मुंबई, एप्रिल २८, २०२५: एचडीएफसी लाइफ या भारतातील सर्वात मोठ्या जीवन विमा कंपनीने २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू व काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पॉलिसीधारकांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी/नॉमिनीसाठी क्लेम्स करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.
एचडीएफसी लाइफकडे असलेल्या पॉलिसीविरुद्ध मृत्यूचा दावा सादर करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला (नॉमिनी)/कायदेशीर वारसाला स्थानिक सरकार, पोलिस, हॉस्पिटल किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या मृत्यूचा पुरावा द्यावा लागेल.
नामांकित व्यक्ती (नॉमिनी) कॉल सेंटर क्रमांक: ०२२-६८४४६५३० वर संपर्क साधत किंवा service@hdfclife.com येथे ईमेल करत किंवा कोणत्याही शाखा कार्यालयामध्ये भेट देत एचडीएफसी लाइफशी संपर्क साधू शकता. कंपनीच्या सर्व ठिकाणी स्थानिक शाखेचे कर्मचारी बाधित कुटुंबांना प्रत्यक्ष मदत आणि पाठिंबा देण्यासाठी उपलब्ध असतील.
एचडीएफसी लाइफचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर समीर योगीश्वर म्हणाले, ”आम्ही या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्रियजनांचा जीव गमावलेल्या कुटुंबांच्या दु:खात सामील आहोत आणि त्यांचे सांत्वन करतो. या हल्ल्यामुळे त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई कधीच करता येऊ शकत नाही, पण आम्ही या सोप्या प्रक्रियेच्या माध्यमातून क्लेम सबमिशनसाठी आवश्यक असलेले प्रयत्न कमी करण्याची आशा करतो.”