एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम सांगते, ”सेवानिवृत्ती नियोजन सुरू करण्‍याची सर्वोत्तम वेळ आत्ताच आहे”

News Service

मुंबई, २०२४: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या विमा कंपनीने वेळेवर सेवानिवृत्ती नियोजनासाठी (retirement planning) महत्वपूर्ण गरजेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन मोहिमेचे अनावरण केले आहे. भारतातील वृद्ध व्‍यक्‍तींची वाढती लोकसंख्‍या, तसेच आरोग्‍यसेवेमधील सुधारणांमुळे वाढते आयुष्‍य आणि जीवनाचा सुधारित दर्जा यामुळे सेवानिवृत्ती नियोजन करणे अनिवार्य आहे.

२०५० पर्यंत व्‍यक्‍तींना निवृत्तीनंतर ३० वर्षांपर्यंत उत्‍पन्‍नाची गरज भासण्‍याची अपेक्षा असल्‍यामुळे* लवकर व धोरणात्‍मक सेवानिवृत्ती नियोजन आवश्‍यक आहे. लवकर सुरूवात करण्‍याचे महत्त्व माहित असताना देखील अनेक भारतीयांना उद्देश व कृतीदरम्‍यान मोठ्या तफावतीचा सामना करावा लागतो. लक्षणीय बाब म्‍हणजे, ५० वर्षांवरील ९० टक्‍के व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या सेवानिवृत्ती नियोजनाला विलंब केल्‍याचा खेद वाटतो**.

एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम सेवानिवृत्ती नियोजन पुढे जाण्‍यास कारणीभूत सामान्‍य अडथळ्यावर प्रकाश टाकते. पालक त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या सेवानिवृत्ती नियोजनापेक्षा सामान्‍यत: गृहकर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण किंवा त्वरित कौटुंबिक गरजा अशा आर्थिक कटिबद्धतांना प्राधान्‍य देतात. अशा विलंबामुळे सेवानिवृत्ती निधी कमी होतो, कारण नियोजनाला उशीर झाल्‍याने संपत्ती जमा होण्‍यासाठी मर्यादित वेळ मिळतो.

एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम मुलाचे कॉलेज शिक्षण या संबंधित टप्‍प्‍याचे पालकांसाठी त्‍यांचा सेवानिवृत्ती नियोजन प्रवास सुरू करण्‍याचा महत्त्वपूर्ण क्षण मानते. मोहिमेचा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्‍यासोबत व्‍यक्‍तीचे आर्थिक भविष्‍य सुरक्षित करण्‍याच्‍या गरजेबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.

या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त एचडीएफसी लाइफचे ग्रुप हेड स्‍ट्रॅटेजी आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर विशाल सुभरवाल म्‍हणाले, ”बचत संपण्‍याचा धोका मोठी समस्‍या आहे, जी व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या जीवनकाळादरम्‍यान सामना करावी लागते. चक्रवाढीच्‍या क्षमतेचा फायदा घेण्‍यासाठी लवकर सेवानिवृत्ती नियोजन सुरू करणे आवश्‍यक आहे. भारतातील व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या मुलांचे भविष्‍य सुरक्षित करण्‍यापर्यंत याबाबतीत विलंब करतात. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून आमचा मुख्‍य संदेश आहे की, व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या सुवर्णकाळासाठी लवकर नियोजन सुरूवात केले पाहिजे आणि सर्वोत्तम वेळ आत्ताच आहे.”

दक्षिण आशियामधील लिओ बर्नेटचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर विक्रम पांडे म्‍हणाले, ”अनेकदा वयाच्‍या पन्‍नाशीपर्यंत पोहोचल्‍यावर व्‍यक्‍तींना जाणीव होते की, त्‍यांनी त्‍यांच्‍या निवृत्तीनंतरच्‍या जीवनासाठी पुरेसे नियोजन केलेले नाही आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एचडीएफसी लाइफसाठी (HDFC Life) या कॅम्‍पेनमध्‍ये जीवनातील नव्‍या टप्‍प्‍याकडे वाटचाल करणाऱ्या जोडप्‍याच्‍या गाथेला दाखवण्‍यात आले आहे, जेथे त्‍यांच्‍याकडे कोणतीच बचत नाही. आम्‍हाला संदेश द्यायचा आहे की आर्थिक प्राधान्‍यक्रमांमध्‍ये बदल करण्‍याची वेळ आली आहे, तसेच तुम्‍ही तुमच्‍या सेवानिवृत्तीकडे लक्ष दिले पाहिजे आणि जीवनातील पुढील चॅप्‍टरसाठी बचत केली पाहिजे. यासंदर्भात नियोजन करण्‍यासाठी एचडीएफसी लाइफपेक्षा उत्तम सोबती असणार नाही.”

मोहिम अधिक पोहोच व प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या खात्रीसाठी विविध प्‍लॅटफॉर्म्‍ससह टेलिव्हिजन, डिजिटल आणि इतर मास मीडियावर लाँच करण्‍यात आली आहे.

एचडीएफसी लाइफ आर्थिक साक्षरता व जागरूकतेला समर्थन करत आहे, तसेच आजच्‍या डायनॅमिक आर्थिक लँडस्‍केपमध्‍ये सक्रिय सेवानिवृत्ती नियोजनाच्‍या महत्त्वावर भर देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button