरी मुरुगन म्हणाल्या, “एचडीएफसी लाईफने या वर्षीचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस जाहीर केला आहे, याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. पॉलिसी बोनस हा दीर्घकाळापर्यंत संलग्‍न राहणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी निष्‍ठावान रिवॉर्ड आहे. आमच्या प्रवासाची २५ वर्षे पूर्ण करत असताना आम्ही सर्व भागधारकांना मूल्य प्रदान करत आहोत.

आमच्या पॉलिसीधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवन विम्याद्वारे (life insurance) आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा आमचा प्रयत्‍न आहे, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना तोंड देता येईल आणि भविष्यासाठी सज्ज राहता येईल. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह आम्ही जीवन सुरक्षित करत राहू आणि ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ हा दृष्टिकोन साध्य करण्यासाठी योगदान देऊ.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button