हीरो मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवीन डेस्टिनी 125 सेगमेंट-लीडिंग मायलेज आणि इंडस्‍ट्री-फर्स्‍ट वैशिष्‍ट्यांनी युक्‍त

News Service

हिरो मोटोकॉर्प ही जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सची सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी नवीन डेस्टिनी १२५च्‍या लाँचसह १२५ सीसी स्‍कूटर सेगमेंटला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे.

शहरी गतीशीलता अपग्रेड करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नवीन डेस्टिनी १२५ मध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह अद्वितीय मायलेज आणि अविरत विश्‍वसनीयता आहे. ही स्‍कूटर कार्यक्षमता व व्‍यावहारिकतेचे प्रबळ संयोजन देते, शहरामध्‍ये दररोज राइड्ससाठी नवीन मापदंड स्‍थापित करते, तसेच राइडरच्‍या अपेक्षांना नव्‍या उंचीवर घेऊन जाते.

नवीन हिरो डेस्टिनी १२५ तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल: 

  • डेस्टिनी १२५ व्‍हीएक्‍स – ८०,४५० रूपये
  • डेस्टिनी १२५ झेडएक्‍स – ८९,३०० रूपये
  • डेस्टिनी १२५ झेडएक्‍स+ – ९०,३०० रूपये

(दिल्‍लीमधील सुरूवातीची एक्‍स-शोरू किंमत)

नवीन डेस्टिनी १२५ मधून हिरो मोटोकॉर्पची नाविन्‍यतेप्रती समर्पितता दिसून येते. या स्‍कूटरमध्‍ये ३० पेटण्‍ट अॅप्‍लीकेशन्‍स आणि इंडस्‍ट्री-फर्स्‍ट वैशिष्‍ट्ये आहेत, जसे इल्‍यूमिनेटेड स्‍टार्ट स्विच व ऑटो-कॅन्‍सल विंकर्स, ज्‍यामधून राइडरला अधिक सोयीसुविधता व सुरक्षिततेची खात्री मिळते.

नवीन डेस्टिनी १२५ कुटुंबांसाठी योग्य निवड आहे. या स्‍कूटमध्‍ये प्रतिलिटर ५९ किमीचे सेगमेंट-लीडिंग मायलेज, एैसपैस लेगरूम आणि फ्लोअरबोर्ड आहे. डेस्टिनी १२५ मध्‍ये लांब सीट देखील आहे, ज्‍यामधून राइडरला आरामदायी व एर्गोनॉमिक अनुभव मिळतो.

स्‍मार्टर, सुलभ व अधिक किफायतशीर राइडचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या स्‍कूटरमध्‍ये नवीन डिजिटल स्‍पीडोमीटर, १९० मिमी फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक, अपग्रेडेड १२/१२ प्‍लॅटफॉर्म आणि विस्‍तृत रिअर व्‍हील आहे. तसेच, या स्‍कूटरमध्‍ये सुधारित कार्यक्षमतेसाठी हिरोचे नाविन्‍यपूर्ण आय३एस (इडल स्‍टॉप-स्‍टार्ट सिस्‍टम) तंत्रज्ञान देखील आहे. विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेले सीट बॅकरेस्‍ट आरामदायीपणामध्‍ये अधिक भर करते, ज्‍यामधून उच्‍च दर्जाच्‍या राइडिंग अनुभवाची खात्री मिळते.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत हिरो मोटोकॉर्पच्‍या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ”आम्‍हाला स्‍टाइल, सोयीसुविधा व प्रगत तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेली नवीन हिरो डेस्टिनी १२५ लाँच करण्‍याचा आनंद होत आहे, जी आधुनिक काळातील राइडसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ही नाविन्‍यपूर्ण १२५ सीसी स्‍कूटर उद्योग मापदंडांना नव्‍या उंचीवर घेऊन जाते आणि हिरो मोटोकॉर्पचे स्‍थान अधिक दृढ करते. प्रतिलिटर ५९ किमीच्‍या प्रभावी सेगमेंट-लीडिंग मायलेजसह या कुटुंबासाठी अनुकूल स्‍कूटरमधून ग्राहकांना नाविन्‍यता, मूल्‍य व अद्वितीय राइडिंग अनुभव देण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.”

ऑल-न्‍यू डेस्टिनी १२५

मायलेज व कार्यक्षमतेमध्‍ये लीडर

नवीन डेस्टिनी १२५ मध्‍ये सुधारित व कार्यक्षम १२५ सीसी इंजिनची शक्‍ती आहे, जे ७००० आरपीएममध्‍ये ९ बीएचपी शक्‍ती आणि ५५०० आरपीएममध्‍ये १०.४ एनएम अधिकतम टॉर्क देते. आय३एस तंत्रज्ञान आणि वन-वे क्‍लचसह ही स्‍कूटर प्रतिलिटर ५९ किमीचे दर्जात्‍मक मायलेज संपादित करते, तसेच सुलभ अॅक्‍सेलरेशनची खात्री देते.

अपवादात्‍मक सोयीसुविधा

नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांसह डेस्टिनी १२५ मध्‍ये कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचे परिपूर्ण संयोजन आहे, जे आधुनिक काळातील राइडिंग गरजांची पूर्तता करतात.

या स्‍कूटरमधील एैसपैस लेगरूममधून लांबच्‍या प्रवासादरम्‍यान देखील आरामदायी राइडिंगचा अनुभव देते. फ्रण्‍ट ग्‍लोव्‍ह बॉक्‍स आवश्‍यक वस्‍तू ठेवण्‍यासाठी स्‍टोरेज देते, तर लगेज बॉक्‍समधील बूट लॅम्‍प व्हिजिबिलिटी वाढवते, ज्‍यामुळे अंधुक प्रकाशात देखील वस्‍तू सहजपणे दिसतात. आधुनिकतेची भर करण्‍यात आलेल्‍या या स्‍कूटरमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्य ऑटो-कॅन्‍सलेशन विंकर्स आहे, जे वळण घेतल्‍यानंतर आपोआपपणे इंडिकेटर्स बंद करत सुरक्षितता व सोयीसुविधा वाढवते.

प्रगत फुली डिजिटल स्‍पीडोमीटरसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी यासोबत अनेक स्‍मार्टफोन-सुसंगत वैशिष्‍ट्ये आहेत, जसे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इको इंडिकेटर, रिअल-टाइम मायलेज डिस्‍प्‍ले (आरटीएमआय), डिस्‍टन्‍स-टू-एम्‍प्‍टी आणि लो फ्यूएल इंडिकेटर. मिस्‍ड कॉल्‍स, मेसेजेस् व इनकमिंग कॉल्‍ससाठी अलर्टससह हे नाविन्‍यपूर्ण डॅशबोर्ड राइडर्सना कनेक्‍टेड राहण्‍याची आणि प्रभावीपणे रिअल-टाइम डायरेक्‍शन्‍स मिळवण्‍याची सुविधा देते. 

अद्वितीय आरामदायीपणा

हिरो डेस्टिनी १२५ कुटुंबासाठी परिपूर्ण सोबती आहे, जी अधिक आरामदायीपणा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. लांब, उत्तमरित्‍या कूशन केलेली सीट आणि पॅडेड पिलियन सपोर्टसह प्रत्‍येक राइड राइडर व सहप्रवासीसाठी आरामदायी ठरते. एैसपैस लेगरूम व फ्लोअरबोर्ड कुटुंबांसाठी राइडिंग अधिक सोईस्‍कर बनवतात.

पुढील बाजूस मोबाइल चार्जिंग पोर्ट आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट इल्‍यूमिनेटेड स्‍टार्ट स्विचसह सुसज्‍ज असलेल्‍या स्‍कूटरमधून चालता-फिरता कनेक्‍टेड राहण्‍याची, तसेच विनासायास राइडचा आनंद घेण्‍याची खात्री मिळते. अपग्रेड केलेले १२/१२ प्‍लॅटफॉर्मसह मोठे रिअर व्‍हील स्थिरता व सुरक्षिततेमध्‍ये वाढ करतात, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास आरामदायी व सुरक्षित होतो. दररोज प्रवास करायचे असो किंवा कुटुंबासोबत आऊटिंगला जायचे असो हिरो डेस्टिनी १२५ अद्वितीय आरामदायीपणा आणि विश्‍वसनीयतेची खात्री देते. 

सुधारित सुरक्षितता

प्रगत एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍ससह सुसज्‍ज ही स्‍कूटर उच्‍च दर्जाची व्हिजिबिलिटी देते, ज्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी प्रवासादरम्‍यान अधिक सुरक्षितता मिळते. १९० मिमी फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक विश्‍वसनीय ब्रेकिंग पॉवर देते. या स्‍कूटरमधील १२/१२-व्‍हील आकार स्थिरता व नियंत्रण देते, ज्‍यामुळे शहरातील प्रवास व आरामदायी राइडसाठी ही स्‍कूटर योग्‍य आहे. कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या डेस्टिनी १२५ मध्‍ये व्‍यावहारिकता आणि कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन आहे, ज्‍यामुळे ही स्‍कूटर प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये उत्तम सुविधा देते. 

प्रीमियम स्‍टाइल

या स्‍कूटरच्‍या निओ-रेट्रो डिझाइनमधून कालातीत आकर्षकता दिसून येते, ज्‍याला पूरक एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि कॉपर-टोन क्रोम एलीमेंट्स आहेत, जे प्रीमियम आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात. डायमंड-कट अलॉई व्‍हील्‍स स्‍कूटरच्‍या स्‍लीक अपीमध्‍ये अधिक भर करतात, तर सिग्‍नेचर एच-शेप्‍ड एलईडी टेल लॅम्‍प्‍स स्‍कूटर गर्दीमध्‍ये देखील सहजपणे ओळखता येण्‍याची खात्री देतात. आतील बाजूस, प्रीमियम इंटीरिअर्ससह वैशिष्ट्यपूर्ण बॅजिंग लक्‍झरीअस राइडिंग अनुभव देते. कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली हिरो डेस्टिनी १२५ मध्‍ये एका स्‍टायलिश पॅकेजमधील आकर्षकता व व्‍यावहारिकता आहे.

कालातीत रंग

नवीन डेस्टिनी १२५ पाच विशेष रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. व्‍हीएक्‍स कास्‍ट ड्रम इटर्नल व्‍हाइट, रिगल ब्‍लॅक व ग्रूव्‍ही रेड या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. कास्‍ट डिस्‍क झेडएक्‍स कॉस्मि ब्‍ल्‍यू व मिस्टिक मॅजेंटामध्‍ये उपलब्‍ध आहे, तर कास्‍ट डिस्‍क झेडएक्‍स+ इटर्नल व्‍हाइट व रिगल ब्‍लॅकसह कॉपर क्रोम अॅसेंट्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

वैशिष्‍ट्येडेस्टिनी १२५ व्‍हीएक्‍सडेस्टिनी १२५ झेडएक्‍सडेस्टिनी १२५ झेडएक्‍स+
व्‍हील प्रकारकास्‍ट ड्रमकास्‍ट डिस्‍ककास्‍ट डिस्‍क
स्‍पीडोमीटरडिजि अॅनलॉगफुली डिजिटलफुली डिजिटल
वैशिष्‍ट्येएैसपैस लेगरूमफ्रण्‍ट ग्‍लोव्‍ह बॉक्‍सबूट लॅम्‍पक्रोम अॅसेंट्सडिजिअली स्‍पीडोमीटरसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटीऑटो-कॅन्‍सेल विंकर्स डायमंड-कट अलॉई व्‍हील्‍सइल्‍यूमिनेटेड स्‍टार्ट स्विचक्रोम अॅसेंट्ससर्व व्‍हीएक्‍स वैशिष्‍ट्यांसहकॉपर क्रोम अॅसेंट्सकूशन केलेले सीट बॅकरेस्‍टटर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसर्व झेडएक्‍स वैशिष्‍ट्यांसह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button