भारत मोबिलिटी २०२५: हिरो मोटोकॉर्पकडून प्रीमियम आणि स्कूटर विभागात आकर्षक उत्पादनांचे अनावरण

News Service
  • एक्स्ट्रीम २५०आर सोबत २५० सीसी गाड्यांमध्ये दमदार प्रवेश आणि एक्सपल्स २१० ची भर टाकून एक्सपल्स पोर्टफोलिओचे दृढीकरण 
  • झूम १२५ आणि झूम १६० सोबत स्कूटर पोर्टफोलिओचा विस्तार 
  • पहिली फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल आणि ग्लोबल इलेक्ट्रिक व्हेइकल रेंजचे प्रदर्शन 
  • अद्ययावत पायाभूत सुविधा आणि ग्राहक अनुभवासह नवीन प्रीमियम शोरूम्स “हिरो प्रीमिया”चे सादरीकरण 

हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल्स आणि स्कूटर्सच्या उत्पादक कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानांची एक श्रेणी सादर केली. 

या शोमधील हिरो मोटोकॉर्पच्या पॅव्हिलियनमधून भारताला जागतिक इनोव्हेशन केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याची, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पुढे नेण्याची आणि जागतिक दर्जाच्या मोबिलिटी उपाययोजना देण्यातील वचनबद्धता अधोरेखित होते. 

शोकेसमध्ये आकर्षक वाहनांची एक नवीन श्रेणी होती. त्यासोबत नवीन युगाच्या ग्राहकांसाठी अनुभव उपाययोजना आणि तांत्रिक सुधारणाही दाखवण्यात आल्या. 

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता म्हणाले की“भारत मोबिलिटी २०२५ मध्ये हिरो मोटोकॉर्पने अत्यंत अभिमानाने डायनॅमिक आणि वैविध्यपूर्ण अशा गाड्यांचे प्रदर्शन केले, ज्या मोबिलिटीच्या भविष्याप्रति आमचे स्वप्न प्रतिबिंबित करतात. प्रीमियम मोटरसायकल्स व स्कूटर्सपासून ते अद्ययावत शाश्वत उपाययोजनांपर्यंत आम्ही विकसित भारताच्या व अत्यंत वेगाने बदलत्या जागतिक ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोबिलिटीची नव्याने व्याख्या करत आहोत. 

“आज आमचे दोन प्रमुख ब्रँड्स, एक्स्ट्रीम आणि एक्सपल्स अधिक मजबूत झाले आहेत. आम्ही १२५सीसी स्कूटर विभागात आमचे अस्तित्व मजबूत केले आहे आणि १६०सीसी कॅटेगरीतही मॅक्सी स्कूटरसह प्रवेश केला आहे. पोर्टफोलिओ मजबूत असताना या नवीन मॉडेल्स बाजारात आणल्यामुळे आम्ही नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करत असताना आमच्या वाढीचा प्रवास आणखी मजबूत होईल. जागतिक पॉवरहाऊस म्हणून आमचे स्थान मजबूत करत असताना हिरो मोटोकॉर्प प्रगतीला चालना देण्यासाठी, जागतिक दर्जाची उत्पादने तसेच स्वच्छ, हरित आणि सर्वांसाठी समावेशक भविष्यासाठी सज्ज आहे.”

उत्पादनेएक्स्ट्रीम २५०आरएक्स्पल्स २१०झूम १६०झूम १२५
किमतीरू. १,७९,९००/-रू. १,७५,८००/-रू. १,४८,५००/-रू. ८६,९००/-
उपलब्धताहिरो प्रीमियाहिरो प्रीमियाहिरो प्रीमियाहिरो डीलरशिप्स

(*एक्स-शोरूम दिल्ली)

चारही उत्पादनांसाठी बुकिंग फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल आणि डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होतील. 

एचएफ डिलक्स- फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल 

हिरो मोटोकॉर्पने भारत सरकारच्या हरित आणि नूतनक्षम ऊर्जा तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याच्या स्वप्नाला अनुसरून आपली पहिली फ्लेक्स- फ्युएल मोटरसायकल, इथेनॉलवर चालणारी हिरो एचएफ डिलक्स बाजारात आणली आहे. या फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइपची रचना कंपनीच्या अद्ययावत संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (सीआयटी) जयपूरमध्ये करण्यात आली आहे. या गाडीची रचना १००सीसी बीएस६ इंजिनासह केली गेली असून ती इथेनॉल-ब्लेंडेड गॅसोलीनवर चालेल आणि त्यातील इथेनॉलचे प्रमाण २०% (ई२०) ते ८५% (ई८५) असेल.

व्हिडा व्ही२

व्हिडा सहजसाध्य, आवडती आणि परवडणारी बनवण्याच्या आपल्या वचनाचा भाग म्हणून कंपनीने पॅव्हिलियनमध्ये व्हिडा व्ही-२ ई-स्कूटरचे प्रदर्शन केले. डिसेंबर २०२४ मध्ये बाजारात आलेली व्हिडा व्ही-२ ९६,००० रूपयांच्या प्रारंभीच्या किमतीत उपलब्ध आहे. व्हिडाच्या अद्ययावत रिमूव्हेबल बॅटरी तंत्रज्ञानाने सज्ज असलेली व्हिडा व्ही२चे चार्जिंग सहज होते आणि या गाडीची प्रति चार्ज आयडीसी रेंज तब्बल १६५ किमी  आहे. याशिवाय स्विंगआर्म माऊंटेड परमनंट मॅग्नेट सिन्क्रोनस मोटर तिच्या ६किलोवॉट पीक पॉवर आणि २५एनएम टॉर्कमुळे प्रत्येक प्रवास आनंददायी बनवते.  

सर्ज एस३२- नावीन्यपूर्णतेने सज्ज 

बदलते तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या बदलत्या वर्तनासह पुढे जात असताना हिरो मोटोकॉर्पच्या इन हाऊस सेटअपमध्ये श्रेणीतील सर्वप्रथम क्लास कन्वर्टिबल वाहन असलेली सर्ज एस३२ प्रदर्शित केली आहे. जगभरात विविध पुरस्कारांची मानकरी ठरलेल्या सर्ज एस३२ ला टाइम मॅगझीनच्या बेस्ट इनोव्हेशन्स ऑफ २०२४ ने गौरवण्यात आले आहे. तिला प्रतिष्ठेचा रेड डॉटः बेस्ट ऑफ दि बेस्ट पुरस्कार देण्यात आला आणि ए डिझाइन अवॉर्डसमध्ये प्लॅटिनम दर्जा मिळाला. त्यातून डिझाइन आणि नावीन्यपूर्णतेत ती सर्वोत्तम गाडी ठरली.  

इतर वैशिष्‍ट्ये

कंपनीच्या पॅव्हिलियनमध्ये २०२५ करिझ्मा एक्सएमआर २०१ कॉम्बॅट एडिशन, मॅव्‍हरिक ४४प्रो (अपसाइड डाऊन फोर्स आणि टीएफटी इन्स्ट्रुमेंट- क्लस्टर), करिझ्मा एक्सएमआर २५० आणि लवकरच बाजारात येणारी व्हिडा झी यांच्याद्वारे भविष्याची एक झलक दाखवली गेली. 

प्रीमिया झोन

अद्ययावत “हिरो प्रीमिया” डीलरशिप्स वैशिष्‍ट्ये हिरो, व्हिडा आणि हार्ले डेविडसन उत्पादनांसाठी विशेष विभागांसह असून त्यातून ग्राहकांना एक उत्तम आणि प्रीमिय रिटेल अनुभव दिला जातो. हिरो मोटोकॉर्पने आपला प्रीमियम पोर्टफोलिओ अधिक सहजसाध्य करण्यासाठी देशभरात ६० पेक्षा अधिक प्रीमिया डीलरशिप्स स्थापन केल्या आहेत आणि आगामी महिन्यांमध्ये त्यांची संख्या १०० वर जाईल. 

प्रीमिया झोनमध्ये हार्ले डेव्हिडसन एक्स४४०, मॅव्‍हरिक४४०, करिझ्मा एक्सएमआर २५०, एक्स्ट्रीम२५०आर, व्हिडा व्ही२ सह विविध प्रकारच्या मॉडेल्सचे आकर्षक लाइनअप प्रदर्शित करण्यात आले. 

अॅडव्‍हेंचर झोन

अॅडव्‍हेंचर झोनमध्ये हिरो मोटोकॉर्पच्या मोटरस्पोर्ट डीएनएचा केंद्रबिंदू पाहायला मिळतो. त्यात एक्सपल्स २१० रॅली आणि अप्रतिम डकार रॅली एडिशन गाड्या दिसतात. या मॉडेल्स साहसाचे मूर्तीमंत प्रतीक आहेत आणि रोमांच हवे असलेल्या ऑफ रोड रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अद्वितीय कामगिरी आणि वैविध्यपूर्णता मिळते. 

उत्पादनांच्या माहितीसाठी कृपया परिशिष्‍ट पाहावे 

हिरो मोटोकॉर्पमधील सर्व एक्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ तील हॉल नंबर ५ मध्ये १८-२२ जानेवारी २०२५ दरम्यान पाहता येईल.  

परिशिष्ट

एक्‍स्‍ट्रीम २५०आर 

हिरो मोटोकॉर्पने एक्‍स्‍ट्रीम २५०आरच्‍या लाँचसह २५० सीसी सेगमेंटमध्‍ये दमदार पदार्पण केले. एक्‍स्‍ट्रीम २५०आर एक्‍सटण्‍ट २.५आर कन्‍सेप्‍टमधून प्रेरित आहे आणि कार्यक्षमता व हाताळणीवर लक्ष केंद्रित करत त्‍यामध्‍ये अधिक सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत. सर्व कार्यक्षमतेसाठी ट्यून करण्‍यात आलेले २५० सीसी, लिक्विड-कूल्‍ड, ४-व्‍हॉल्‍व्‍ह डीओएचसी इंजिन ,२५० आरपीएममध्‍ये ३० पीएस सर्वोच्‍च शक्‍ती आणि ७२५० आरपीएममध्‍ये २५ एनएम सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते, ज्‍यामुळे ही तिच्‍या श्रेणीमधील सर्वात गतीशील २५० सीसी मोटरसायकल आहे. मोटरसायकलचे प्रबळ ट्रेलिस फ्रेम आणि ४३ मिमी यूएसडी ड्युअल कार्ट्रिज फ्रण्‍ट फोर्क्‍स अचूक व गतीशील हाताळणीची खात्री देतात.  

ड्युअल-चॅनेल एबीएसरिअल-व्‍हील लिफ्ट-ऑफ प्रोटेक्‍शन आणि इमर्जन्‍सी ब्रेक अलर्ट अशा वैशिष्‍ट्यांसह राइडरच्‍या सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. एक्‍स्‍ट्रीम २५०आरमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे इंटेलिजण्‍ट ऑटोमॅटिक इल्‍यूमिनेशन आणि हिरो कनेक्‍ट २.०. तसेच ३५ हून अधिक कनेक्‍टीव्‍ही वैशिष्‍ट्येतसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन व म्‍युझिक कंट्रोलसह राइडर्स प्रत्‍येक प्रवासामध्‍ये कनेक्‍टेड राहतात आणि त्‍यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

एक्‍सपल्‍स २१० 

हिरो मोटोस्‍पोर्टस् राइडर्सनी डिझाइन व चाचणी केलेली एक्‍सपल्‍स २१० साहसी राइडिंगचा आनंद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. शक्तिशाली २१० सीसी डीओएचसी लिक्विड-कूल्‍ड इंजिन ९२५० आरपीएममध्‍ये २४.६ पीएस शक्‍ती आणि ७२५० आरपीएममध्‍ये २०.७ एनएम टॉर्कची निर्मिती करते. दर्जात्‍मक सस्‍पेंशन सेटअपसह २१० मिमी फ्रण्‍ट व २०५ मिमी रिअर ट्रॅव्‍हल आणि मोठे २२० मिमी ग्राऊंड क्‍लीअरन्समधून विविध प्रदेशांमध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या कार्यक्षमतेची खात्री मिळते. मोटरसायकलचे वैविध्‍यपूर्ण एर्गोनॉमिक्‍स, आरामदायी सीटिंगसह व्‍यापक व फ्लॅट प्रोफाइल दैनंदिन प्रवासादरम्‍यान, तसेच ऑफ-रोड साहसी राइडदरम्‍यान अधिक आरामदायी राइडचा आनंद देतात. ६-स्‍पीड गिअरबॉक्‍ससह स्लिपर व असिस्‍ट क्‍लच उच्‍च क्रूझिंग गती आणि सुलभ गिअर शिफ्ट्सची खात्री देतात.

एक्‍सपल्‍स २१० मध्‍ये किमान, पण उद्देशपूर्ण डिझाइन घटक आहेत, जसे राइडरला अधिक सपोर्टसाठी फ्रण्‍ट व रिअर श्रॉड्स, तसेच विशिष्‍ट वैशिष्‍ट्ये जसे प्रबळ फ्रण्‍ट ग्रॅब बार आणि साहसी राइड सुसज्‍जतेसाठी अपस्‍वेप्‍ट एक्‍झॉस्‍ट. व्हिज्‍युअल आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करत एक्‍सपल्‍स २१० मध्‍ये क्‍लास-डी एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प आणि उच्‍च दर्जाच्‍या व्हिजिबिलिअीसाठी सिग्‍नेचर एच-आकाराचे डीआरएल आहेत. सुसंगत एच-आकाराचे एलईडी टेल लॅम्‍प मोटरसायकलच्‍या विशिष्‍ट लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करते. एक्‍सपल्‍स २१० च्‍या टॉप व्‍हेरिएण्‍टमध्‍ये अत्‍याधुनिक ४.२ इंच टीएफटी डिस्‍प्‍ले आहे. ड्युअल-चॅनेल स्विचेबत एबीएस विविध राइडिंग स्थितींसाठी रोड, ऑफ-रोड व रॅली मोड्स देते.      

झूम १६० 

झूम १६० ने प्रीमियम स्‍कूटर श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केला आहे. या स्‍कूटरमध्‍ये नाविन्‍यपूर्ण डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि अपवादात्‍मक कार्यक्षमतेचे सुसंगत संयोजन आहे. मर्यादांना दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही स्‍कूटर राइडचा आनंद देण्‍यासोबत दुचाकी कार्यक्षमतेमधील मोठ्या परिवर्तनाला सादर करते. ही रिइमॅजिन करण्‍यात आलेली स्‍कूटर आहे. 

या स्‍कूटरमधील १५६ सीसी लिक्विड-कूल्‍ड इंजिन ,००० आरपीएममध्‍ये १०.९ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ,५०० आरपीएममध्‍ये १४ एनएम टॉर्क देते. झूम १६० मध्‍ये सानुकूल कार्यक्षमता व हाय-स्‍पीड क्षमतेसाठी आय३एस सायलेण्‍ट स्‍टार्ट आणि ४-व्‍हॉल्‍व्‍ह तंत्रज्ञान आहे. झूम १६० च्‍या आकर्षक डिझाइनमध्‍ये सुधारित स्‍टान्‍स, १४ इंच मोठे व्‍हील्ससह ब्‍लॉक-पॅटर्न टायर्स आणि उच्‍च दर्जाच्‍या आरामदायीपणासाठी रूंद, कूशन केलेली सीट आहे. तसेच या स्‍कूटरमध्‍ये प्रगत वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे स्‍मार्ट की सह रिमोट सीट अॅक्‍सेसड्युअल-चेंबर एलईडी हेडलॅम्‍प, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेकसह एबीएस आणि ब्‍ल्‍यूटूथ-एनेबल डिजिटल स्‍पीडोमीटरसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन.

झूम १२५ 

हिरो झूम १२५ स्‍कूटरपेक्षा अधिक शक्तिशाली, अचूकरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेली दुचाकी आहे. हिरो मोटोकॉर्पने झूम १२५ च्‍या लाँचसह १२५ सीसी स्‍कूटर सेगमेंटला नव्‍या उंचीवर नेले आहे. या स्‍कूटरमधील इंजिन ,२५० आरपीएममध्‍ये ७.३ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ,००० आरपीएममध्‍ये १०.४ एनएम टॉर्कची निर्मिती करते, ज्‍यासह स्‍कूटर दर्जात्‍मक कार्यक्षमता देते. ७.६ सेकंदांमध्‍ये ० ते ६० किमी/तास गती देत ही १२५ सीसी स्‍कूटर सेगमेंटमधील सर्वात गतीशील स्‍कूटर ठरली आहे. 

स्‍कूटरमध्‍ये आकर्षक डिझाइनसह फाल्‍कनच्‍या (ससाणा) तीक्ष्‍ण नजरेसारखे बॉडी माऊंटेड एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍पन, सिग्‍नेचर एलईडी पोझिशन लाइट आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट एलईडी सिक्‍वेन्शियल विंकर्स आहेत. स्थिरता व स्‍टाइलसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या झूम १२५ मध्‍ये १४ इंच मोठे व्‍हील्ससह मोठे टायर्स, लांब व्‍हीलबेस आणि सुधारित ग्रिप व आत्‍मविश्‍वासपूर्ण ब्रेकिंगसाठी फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक आहे. ब्‍ल्‍यूटूथ-एनेबल डिजिटल स्‍पीडोमीटरसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इल्‍यूमिनेटेड स्‍टार्ट बटन आणि फ्रण्‍ट ग्‍लोव्‍ह बॉक्‍ससह फोन चार्जर राइडिंग अनुभव अधिक उत्‍साहित करतात.  

हिरो एक्‍स्‍ट्रीम २५०आर, हिरो एक्‍सपल्‍स २१० आणि हिरो झूम १६० हिरो प्रीमिया डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध असतील आणि हिरो झूम १२५ देशभरातील सर्व अधिकृत हिरो डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल. 

अत्‍याधुनिक हिरो प्रीमिया डिलरशिप्‍समध्‍ये हिरो, व्हिडा व हार्ले-डेव्हिडसन उत्‍पादनांसाठी समर्पित सेक्‍शन्‍स आहेत, जे ग्राहकांना विनासायास व प्रीमियम रिटेल अनुभव देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button