यंदाच्या नवरात्रीसोबतच सणासुदीच्या हंगामाची नांदी झाल्याने भारतातील वाहन बाजारपेठेत प्रचंड वेगाने वाढ होताना दिसत आहे. यंदाचा सणासुदीचा काळ अधिक खास आहे, कारण अनेकांच्या अपेक्षेप्रमाणे दुचाकी वाहनांवरील जीएसटीमध्ये (वस्तू व सेवा कर) कपात झाली आहे. त्यामुळे प्रथमच वाहन खरेदी करणाऱ्यांवरील कराचा भार बराच कमी झाला आहे. विशेषत: १०० सीसी व १२५ सीसी यांसारख्या किमतीबाबत सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या प्रवासी (कम्युटर) प्रवर्गाला जीएसटी कपातीचा लाभ मिळत आहे. ग्राहकांच्या उत्साहात प्रचंड वाढ झाल्याचे सुरुवातीच्या निदर्शकांवरून जाणवत आहे, विशेषत: दुचाकी वाहन प्रवर्गातील उत्साह प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रूचीमध्ये तसेच भारतभरातील विक्रीमध्ये ‘अभूतपूर्व’ वाढ झाल्याचे हिरो मोटोकॉर्पला दिसत आहे.
देशभरातील डीलरशिप्समधील व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे कंपनीने कळवले आहे. जीएसटी कपातीनंतर किमती कमी झाल्यामुळे हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांबद्दल होणाऱ्या चौकशीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांकडून अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर शोरूममध्ये होणारी गर्दीही गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा सणासुदीच्या काळातील विक्रमी प्रतिसादाबद्दल म्हणाले, “यंदाच्या सणासुदीच्या काळाचे प्रतिबिंब सर्वांत प्रकर्षाने जाणवत आहे ते ‘ऑन-द-स्पॉट’ खरेदीत झालेल्या भरीव वाढीमध्ये. नवरात्रीच्या अगदी पहिल्याच दिवशी शोरूममध्ये थेट येऊन हिरो मोटोकॉर्पच्या टू व्हीलर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक होती. जीएसटी २.०मध्ये नवीन दररचना येईल या अपेक्षेने लांबणीवर पडलेल्या खरेदीने आता जोर धरला आहे आणि अजिबात विलंब न करता नवीन वाहन खरेदी करण्याचा ग्राहकाचा हेतू स्पष्ट दिसत आहे. आमची सणासुदीच्या काळासाठी खास बाजारात आणलेली आपापल्या विभागात अग्रेसर असलेली १२ मॉडेल्स स्कूटर व मोटरसायकलमधील मागणीच्या वाढीला चालना देत आहेत. डिजिटल आकर्षण आणि चौकशीही लक्षणीय आहे, आमच्या उत्पादनांचा ऑनलाइन शोध घेण्याच्या प्रमाणातही तब्बल ३ पटींनी वाढ दिसत आहे. ”
१०० टक्के जीएसटी लाभ ग्राहकांना हस्तांतरित करण्याशिवाय हिरो मोटोकॉर्पने आपल्या हिरो गुडलाइफ फेस्टिव कॅम्पेन या आजवरच्या सर्वांत मोठ्या लॉयल्टी व रिवॉर्ड्सच्या माध्यमातून प्रथमच खरेदी करणाऱ्यांसाठी अतिरिक्त लाभांची घोषणाही केली आहे. त्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. ‘आया त्यौहार, हिरो पे सवार’ या सणासुदीच्या काळातील अभियानांच्या घोषवाक्याशी सुसंगती साधत, प्रत्येक नवीन ग्राहक वाहन खरेदीवर १०० टक्के कॅशबॅक, सोन्याची नाणी आदी विशेष लाभ जिंकेल याची हमी हे राष्ट्रव्यापी अभियान देत आहे.
डेस्टिनी 110, झूम 160, ग्लॅमर एक्स 125, एचएफ डिलक्स प्रो यांसारख्या अलीकडेच बाजारात आणलेल्या उत्पादनांच्या समूहासह हिरो मोटोकॉर्पने आपला पोर्टफोलिओ विस्तारला आहे. यामध्ये दैनंदिन प्रवासाच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या चाकोरीबाह्य तरीही शैलीदार मॉडेल्सचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात मागणीत प्रचंड वाढ झाल्यामुळे साठा संपण्याची शक्यता टाळण्यासाठी कंपनीने उत्पादनात वाढ केली आहे. त्यामुळे येते काही आठवडे लोकप्रिय मॉडेल्सचा पुरवठा सातत्याने होत राहील आणि ग्राहकांना हवे ते रंगांचे पर्यायही मिळत राहतील.