हयात इंडियाने वर्ल्ड ऑफ हयात लॉयल्टी प्रोग्राम सदस्यांसाठी आणली खास मेंबर डे ऑफर

News Service

दर महिन्याच्या १८ तारखेला वर्ल्ड ऑफ हयात सदस्यांना मिळणार आपल्या वास्तव्यावर करता १८ टक्‍के बचत करण्याची खास संधी

भारत, १६ जुलै २०२५ – हयातने आज आपल्या वर्ल्ड ऑफ हयात लॉयल्टी प्रोग्राम सदस्यांच्या खास फायद्यासाठी असलेल्या बहुप्रतिक्षित मेंबर डे ऑफरची भारत व नैऋत्य आशियामध्ये घोषणा केली. मर्यादित काळासाठी खुली असलेली ही ऑफर बचत व बोनस पॉइंट्स देऊ करते व त्याचवेळी सदस्यांना हयातच्या सोबतीने प्रवासाच्या अव्वल दर्जाच्या अनुभवाचा आनंद अऩुभवता येतो – ज्यामुळे तुमचा प्रत्येक प्रवास अधिकच लाभदायक ठरतो.

१८ जुलै २०२५ पासून सुरू होत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या वर्ल्ड ऑफ हयातच्या सदस्यांना भारत व नैऋत्य आशियातील सहभागी हयात हॉटेल्समध्ये कोणत्याही महिन्याच्या १८ तारखेला केलेल्या बुकिंगवर व बुकिंग केल्यावर ३० दिवसांच्या आत पूर्ण होणाऱ्या वास्तव्यावर खास १८ टक्‍के सूट मिळेल. त्याचबरोबर सदस्यांना डबल बोनस पॉइंट्स आणि दोन व्यक्तींसाठी कॉम्प्लिमेन्टरी ब्रेकफास्ट दिला जाईल.

“आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे मूळ आमच्या सदस्यांची काळजी घेण्यामध्ये असते. या खास ऑफरमुळे सदस्यांना आपल्या दौऱ्यांदरम्यान आमच्याकडील अविस्मरणीय वास्तव्याचा आनंद लुटता येईल, तसेच भारत व नैऋत्य आशियातील आमच्या वास्तूंमध्ये वेळ घालविण्याचा संपन्न अऩुभव घेता येईल व हे करत असताना आपल्या दौऱ्यांदरम्यान बचतही करता येईल.” हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनच्या कमर्शियल, इंडिया अँड साऊथवेस्ट एशिया विभागाच्या आरव्हीपी कदंबिनी मित्तल म्हणाल्या.

मेंबर डे ऑफर आपल्या सदस्यांना अधिक मूल्य, लवचिकता आणि वैयक्तिकृत अनुभव पुरविण्याच्या हयातच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.

मेंबर डे ऑफरचा लाभ घेण्यासाठी वर्ल्ड ऑफ हयातच्या सदस्यांना hyatt.com वर किंवा वर्ल्ड ऑफ हयात अॅपच्या माध्यमातून बुकिंग करता येईल. बिगर-सदस्यांना वर्ल्ड ऑफ हयातमध्ये लॉयल्टी प्रोग्राम विनामूल्य सहभागी होता येईल व मेंबर डे ऑफरसह इतर खास फायद्यांचा लाभ घेता येईल.

मेंबर डे ऑफरविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि आपला स्टे बुक करण्यासाठी कृपया hyatt.com/swamembersday येथे भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button