बंगळुरु :- यंदाचा सणासुदीचा काळ लेक्सस इंडियाने आपल्या वाहन विक्रीत वाढ नोंदवली आहे. कंपनीने मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यंदा म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्ये आपल्या वाहनांच्या विक्रीत ४३ टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच या वर्षी ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या काळात लेक्सस इंडियाने मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत १४ टक्के जास्त वाहन विक्री केली आहे. ऑक्टोबर २०२४ मधील लेक्सस इंडियाच्या एकूण विक्रीत लेक्सस ईएस मॉडेलच्या विक्रीचा वाटा ५८ टक्के होता. जोडीला मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर २०२४ मध्ये लेक्सस इंडियाच्या एसयूव्ही मॉडेल्समध्येही ४६ टक्के अशी आकर्षक वाढ झाली आहे. याबद्दललेक्सस इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष तन्मय भट्टाचार्य म्हणाले की, यंदाच्या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांनी दिलेला पाठिंबा व उत्तम प्रतिसाद यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. उच्च दर्जाची उत्पादने व अनुभव देऊ करण्याबद्दलची आमची बांधिलकी यांचे प्रतिक म्हणजे आमच्या विक्रीमध्ये झाली ही प्रगती आहे.