तृप्ती डिमरी ही 2024 सालची सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार आहे व दुस-या क्रमांकावर दीपिका पदुकोन आहे
मुंबई—5 डिसेंबर 2024—IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज 2024 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची टॉप 10 यादी घोषित केली. IMDb वरील जगभरातील दर महा 25 कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही क्रमवारी निर्धारित झाली. तृप्ती डिमरी, ह्या 2024 मधील क्रमांक 1 च्या भारतीय अभिनेत्रीने ह्या वर्षी बॅड न्यूज, विकी विद्या का वो वाला विडियो, आणि भूल भुलैया 3 ह्या तीन चित्रपटांमध्ये भुमिका केल्या व जगभरातील चाहत्यांनी ह्या भुमिकांचे कौतुक केले.
“2024 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या IMDb यादीमध्ये प्रस्थापित दिग्गज व उभरत्या प्रतिभावान कलाकारांच्या समावेशासह भारतीय मनोरंजन जगताचे वैविध्यपूर्ण प्रतिबिंब दिसते,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “आमच्या वार्षिक यादीमध्ये जागतिक श्रोत्यांच्या बदलणा-या आवडींचे प्रतिबिंब उमटते व शाह रूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन असे दिग्गज कलाकार आजही दर्शकांची मने कशी आकर्षित करत आहेत व त्यासह तृप्ती डिमरी आणि शर्वरी हे नवीन कलाकारसुद्धा कसे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत, हेसुद्धा त्यामधून दिसते. भारतीय चित्रपट व त्यातील कलाकारांना मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता कशी वाढत आहे, हेसुद्धा ह्या वर्षीच्या यादीमधून दिसते.”
आपल्या चाहत्यांना धन्यवाद देताना तृप्ती डिमरीने म्हंटले, “2024 च्या IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये क्रमांक 1 वर स्थान मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या चाहत्यांचे अविश्वसनीय सहकार्य व मला ज्यांच्यासोबत काम करता आले त्या सर्वांचे परिश्रम ह्याची ही पावती आहे. ह्या वर्षामध्ये मी अनेक उत्साहवर्धक प्रोजेक्टसवर काम केले आहे व भूल भुलैया 3 सह 2024 चा शेवट होत आहे व असे हे माझ्यासाठी संस्मरणीय वर्ष राहिले आहे. मी ह्या प्रेरणादायी उद्योगाचा भाग बनून पुढील काळात नवीन प्रोजेक्टसवर काम करत राहणार आहे.”
2024 मधील IMDb चे टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार
- तृप्ती डिमरी
- दीपिका पदुकोन
- इशान खट्टर
- शाह रूख खान
- सोबिता धुलिपाला
- शर्वरी
- ऐश्वर्या राय बच्चन
- समंथा
- आलिया भट्ट
- प्रभास
IMDb च्या 2024 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या टॉप 10 यादीमध्ये असे कलाकार आहेत जे संपूर्ण 2024 मध्ये IMDb च्या साप्ताहिक क्रमवारीमध्ये सातत्याने सर्वाधिक रँकिंग असलेले होते. जगभरातून IMDb वर दर वर्षी येणा-या 25 कोटींपेक्षा जास्त वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे रँकिंग निर्धारित झाले आहे.
ह्या वर्षातील सर्वांत प्रसिद्ध भारतीय कलाकारांबद्दल अतिरिक्त माहिती:
• दीपिका पदुकोनच्या (क्र. 2) ह्या वर्षी तीन मुख्य भुमिका समोर आल्या: फायटर, कल्की 2898 एडी, आणि सिंघम अगेन. तिने कल्की 2898 एडीद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण केले व तिच्या उत्तुंग करिअरचा तो पुढचा टप्पा ठरला.
• इशान खट्टरने (क्र. 3) दोन आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिकांद्वारे आपल्या चाहत्यांची संख्या आणखी वाढवली. द परफेक्ट कपल मध्ये त्याने निकोल किडमन, लिएव्ह श्राईबर आणि ईव्ह ह्यूसनसोबत काम केले.
• सोभिता धुलीपाला (क्र. 5) ने ह्या वर्षी मंकी मॅन सह हॉलीवूडमध्ये आपले पदार्पण केले. तिने कल्की 2898 एडीमध्ये दीपिका पदुकोनसाठी तेलुगूमध्ये डबिंगही केले. तसेच, तेलुगू कलाकार नागा चैतन्य अक्कीनेनी सोबत तिच्या झालेल्या एंगेजमेंटमुळेही ती ह्या वर्षी प्रकाशझोतात आली होती.
• शर्वरी (क्र. 6) ला हे वर्ष तीन भुमिकांसह अभूतपूर्व गेले: मुंज्या, महाराज आणि वेदा. तिला ऑगस्टमध्ये IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाला.
• आलिया भट्टने (क्र. 9) चाहत्यांमध्ये असलेली आपली आवड टिकवून ठेवली आहे व सलग तिस-या वर्षी ती ह्या यादीमध्ये आली आहे. 2024 मध्ये पॅरीस फॅशन वीकमध्ये तिने पदार्पण केले व ह्या वर्षी थिएटरमध्ये तिचा जिगरा, हा चित्रपट आला होता व त्याची निर्मितीसुद्धा तिने केली होती.