हिरो मोटोकॉर्पने नवीन एचएफ डिलक्‍स प्रोच्‍या लाँचसह एचएफ डिलक्‍स पोर्टफोलिओ सक्षम केला

News Service

‘नये इंडियन की डिलक्‍स बाइक’च्‍या प्रवासामध्‍ये आणखी एक नवीन अध्‍याय

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने वैशिष्‍ट्यांनी युक्‍त एचएफ डिलक्‍स प्रो लाँच केली आहे, जी भारतातील सर्वात विश्वसनीय मोटरसायकलची आकर्षक व स्‍टायलिश अभिव्‍यक्‍ती आहे.

ब्रँड एचएफ डिलक्‍स आधुनिक काळातील भारतीयांच्‍या उत्‍साहाला साजरे करतो, जे आत्‍मविश्वासू, मूल्‍याप्रती जागरूक आणि प्रगतीशील आहेत. एचएफ डिलक्‍स प्रोमधून विश्वासार्ह व कार्यक्षम गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती हिरो मोटोकॉर्पची कटिबद्धता दिसून येते.

विभागातील अग्रगण्‍य वैशिष्‍ट्ये, आकर्षक डिझाइन आणि उच्‍च दर्जाच्‍या इंधन कार्यक्षमतेसह नवीन एचएफ डिलक्‍स प्रो एण्‍ट्री-लेव्‍हल मोटरसायकल सेगमेंटमध्‍ये उत्‍साहाची भर करते. आय३एस (इडल स्‍टॉप-स्‍टार्ट सिस्‍टम) सारख्‍या प्रगत तंत्रज्ञानांची शक्‍ती, लो-फ्रिक्‍शन इंजिन आणि विशेष डिझाइन केलेल्‍या टायर्ससह ही मोटरसायकल प्रभावी दर्जात्‍मक मायलेज देते. एचएफ डिलक्‍स प्रो दैनंदिन आरामदायी राइड आणि अद्वितीय मूल्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

एचएफ डिलक्‍स प्रो देशभरातील हिरो मोटोकॉर्प डि‍लरशिप्‍समध्‍ये ७३,५५० रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) या किमतीत उपलब्‍ध आहे.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत हिरो मोटोकॉर्पच्‍या इंडिया बिझनेस युनिटचे मुख्‍य व्‍यवसाय अधिकारी आशुतोष वर्मा म्‍हणाले, ”एचएफ डिलक्‍स भारतभरातील लाखो ग्राहकांसाठी विश्वसनीय सोबती राहिली आहे, तसेच विश्वसनीयता व इंधन कार्यक्षमतेसाठी या मोटरसायकलचे कौतुक करण्‍यात आले आहे. नवीन एचएफ डिलक्‍स प्रोसह आम्‍ही या विश्वासाला अधिक दृढ केले आहे. या नवीन मोटरसायकलमध्‍ये आकर्षक डिझाइन, प्रगत वैशिष्‍ट्ये आणि सुधारित इंधन कार्यक्षमता आहे, जे आधुनिक काळातील भारतीय राइडरच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. ब्रँड तत्त्व ‘नये इंडियन की डिलक्‍स बाइक’ दैनंदिन राइडिंगसाठी विश्वासार्ह व अत्‍यंत कार्यक्षम गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करते.”

नवीन एचएफ डिलक्‍स प्रो
आकर्षक नवीन डिझाइन
एचएफ डिलक्‍स प्रोमध्‍ये आकर्षक नवीन लुकसह सुधारित बॉडी ग्राफिक्‍स आहेत, जे एकूण सिल्‍हूटमध्‍ये गतीशीलता व आकर्षकतेची भर करतात. या मोटरसायकलमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट एलईडी हेडलॅम्‍पसह मुकूटाच्‍या आकारासारखा उच्‍च-प्रखर पोझीशन लॅम्‍प आहे, ज्‍यामुळे दृश्‍यमानता व लक्षवेधकतेमध्‍ये वाढ होते. नजरेत भरणारे व आकर्षक ग्राफिक्‍स समकालीन लुक देतात आणि क्रोम अॅसेंट्स प्रीमियम फिलचा अनुभव देतात. ही वैशिष्‍ट्ये एचएफ डिलक्‍स प्रोला आत्‍मविश्वासपूर्ण, आधुनिक व लक्षवेधक लुक देतात.

होरिझोन डिजिटल कन्‍सोल
प्रगत डिजिटल स्‍पीडोमीटर एचएफ डिलक्‍स प्रोमध्‍ये आधुनिकतेची भर करते, जेथे सुस्‍पष्‍टता व अचूकतेसह रिअल-टाइम राइडिंग डेटा मिळतो. लो फ्यूएल इंडिकेटर (एलएफआय) असलेली ही मोटरसायकल दैनंदिन व्‍यावहारिकतेमध्‍ये वाढ करते, जेथे राइडरला इंधन केव्‍हा भरावे याबाबत माहिती मिळते, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवासाचा चिंतामुक्‍त आनंद घेता येतो.

सुधारित सुरक्षितता, अधिक आरामदायीपणा
सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देत डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एचएफ डिलक्‍स प्रोच्‍या पुढील व मागील बाजूस मोठे १८ इंच व्‍यासाचे व्‍हील्‍स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत, ज्‍यामधून अधिक स्थिरता व आरामदायी राइडची खात्री मिळते. १३० मिमी व्‍यासाचे रिअर ब्रेक ड्रम प्रबळ ब्रेकिंग कार्यक्षमता व सर्वोत्तम नियंत्रणाची खात्री देते. शक्तिशाली २-स्‍टेप अॅडजस्‍टेबल रिअर सस्‍पेंशन सेटअपसह टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही मोटरसायकल विविध प्रदेशांमध्‍ये स्थिर हाताळणी देते, ज्‍यामुळे कोणत्‍याही रस्‍त्‍यावर राइड करण्‍यासाठी ही परिपूर्ण आहे.

उच्‍च दर्जाचा मायलेज आणि कार्यक्षमता
एचएफ डिलक्‍स प्रोमध्‍ये विश्वसनीय ९७.२ सीसी इंजिनची शक्‍ती आहे. हे इंजिन ८००० आरपीएममध्‍ये ७.९ बीएचपीचा शक्तिशाली परफॉर्मन्‍स आऊटपुट आणि ६००० आरपीएममध्‍ये ८.०५ एनएम टॉर्क देते. आय३एस (इडल स्‍टॉप-स्‍टार्ट सिस्‍टम) तंत्रज्ञान, लो-फ्रिक्‍शन इंजिन आणि लो रोलिंग रेसिस्‍टण्‍स टायर्ससह ही मोटरसायकल उच्‍च दर्जाचा मायलेज गाठते, तसेच सहजपणे अॅक्‍सेलरेशनची खात्री देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button